Total Pageviews

Friday, 27 May 2011

PUNE POLICE BRUTALITY

पोलिसांची थर्ड डिग्री (व्हिडीओ)
-
Saturday, May 28, 2011 AT 03:00 AM (IST)
पुणे - मानवी हक्क आयोगाचे निर्बंध आणि न्यायालयाच्या विविध आदेशांमुळे पोलिसांकडून आरोपींना देण्यात येणारी "थर्ड डिग्री'ची वागणूक बंद झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी ती सुरूच असल्याचे दिसते. पुण्यातून 'यूट्यूब' वर टाकण्यात आलेल्या या चित्रफितीमधील हे दृष्य त्यासाठी पुरेसे बोलके आहे.

गुन्हा कबूल करून घेण्यासाठी पोलिस ही पद्धत वापरतात. अमानुष मारहाणीच्या भीतीमुळे अनेकदा आरोपी न केलेला गुन्हाही कबूल करतात. मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे हे प्रकार रोखण्यासाठी अनेक नियम करण्यात आले आहेत. अनेकदा या नियमांचा बाऊ करून पोलिस हात वर करत गुन्हेगारांना अभय देत असल्याचेही दिसून येते.

येथे मात्र उलटी स्थिती दिसत आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या या आरोपीला अमानुष मारहाण केली जात आहे. सुरवातीला "नाही नाही' म्हणणारा हा आरोपी जेव्हा "हो' म्हणतो, तेव्हाच पोलिस मारायचे थांबतात, असे यातून दिसते. हे चित्रीकरण कोणी व कोठे केले हे स्पष्ट होत नाही. मात्र अंगावर शहारे अणणारी ही चित्रफीत आज दिवसभर अनेक नेटिझन्सनी पाहिली आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
 
प्रतिक्रिया
On 28/05/2011 07:26 AM sai saswade said:
मी तर अशी मागणी करतो कि, हि क्लीप प्रत्येक नवीन मोबिले मध्ये असणे बंधन कारक करावी जेणे करून प्रेत्येक जन नेहमी पाहून गुन्ह्या करताना शंभरदा विचार करेल.

No comments:

Post a Comment