लसीकरणानंतर १२८ बालकांचे बळी
रोग प्रतिबंधक म्हणून लहानग्या मुलांना दिले जाणारे लसीकरणाचे डोस त्यांच्या जीवावरच उलटत असल्याची धक्कादायक आकडेवारी गेल्या तीन वर्षांत समोर आली आहे. लसीकरणानंतर २०१० साली १२८ चिमुरड्यांचा बळी गेला असून, त्याआधीच्या दोन वर्षांत अनुक्रमे १११ आणि ११६ बालकांचा मृत्यू झाला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे हे मृत्यू नेमके कशामुळे होत आहेत, याबाबत सरकार अंधारातच आहे.
माहिती अधिकार कायद्याखाली केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीमध्ये हा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. लसीकरणाचा दुष्परिणाम होऊन २०१० साली १२८, २००९ साली ११६ आणि २००८ साली १११ मुलांचे बळी गेले. याचाच अर्थ दरवर्षी हे प्रमाण वाढत चालले असून, त्याची नेमकी कारणे अद्याप आरोग्य खात्याला कळू शकलेली नाहीत. निकृष्ट दर्जाच्या लसी, लसींच्या साठवणुकीतील हेळसांड आणि लस टोचल्यानंतर मुलांच्या शरीराची विपरित प्रतिक्रिया यामुळे हे मृत्यू होत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकाराची आम्हाला गंभीर चिंता वाटते. मात्र मृत्यूचे एकच कारण सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य सचिव के. चंद्रमौळी यांनी व्यक्त केली. लसीकरणामुळेच हे लहान मुलांचे बळी गेलेले आहेत का, असा नेमका प्रश्न विचारला असता, मला तसे काही सांगता येणार नाही, एवढेच उत्तर त्यांनी दिले. बालकांना लसी देताना फिल्ड लेवलवर झालेली हेळसांड हे कदाचित त्यामागचे कारण असू शकते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
गेल्यावर्षी लसीकरणानंतर दगावलेल्या १२८ बालकांपैकी सर्वाधिक म्हणजे २८ मुले महाराष्ट्रातील होती. उत्तर प्रदेशातील १८, आंध्र प्रदेशातील ११ आणि तामिळनाडूतील ८ बालकांचा त्यामध्ये समावेश होता

No comments:
Post a Comment