नवी दिल्ली - पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगीच जन्माला येणार असेल तर गर्भावस्थेतच तिचा गळा घोटून टाकण्याचे प्रमाण भारतातील विशेषतः श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबांमध्ये प्रचंड वाढत असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. गेल्या तीन दशकांत भारतात 42 लाख ते एक कोटी 21 लाख स्त्री भ्रूणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही त्यातून उघड झाली आहे.
टोरांटो विद्यापीठाच्या पथकाने केलेल्या या सवेक्षणाचा निष्कर्ष "लॅन्सेट' या नियतकालिकात प्रसिद्ध होणार आहे. गेल्या काही दशकांत स्त्री भ्रूणांच्या गर्भपाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून, आता केवळ उत्तर प्रदेशकडे या गंभीर प्रकाराची पारंपरिक मक्तेदारी न राहता ती पूर्व आणि दक्षिण भारताकडेही सरकत असल्याचे मतही अहवालात नोंदविण्यात आले आहे.
जनगणनेतील माहिती आणि राष्ट्रीय सर्वेक्षणातील अडीच लाख बालकांच्या जन्माच्या नोंदी यांची तुलना करून पहिली मुलगी असलेल्या कुटुंबांत दुसऱ्या मुलाच्या जन्मातील स्त्री-पुरुष भेदाबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. सन 1990 मध्ये दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 906 होते, ते सन 2005 मध्ये 836 पर्यंत घसरल्याचे त्यात आढळून आले. त्यातूनही जास्त शिकलेल्या आणि श्रीमंत घरांतील महिलांमध्ये घसरणीचे हे प्रमाण अल्पशिक्षित महिलांपेक्षा जास्त होते. पहिले अपत्य जर मुलगा असेल, तर दुसऱ्या अपत्याबाबत स्त्री-पुरुष व्यस्ततेचे प्रमाण खूपच कमी आढळले. त्यावरून पहिल्या मुलीनंतर दुसऱ्या गरोदरपणात गर्भात मुलगी असेल, तर गर्भपात करून घेण्याचे प्रमाण श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबांमध्ये जास्त असल्याचे सिद्ध झाले, असे टोरांटो युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक व अहवालाचे लेखक प्रभात झा यांनी सांगितले. प्रतिक्रिया हुंडा बंद करण्याची जबाबदारी फक्त तरुणांवर आहे...प्रेम विवाह करा सगळ्यांनी...म्हणजे जे हुंडा मागतात त्यांनी मुळीच मिळणार नाही..माजे फक्त एव्डेच म्हणणे आहे कि आता समाजाने थोडा दृष्टीकोण बदलला पाहिजे....आणि आहे त्या मुलींचे सुधा लग्न होत नाहीत...बुटकी, सावली वय जालेले अशी अनेक कारणे आहेत मुलां कडे प्लीज विचार करा सगळ्यांनी...आपली संस्कृती पेक्षा लोकांचे जीवनाला महत्व द्यायला शिकले पाहिजे आपण... मच्छींद्र गोजमे said: स्त्री भूण हत्येसाठी कारणीभूत असलेल्या कारणापैकी " हुंडा आणि करणी-धरणी " हे कारण सर्वाधिक कारणीभूत आहे. हुंडा वाईट ! एवढे बोलून ही अमानुष प्रथा संपुष्टात येणार नाही, यासाठी प्रथम तरूण-तरूणींनी दॄढ निश्चय करुन तो अमलात आणला पाहिजे आणि पालकांनी विनाशर्त पाठींबा दिला पाहिजे, हे केले गेले नाही तर, येणारा काळ आपोआप सुड उगवेल - - जसे सव्वा कोटी आकडा मिळाला तसेच त्यांच्या पालकांचीही नावेही शोधून काढा आणि प्रत्येकाला जन्मठेपेची शिक्षा द्या. तसेच हुंडा, लग्न कार्यातील भरमसाठ मागण्या आणि खर्च ह्यावर जरब बसवा. शिक्षण खात्यातील गैर प्रथा बंद करून शिक्षणाचा खर्च कमी कसा करता येईल ते बघा म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा, लग्नाचा आणि हुंड्याचा प्रश्न पडून त्यांची गर्भातच हत्या होणे कमी होईल. बर गर्भ लिंग परीक्षा आणि गर्भपात करणे हे बेकायदा आहे तरी पण एवढ्या प्रमाणात हे कसे शक्य झाले ते बघा. श्रीमंतांचे पैसे चारून होणारी कामे कशी होतात. पहिली मुलगी असेल आणि दुसर्या वेळेस मुलाची इच्छा असेल तर यात चूक काय ? नाहीतरी असेही गुपचूप गर्भनिदान करून गर्भपात होतातच कि ... पहिली मुलगी असेल तर दुसर्या वेळेस सोनोग्राफी ची मुभा द्यावी..असा कायदा करावा... ह्याला कारण हुंडा द्यायची अतिशय घाणेरडी आणि घातक पद्धत. गोळ्या घालून ठार केले पाहिजे हुंडा मागणार्यंना. श्रीमंत लोकां मध्येच हि चाल अजून आहे. लग्ना मध्ये बीके, फ्रीझे, T V आणि काय काय देतात. भानुदास पाटील said: जास्त शिकलेल्या आणि श्रीमंत घरांतील महिलांमध्ये घसरणीचे हे प्रमाण अल्पशिक्षित महिलांपेक्षा जास्त होते...... गर्भपात करून घेण्याचे प्रमाण श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबांमध्ये जास्त असल्याचे सिद्ध झाले.....बाप रे !!! एवढे पाप ????? कारण हुंडा ?????? "जैसी करणी वैसी भरणी" एका दृष्टीने ठीक आहे .....ह्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत आणि लोकसंखेला आळा बसेल.
On 25/05/2011 06:21 AM
.....
Thank you.
On 25/05/2011 09:54 AM Sachin said:
On 25/05/2011 10:06 AM vishal said:
On 25/05/2011 10:47 AM rahul said:
On 25/05/2011 11:24 AM
On 25/05/2011 01:29 PM indian said:
No comments:
Post a Comment