हसन अलीचे संबंध कुणाकुणाशी?
18 May 2011, 0409 hrs IST
काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी, अभिनेत्री जयाप्रदा माजी मुख्यमंत्री विजय रेड्डी, बिल्डर युसूफ लकडावाला
कोट्यवधींच्या करचुकवेप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असलेल्या हसन अली खान याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांना १.२ कोटी रुपयांचा हार भेट दिला होता... अभिनेत्री व खासदार जयाप्रदा यांच्यासारख्या बड्या मंडळींशीही त्याचे मैत्रीचे संबंध होते... ही खळबळजनक माहिती उघड केली आहे, 'हसन अली'प्रकरणातील सहआरोपी व कोलकात्यातील उद्योजक काशिनाथ तापुरिया यांनी 'ईडी'च्या अधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबात!
रेणुका चौधरी यांना दिलेला हिरा सन २००० मध्ये अब्बास नक्वी नावाच्या बिल्डिंग काँट्रक्टरमार्फत 'सोयर ज्वेलर्स'कडून खरेदी करण्यात आला होता. चौधरी यांना हा हिरा भेट म्हणून द्यायचा असल्याचे सांगून हसन अलीने आपल्याकडून नेल्याचे तापुरिया यांनी 'ईडी'ला सांगितले आहे. हि-याचे पैसे तीन महिन्यांत देण्याचे आश्वासनही हसन अलीने तापुरिया यांना दिले होते. रेणुका चौधरी यांच्याशी आपली जवळची मैत्री असल्याचेही हसन अलीने बोलण्याच्या ओघात सांगितले होते. मात्र, त्या हिऱ्याची रक्कम आपल्याला कधीही मिळाली नाही, अशी खंत तापुरिया यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली.
अभिनेत्री व खासदार जयाप्रदा यांच्याशी सन १९९४-९५ मध्ये हसन अलीचे मैत्रीचे संबंध होते. दोघही १९९६ साली मुंबईत एकमेकांना भेटले होते, अशी कबुलीही तापुरिया यांनी दिली आहे. तापुरिया यांनी दिलेल्या खळबळजनक जबाबाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून त्यातील काही भाग ६ मे रोजी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. यात, आंध प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विजय भास्कर रेड्डी यांचाही उल्लेख आहे! हसन अलीने रेड्डी आणि चौधरी यांची २००० साली स्वतंत्रपणे ओळख करून दिली होती, रेड्डी याची दिल्लीमध्ये तर, रेणुका चौधरी यांची मुंबईत ओळख झाली होती, अशी माहितीही तापुरिया यांनी 'ईडी'ला दिली आहे. बडे बिल्डर युसूफ लकडावालाशी चांगली ओळख असल्याचेही हसन अलीने तापुरिया यांना सांगितले होते. २००७ साली इन्कम टॅक्स विभाग, 'ईडी'ने सुरू केलेल्या तपासाचा ससेमिरा थांबवण्यासाठी लकडावालाकडून मदत होऊ शकते. लकडावाला यांची काँगेसचे बडे नेते अहमद पटेल यांच्याशी जवळीक असून आपला प्रश्न मांडता येईल, असे हसन अलीचे म्हणणे होते, असे तापुरिया यांनी 'ईडी'च्या अधिकाऱ्यांना कबुलीजबाबात सांगितले आहे

No comments:
Post a Comment