Total Pageviews

Friday, 27 May 2011

POLICE LOOTING & HARRASSING STUDENTS & COMMON PEPOLE ON RAILWAY STATIONS

दादर रेल्वे स्थानकावर धाकदपटशा दाखवून पोलिसांनी केलेली लूट
 भारतात रेल्वेप्रवाशांवर दोन प्रकारच्या लुटारूंची टांगती तलवार असते. त्यापैकी एक अधिकृतपणे लुटारू म्हणूनच ओळखले जातात आणि चुकूनमाकून जमावाच्या हाती लागले, तर मरेस्तोवर बदडले जातात. परंतु दुसरे वर्दीतले लुटारू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका आणणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याची जरब बसवण्यासाठी त्यांना करदात्यांच्या, त्यात प्रवासीही आले, पैशातून दरमहा वेतन देऊन सरकारने नेमले आहे. प्रत्यक्षात गुन्हेगारांना त्यांचा हेवा वाटावा आणि प्रवाशांना भीती वाटावी, असेच यापैकी अनेकांचे वर्तन असल्याचा अनुभव येऊ लागला आहे. छत्तीसगडमधील आपल्या गावी सुटी घालवून परतलेल्या मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्याची दादर रेल्वे स्थानकावर धाकदपटशा दाखवून पोलिसांनी केलेली लूट हे याचेच उदाहरण आहे
.वर्दीने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग गुन्हेगारी कृत्यांसाठी करणारे कदाचित संख्येने अत्यल्प असतीलही, पण त्यामुळे रेल्वेच्या सर्वच सुरक्षायंत्रणांच्या विश्वासार्हतेला काळिमा फासला जात आहे. गेली अनेक वषेर् रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल इत्यादींतील जवान फेरीवाल्यांपासून ते रूळ ओलांडण्यासारखे गुन्हे करणाऱ्यांपर्यंत सर्वांकडूनच उघडपणे हप्तेवसुली करताना लोकांना दिसत आले आहेत. या गोष्टी इतक्या उघडपणे केल्या जातात की वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही याला संमती आहे काय, असा प्रश्ान् पडावा. कदाचित हप्ते घेऊन पोलिस सरकारी तिजोरीवर अप्रत्यक्ष डल्ला मारीत असले, तरी ते कामाच्या माणसांचा कोर्टाच्या कामकाजात जाणारा वेळ, पोलिसांची कोर्टाचे सव्यापसव्य करण्यावर खर्च होणारी शक्ती आणि न्यायाधीशांचे डोळे मिटून दंडाची रक्कम वाढवीत जाण्याचे कष्ट वाचवितात, असे या अधिकाऱ्यांना वाटत असावे. शिवाय हप्त्यांच्या रूपात गुन्हेगाराला भुर्दंड हा पडतच असल्याने, त्याला 'जरब' बसविण्याचा कायद्याचा उद्देश साध्य होतच असतो! परंतु किरकोळ वाटणाऱ्या या गुन्ह्यांच्या बाबतीत सौदेबाजी करण्याच्या या सवयीमुळे समाज आणि देशाविषयीच्या व्यापक कर्तव्याची पोलिसांतील जाणीवही नष्ट होऊ लागली आहे. परिणामी, दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांकडेही लुटमारीची संधी म्हणूनच पाहण्याची मजल रेल्वेतील सुरक्षा कर्मचारी गाठू लागले आहेत.रेल्वेला दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटांचे लक्ष्य बनविल्यापासून, रेल्वे स्थानकावर संशयास्पदपणे वावरणाऱ्या व्यक्तीला हटकणे, प्रवाशांचे सामानसुमान तपासणे यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.त्या योग्यच आहेत आणि त्यासाठी सहकार्य करणे हे प्रत्येक प्रवाशाचे कर्तव्य आहे. मात्र पोलिसांनीही हे कर्तव्य काटेकोरपणे आणि घातपाताची शक्यता रोखण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पार पाडले पाहिजे. या अधिकारांचा वापर प्रवाशांची अडवणूक करून, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी केला गेला, तर त्यामुळे प्रवाशांमध्ये सहकार्याऐवजी संतापाची भावना निर्माण होईल. शिवाय पैसे मोजण्यास तयार असलेले हेडलीसदृश दहशतवादी घातपातासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासह सहीसलामत निसटतील. मुख्य म्हणजे या तपासणीचे गांभीर्यच नष्ट होईल. आज नेमके हेच होते आहे असे मानायला जागा आहे.आयआयटीच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत काही आढळले नाही, तेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये अश्लील चित्रफिती असल्याचा कांगावा करीत त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले. हे पोलिस लाजलज्जा इतकी कोळून प्यायले होते की, या विद्यार्थ्याच्या खिशात एटीएम कार्ड दिसताच, साधा वेश करून एका पोलिसाने त्याला बँकेच्या एटीएम केंदात नेले पैसे काढायला लावले.या विद्यार्थ्याने नंतर आयआयटीतील वरिष्ठांना याविषयी सांगितले, आयआयटीच्या सुरक्षा अधिकाऱ्यामार्फत दादर रेल्वे पोलिस ठाण्यात हा विद्याथीर् गेला, तेव्हा त्याच्याकडून उकळलेले पैसे परत करण्यात आले, शिवाय 'मनस्तापा'ची भरपाई म्हणून अधिक पैेसेही देऊ करण्यात आले. हे पैसे याच मार्गाने इतरांकडून उकळलेले असणार हे निश्चित! कारण आयआयटीतील विद्याथीर् हा लुबाडला गेलेला पहिलाच प्रवासी नाही. इंटरनेटवर अशाच प्रकारच्या तक्रारींची माहिती मिळते.दिल्लीहून विमानाने मुंबईला आलेल्या आणि सुरत येथे जाण्यासाठी मुंबई सेेंट्रल स्टेशनवर सामानासह पोचलेल्या एका प्रवाशाला पोलिसांच्या अशाच टोळीने अडवले आणि त्याच्या लॅपटॉपच्या बॅगेत आढळलेली सीडी 'ब्लू फिल्म' आहे, असा दावा करीत त्याला डांबून ठेवले. गाडी सुटण्याआधी पाच मिनिटे त्याच्या पाकिटातील पैसे काढून घेऊन त्याला सोडून दिले. याचाच अर्थ, केवळ दादर स्थानकावरच नव्हे, तर बाहेरगावच्या गाड्यांच्या टमिर्नसवर पोलिसांच्या या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांची कार्यपद्धतीही सारखीच आहे. खाकी वदीर्मुळे या संघटित गुन्हेगारीला अटकाव करण्याचे धाडस प्रवाशांना होत नाही. देशाच्या सुरक्षिततेशी तर हा खेळ आहेच, पण रेल्वेची प्रतिमाही त्यामुळे डागाळते आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी दिलेल्या अधिकारांचा लूटमारीसाठी होणारा दुरुपयोग हा केवळ लाचबाजीचा नव्हे, तर देशदोहाचाच गुन्हा मानला जायला हवा. गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे





No comments:

Post a Comment