Total Pageviews

Monday, 23 May 2011

CIVIL WAR BETWEEN MAMATA SUPPORTERS & COMMUNISTS IN WEST BENGAL

1400 कॉमरेडस्ची हत्या करण्यात आली होती 22000 कुटुंबांना स्थलांतर
निवडणुकीच्या निकालानंतर जे अपेक्षिले होते तेच नेमके प. बंगालमध्ये घडत आहे. तृणमूल काँग्रेस आघाडीच्या कार्यकत्र्यानी डाव्या आघाडीच्या कार्यकत्र्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. 13 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होताच या तर्‍हेच्या हल्ल्यांना सुरुवात झाली. विशेषतर्‍ ज्या मतदारसंघात डावे पक्ष विजयी झाले आहेत त्या क्षेत्रात हे हल्ले होत आहेत. या भागातील डाव्या पक्षाच्या कार्यालयांवर हल्ले करण्यात येत असून पक्षाचे लाल झेंडे फाडून फेकून देण्यात येत आहेत. काही ठिकाणी डाव्या आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या घरावर हल्ले करण्यात येऊन त्यांच्या घरांना आगी लावण्यात आल्या आणि घरातील चीजवस्तू लुटण्यात आल्या. जेथे डाव्या कॉमरेडनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेथे त्यांच्यावर खुनी हल्ले करण्यात आले. निकालानंतरच्या दोन दिवसात बर्धवान, . मिदनापूर आणि बांकुरा जिल्ह्यातील तीन डाव्या कार्यकत्र्याच्या हत्या करण्यात आल्या.
सांसदीय लोकशाही पद्धतीत कुणी तरी जिंकते तर कुणाचा तरी पराभव होतो. या स्तंभातून मी पूर्वीदेखील हे स्पष्ट केले आहे की निवडणुकीतील डाव्या पक्षांच्या पराभवाचा उपयोग डाव्या आघाडीच्या सत्ताकाळात ज्या वर्गाचा फायदा झाला त्यांचे लाभ हिरावून घेण्यात करण्यात येईल. सध्या नेमके हेच घडते आहे. जंगलमहाल क्षेत्रात डाव्या आघाडीच्या भू-सुधारणांमुळे ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांचेवर तृणमूल काँग्रेसकडून माओवाद्यांच्या मदतीने हल्ले करण्यात येत आहेत. आजर्पयत जे मजूर भूमीहीन होते त्यांना मिळालेल्या जमिनीच्या संदर्भात खटले भरण्यात येत आहेत आणि ज्यांच्या जमिनी होत्या त्या जमीनदारांकडून या जमिनी परत मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत. एकूणच जमीन सुधारणांमुळे जे लाभ मिळाले ते काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ठिकाणी कृषी मजुरांचे कामाचे तास वाढविण्यात आले आहेत आणि त्यांच्या दैनिक वेतनात कपात करण्यात आली आहे. कृषी मजुरांना तांदूळ आणि जेवण देण्याची जी प्रथा गेल्या 30 वर्षापासून अस्तित्वात होती ती आता बंद करण्यात येत आहे. काही ठिकाणी शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील पीक कापू दिले जात नाही. उलट ते बेकायदेशीरपणे कापून नेण्यात येत आहे. आजवर प. बंगालमध्ये मार्क्‍सवादी पक्षाचे दैनिक गणशक्ती’ हे चौकाचौकातील फलकावर प्रदर्शित करण्यात येत होते. जे लोक वर्तमानपत्र विकत घेऊ शकत नाहीत पण ज्यांची वाचण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली होती. पण आता नव्या राजवटीकडून हे फलक जाळण्यात आले आहेत.
हिटलरच्या काळातील फॅसिस्ट तंत्राची आठवण करून देणारे प्रकारही करण्यात येत आहेत. त्यानुसार मार्क्‍सवादी कार्यकत्र्याच्या घरात शस्त्रे ठेवून त्याची माहिती पोलिसांना देण्यात येत आहे आणि शस्त्रे बाळगल्याबद्दल अशा कार्यकत्र्यावर खटले भरण्यात येत आहेत. . बंगालमधील वर्गयुद्ध या पातळीर्पयत पोचले आहे.
आपण राज्यात परिवर्तन घडवून आणणार आहोत, आम्हाला सूडाचे राजकारण करायचे नाही असे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांकडून निवडणुकीच्या काळात सांगण्यात आले. तसेच डाव्या आघाडीच्या कार्यकत्र्याविरुद्ध होणारे हिंसक हल्ले ते त्यांच्याच पक्षाच्या कार्यकत्र्याकडून अंतर्गत भांडणांमुळे होत आहेत असेही भासविण्यात येत आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या काळात प्रक्षोभक भाषणे करून डाव्यांना योग्य धडा शिकविण्यात येईल अशीही भाषा बोलली गेली होती.
डाव्या आघाडीने व माकपने एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपण काम करू असे सांगितले असतानाही तृणमूल काँग्रेस आघाडीकडून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. हे एकप्रकारचे वर्गयुद्ध असून त्यातून माकप व डावी आघाडी कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या तीस वर्षात डाव्या आघाडीने पंचायत राज आणि जमीन सुधारणा यांच्याद्वारे जी शक्ती कमावली आहे ती खच्ची करण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
मा... व डावी आघाडी यांच्यावर हल्ले होण्याची ही पहिलीच वेळ नाही, 1972 सालीसुद्धा राज्यातील डाव्यांची चळवळ खच्ची करण्यासाठी दहशतीचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी 1400 कॉमरेडस्ची हत्या करण्यात आली होती व 22000 कुटुंबांना स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले होते. तरीही प. बंगालच्या जनतेने मा... च्या नेतृत्वातील डाव्या आघाडीच्या सरकारवर विश्वास ठेवून सतत सात निवडणुकात त्या आघाडीला विजयी केले होते. सध्या डाव्या आघाडीच्या विरोधात जो वर्गसंघर्ष करण्यात येत आहे त्याला प्रभावीपणे तोंड देऊन त्याला पराभूत करण्यात येईल. 1996 च्या संसदेच्या निवडणुकीनंतरच्या काळात जे 400 कार्यकर्ते शहीद झाले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. या वर्गसंघर्षात आमचा पक्ष सदैव प. बंगालच्या जनतेसोबत राहील. डाव्या पक्षाच्या राजवटीत जे हक्क लोकांना मिळवून देण्यात आले होते ते कदापिही हिरावू दिले जाणार नाहीत.

-
सीताराम येचुरी

No comments:

Post a Comment