Total Pageviews

Thursday, 19 May 2011

NAXALS KILL 1 POLICEMAN IN MAHARASHTRA

गडचिरोली- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद Thursday, May 19, गडचिरोली- भामरागड तालुक्यातील नालगुंडा पोलीस चौकीवर आज (गुरुवारी) सकाळी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर दोन जण जखमी झाले. नक्षलवाद्यांनी पोलीस चौकीवर हल्ला केला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही तेथे होते. सकाळी साडेसातच्या सुमारास नक्षलवाद्यांनी या चौकीवर हल्ला केला.पोलिसांनीही हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुमारे तासभर सुरू होती

पोलिस चौक्‍यांत बंद; माओवादी वरचढ!गडचिरोली- "नक्षलग्रस्त भागांतील अभियान थांबवा' असे आदेश गृहविभागाने दिले आणि एकेकाळी नक्षलवाद्यांचे (माओवादी) कर्दनकाळ ठरणारे पोलिस चौक्‍यांमध्ये बंदिस्त झाले. जवानांच्या बचावासाठी गृहविभागाने हा निर्णय घेतला असला तरीही यामुळे माओवाद्यांचे वर्चस्व दिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यात वाढते आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुर्गम भागातील गावांमध्ये दिवसाही बिनधास्तपणे माओवादी फिरताना दिसताहेत.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यापासून जिल्ह्यात नक्षल घटनांमध्ये वाढ झाली आहे. चुकीचे नियोजन, बचावात्मक पवित्रा तसेच पोलिस आणि जनतेतील दुरावलेला संवाद याचा पुरेपूर फायदा माओवाद्यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घटनांमुळे गृहखात्याने पोलिसांना पोलिस चौकीबाहेर पडण्याची बंदी घातली आहे. नक्षलविरोधी अभियान पथकाचीही हीच अवस्था आहे. पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर जरी एखादी घटना घडली, तरी त्याची दखल घेतली जात नाही. आम्हाला वरिष्ठांचे आदेश असल्याने मदत करणे शक्‍य नसल्याचे नागरिकांना सांगण्यात येते.
पोलिस म्हणजे पिंजऱ्यातील वाघ!


गृहखात्याच्या आदेशामुळे नक्षलग्रस्त भागातील पोलिसांची अवस्था सध्या पिंजऱ्यातील वाघाप्रमाणे झाली आहे. मनुष्याच्या आरोग्यासाठी थोडी फार श्रमाची गरज असते. त्याशिवाय खाल्लेले अन्न पचत नाही. पूर्वी नक्षलविरोधी अभियान सातत्याने राबविले जायचे. त्यामुळे जनतेचा संपर्कही वाढला होता. कुठलीही माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोचत होती. मात्र सध्या चित्र उलट झाले आहे. वरिष्ठांच्या आदेशाशिवाय बाहेर पडता येत नसल्याने जवानांना आरोग्याची समस्याही भेडसावत आहे.
खबऱ्यांवर संक्रांत तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष जैन यांनी सातत्याने राबविलेल्या जनजागरण मेळाव्यामुळे पोलिस खबऱ्यांची संख्या वाढली होती. जनसंपर्क आणि अभियान यामुळे नक्षल घटनांना मोठा अंकुश बसला होता; मात्र सद्य:स्थितीत पोलिस जनतेतील दुराव्यामुळे नक्षल खबऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. शिवाय महत्त्वाची माहिती देणाऱ्या खबऱ्यांचे संरक्षण पोलिसही करू शकत नाहीत. त्यामुळे माओवादी त्यांना सातत्याने टिपून निर्घृण हत्या करीत आहेत. पोलिस खबऱ्यांवर आलेली ही संक्रांत पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरली आहे.
दीडशेहून अधिक पोलिस शहीद

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यांवर माओवाद्यांच्या हिंसेचे सावट आहे. माओवाद्यांचा सामना करताना 2009 पर्यंत तब्बल दीडशेहून अधिक पोलिस शहीद झाले आहेत. एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील शहिदांची संख्या 138 च्या वर आहे.
कोट्यवधींचे नुकसान
माओवाद्यांनी 1982 पासून आतापर्यंत एकट्या गडचिरोली जिल्ह्यात 25 कोटींहून अधिक सार्वजनिक खासगी मालमत्तेचे नुकसान केले आहे. जिल्ह्यात 2009 पर्यंत शासनाच्या आठ कोटी 21 लाख 60 हजार 209 रुपयांचे तर, आठ कोटी 95 लाख 30 हजार 185 रुपयांच्या खासगी मालमत्तेचे माओवाद्यांनी नुकसान केले आहे. 2010 मध्येही माओवाद्यांनी अनेक सरकारी खासगी वाहने जाळून मालमत्तेची हानी केली.
माओवाद्यांचा विकासाला विरोध
जिल्ह्याच्या विकासाला माओवाद्यांचा सातत्याने विरोधच राहिला आहे. विशेषत: जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधा होऊ देण्याचा एक कलमी कार्यक्रम ते राबवितात. भामगरागड तालुक्‍यातील पामुलगौतम नदीवर होत असलेला भामगरागड-लाहेरी मार्गावरचा पूल माओवाद्यांच्या हैदोसामुळे दहा वर्षांपासून अर्धवट आहे. पोलिसांच्या सुरक्षेनंतरही पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. माओवाद्यांनी ग्रस्त असलेल्या भागातील अनेक कामे बीआरओकडे सोपविण्यात आली. मात्र, एटापल्ली तालुक्‍यात आलदंडी नदीवरील अर्धवट पूल अडंगे, जांभियागट्टा या दोन पुलांचे बांधकाम करण्याची हिंमत दाखविणारे बीआरओचे अभियंता गणेशन यांचीही माओवाद्यांनी 14 जानेवारी 2006 ला निर्घृण हत्या केली. अशा प्रकरणांमुळे माओवाद्यांची दहशत वाढली असून विकासकामे रखडली आहेत.
कंत्राटदार दहशतीत
पूर्वी जिल्ह्याच्या दुर्गम भागातही पुलांचे, रस्त्याचे कंत्राट अनेक कंत्राटदार घ्यायचे. पण, 2009 मध्ये नागी चेंचुरेड्डी उमेश भिवापुरे या तरुण कंत्राटदारांची माओवाद्यांनी क्रूरतेने हत्या केली. तेव्हापासून कोणतेही कंत्राटदार जंगलातील कामे घेण्यास धजावत नाहीत. याचा परिणामही विकासप्रक्रियेवर झाला आहे.
नागरिकांचे हत्यासत्र
1985 -03

2000 पर्यंत- 66
2002 - 21,
2003 - 27,
2004 - 10,
2005 - 26,
2006 - 39,
2007 - 24,
2008 - 15,
2009 - 35,
2010 - 24
महत्त्वाच्या चकमकी, सुरुंग स्फोट शहीद पोलिसांची आकडेवारी...ताडगाव (ता. भामगराड) भूसुरुंगस्फोट, 11 पोलिस शहीद.
1992 :
भिमनकोजी चकमक, 7 पोलिस शहीद.
1997 :
घोटसूर चकमक, 7 पोलिस शहीद.
2
फेब्रुवारी 2005 : धोडराज, 7 पोलिस शहीद.
6
जून 2005 : नवेझरी चकमक, 3 पोलिस शहीद.
25
ऑक्‍टोबर 2006 : कोपवंचा चकमक, 4 पोलिस शहीद.
1
फेब्रुवारी 2009 : ऍम्बुशमध्ये मरकेगाव येथे 15 पोलिस शहीद.
6
फेब्रुवारी : मुंगनेर जंगलात चकमक, 3 पोलिस शहीद.
21
मे 2009 : हत्तीगोटा पहाडीवर माओवाद्यांचा ऍम्बुश, 16 पोलिस शहीद.
8
ऑक्‍टोबर 2009 : भामरागड तालुक्‍यातील लाहेरी जंगलातील मल्लमपोडूर पहाडीनजीक लाहेरी पोलिस ठाण्यावर हल्ला, 17 पोलिस शहीद.
28
मे 2010 : एटापल्ली तालुक्‍यातील जांभियागट्टाजवळ चकमक, 2 पोलिस शहीद.
4
ऑक्‍टोबर 2010 : अहेरी तालुक्‍यातील पेरमिली उपपोलिस ठाण्याजवळ माओवाद्यांचा भूसुरुंग स्फोट, 4 जवान शहीद.
29
नोव्हेंबर 2010 : जारावंडी येथे एका पोलिस जवानाची हत्या.
शेकड्यांनी माओवादी, हजारोंनी पोलिस...वास्तविक पाहता गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांची संख्या 250 ते 300 च्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. शेकड्यांनी असलेल्या माओवाद्यांच्या बंदोबस्तासाठी हजारोंच्या संख्येने पोलिस लावूनही यंत्रणा निष्प्रभ ठरत आहे. माओवाद्यांचा नायनाट करण्यासाठी गडचिरोली परिक्षेत्रातील गोंदिया, गडचिरोली आणि अहेरी पोलिस जिल्ह्यात 2,355 पदे निर्माण करण्यात आली आहेत. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात एक पोलिस अधीक्षक, दोन अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, यापैकी एक केवळ माओवाद्यांच्याविरोधी अभियानासाठीच कार्यरत आहे. तसेच जिल्हा पोलिस, सी 60 कमांडो, राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या चार कंपन्यांचे तब्बल 1800 जवान आहेत. तरीही, माओवाद्यांचा हिंसाचार राजरोस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात 25 च्या आसपास माओवाद्यांचे दलम असून अलीकडे मात्र एका घटनेमध्ये तब्बल 100 ते 150 माओवादी सहभागी होताना दिसत आहेत. यावरूनच त्यांची संख्या वाढली असून सीमावर्ती राज्यातील माओवादी जलद गतीने जिल्ह्यात वावरत असल्याचे दिसत आहे
1991 :

No comments:

Post a Comment