मोस्ट वॉन्टेड’ राहतोय ठाण्यातच मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
अमेरिकेने पाकिस्तानमध्ये लपलेल्या लादेनचा खात्मा केल्यानंतर भारताने ‘ मोस्ट वॉन्टेड ’ असलेल्या ५० गुन्हेगारांची यादी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडे पाठवली होती. मात्र ‘ काखेत कळसा अन् गावाला वळसा ’ या म्हणीप्रमाणे हा गुन्हेगार चक्क ठाण्यातील वागळे इस्टेट भागात सहकुटुंब राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
वझूल कमर खान असे या ‘ मोस्ट वॉंटेड ’ व्यक्तीचे नाव असून तो १९९८ पासून वागळे इस्टेट येथे दहा-बाय-दहाच्या घरात राहतो. त्याच्या सोबत त्याची पत्नी , दोन मुली आणि आई राहतात. २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणी या व्यक्तीचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तसेच या घटनेनंतर खान फरार होता. गेल्यावर्षी १० मे २०१० रोजी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला शस्त्र (प्रतिबंधक) कायद्याखाली कुर्ला येथे अटक केली होती. त्याच्या विरुद्ध मुलुंड , घाटकोपर , विलेपार्ले आणि मुंबई सेंट्रलसह पाच ठिकाणी झालेल्या स्फोटांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. पोटा कोर्टात त्याची केस सुरु होती. अवघ्या तीन महिन्यातच त्याला या सगळ्या केसमधून जामीन मिळाला होता.
खान फरार असल्याचे पोलिसांना विचारले असता , त्याला गेल्या वर्षी अटक केली होती त्यानंतर त्याला जामीन देण्यात आला होता , अशी माहिती पोलिसांनी दिली.
खान याने मात्र आपण पाकिस्तानमध्ये कधी गेलोच नव्हतो असा दावा ‘ द टाइम्स ऑफ इंडिया ’ शी बोलताना केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर मला गुन्हेगार म्हणून शोधत असल्याचे टीव्हीच्या माध्यमातून कळले आणि मी फरार झालो असे तो म्हणाला. २००३ ते २००४ मध्ये तो उत्तर प्रदेश आणि मध्ये प्रदेशात राहत होता. त्यानंतर तो मुंबईत परतला आणि धारावी येथे जरीचे काम सुरु केले. या नंतर २०१० मध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला एटीएसने कुर्ला येथे अटक केली. सुटके नंतर मी पुन्हा माझ्या व्यापारावर लक्षकेंद्रीत केले आहे. तसेच मी नियमीत कोर्टात हजर राहतो , असे असतानाही मी पाकिस्तानमध्ये पळून गेल्याचे का सांगितले जात आहे , असा सवाल त्याने केला.
मी माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने पडघा येथे गेले होतो , तिथे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे पोलिसांनी दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि म्हणून सात वर्ष मी फरार होतो , असे खान याने सांगितले. माझ्याजवळ पासपोर्ट आहे मात्र मी पाकिस्तानला कधीच गेलो नाही असे तो पुन्हा पुन्हा सांगत होता. तसेच माझ्या मुलींचे शिक्षण सुरु असून त्यावर याचा परिणाम होऊ नये याची आपल्याला काळजी आहे , असेही त्याने सांगितले. आता या केसमधून पूर्ण बाहेर पडून आपला व्यवसाय आणि कुटुंब सांभाळण्यासाठी आपण धडपडत असल्याचे तो म्हणाला.

No comments:
Post a Comment