Total Pageviews

Monday, 23 May 2011

7000 MANOURISHED CHILDREN IN THANE FEW KILOMETERS FROM ECONOMIC CAPITAL OF INDIA

ठाणे जिल्हय़ात आणखी सात हजार बालके कुपोषित
 देशाची आर्थिक राजधानी अवघ्या काही अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण वाढले असून, आधीच घोषित असलेल्या 1,874 कुपोषित बालकांमध्ये आता आणखी 7 हजार कुपोषित बालकांची भर पडणार असल्याने यंत्रणा सटपटली आहे.
कुपोषित बालकांचे चार o्रेणीर्पयत वर्गीकरण करता सध्या उंचीनुसार वजन करून सॅम (तीव्र कुपोषित) मॅम (मध्यम कुपोषित) या o्रेणींत वर्गीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांत सहा वर्षे वयोगटार्पयतची सुमारे चार लाख सहा हजार 536 बालके आहेत. यातील सुमारे सात हजार बालकांचे वजन अत्यंत कमी आढळले. 342 बालके दुर्धर आजाराने जर्जर झालेली आढळली.
जिल्ह्यातील पाच वर्षार्पयतच्या तीन लाख 42 हजार 571 बालकांचे वजन मोजण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने सर्वेक्षण केले. त्यात सात हजार बालके तीव्र कमी वजनाची तर 56 हजार 223 बालके मध्यम कमी वजनाची असल्याचे स्पष्ट झाले.
या सर्वाचा कुपोषित बालकांच्या यादीत समावेश करण्याची शिफारस आरोग्य विभागाने केली आहे.

----------------------------
बालक जन्माला येते तेव्हा साधारणपणे अडीच किलो वजन असणे अपेक्षित आहे. त्यानंतर, दर तीन महिन्यांनी वयानुसार या बालकांच्या वजनात दुप्पट वाढ होणे अपेक्षित असते.
 
 
 

No comments:

Post a Comment