Total Pageviews

Saturday, 21 May 2011

spread naxalism in maharashtra

चार कमांडो शहीद छत्तीसगड
, आंध्रातून नक्षलवादी गडचिरोलीत घुसतात महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांतील वातावरण बिघडवतात.
मुंबईत गँगवॉरचा भडका उडून गोळीबाराच्या घटना घडल्या तशा गडचिरोली भागातही नक्षलवाद्यांच्या कारवायांचा उद्रेक झाला आहे. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी त्याचप्रमाणे राज्याच्या सीमाही सुरक्षित नाहीत. विशेषत: आंध्र, छत्तीसगडच्या सीमेवरीलगडचिरोली’त नक्षलवाद्यांंनी पुन्हा उचल खाल्ली आहे. पोलीस नक्षलवादी पुन्हा आमनेसामने आले आहेत. भामरागड तालुक्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ जवानांत गुरुवारी पहाटे चकमक झाली. त्यात किमान पंधरा नक्षलवादी ठार चार कमांडो शहीद झाले. नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले नसले तरी १५-१६ नक्षलवादी ठार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नक्षलवाद्यांनी नरगोंडा परिसरातील पोलीस चौकीवर हल्ला केला त्यानंतर तिथे धुमशान झाले. यावेळी पोलीस जवानांनी दाखविलेल्या शौर्यास दाद द्यावी लागेल. नक्षलवाद्यांनी हल्ला केला म्हणून पोलिसांनी चौकी सोडली नाही, तर ते प्रतिकार करीत राहिले. दीड तास भयंकर धुमश्‍चक्री झाली. यात सी-६० बटालियनचा कमांडो चिन्ना मेंटा, विशेष पोलीस अधिकारी सुधाकर मट्टामी, मुन्शी पुनगाठी आणि सुरेंद्र कोठारे हे चार जवान शहीद झाले. दोन पोलीस जखमी झाले. हे सर्व लक्षात घेतले तर पोलिसांचे मनोधैर्य वाढले आहे नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्याची त्यांची तयारी आहे, हेच सिद्ध होते. रणांगणावर लढणार्‍यांनी दुश्मनास पाठ दाखवू नये. पाठीवर गोळी खाऊन आयुष्यभर बदनामीचे धनी होण्यापेक्षा छातीवर घाव झेलून शहीद होणार्‍यांचे स्मरण जनता सदैव करते. गडचिरोली परिसरात आतापर्यंत नक्षलवाद्यांंनी पोलिसांचे सामुदायिक हत्याकांड घडवून आणले मोठीच दहशत निर्माण केली. गडचिरोलीचा तेथील जंगलांचा ताबा या सशस्त्र नक्षलवाद्यांनी घेतला.पोलीस त्यांच्यासमोर कमजोर पडत असल्याचे चित्र होते. याच काळात राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डोक्यावर हेल्मेट वगैरे चढवून गडचिरोलीत स्कूटरवरून डबलसीटची सैरही केली गृहमंत्र्यांच्या या फटफटीवारीने नक्षलवाद्यांची पळापळ झाली अशीही अफवा पसरली, पण मधल्या काळात त्यांच्या कारवाया थांबल्या एवढे नक्की. गुरुवारी पहाटे नक्षलवादी घुसले त्यांनी हल्ला करताच जवानांनी त्यांचा बंदोबस्त केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांचा हल्ला नेटाने परतवून लावल्यामुळे नक्षलींचे पित्त खवळले आहे. त्यामुळेच गडचिरोली आणि भागात नक्षलवाद्यांनी आता दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. छत्तीसगड, आंध्रातून नक्षलवादी गडचिरोलीत घुसतात महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांतील वातावरण बिघडवतात. ते स्वत: खंडण्या गोळा करतात. पोलीस पाटील, तहसीलदार पदावरील व्यक्तीचे अपहरण करून मागण्या मान्य करून घ्यायच्या, पोलिसांना खबरी देणार्‍यांचे भरचौकात मुडदे पाडायचे. त्यामुळे लोकांत दहशत निर्माण होते. नक्षलवादी मंडळांचे काम विनासायास होते. मध्यंतरी ओरिसातील एका जिल्हाधिकार्‍यांचे अपहरण नक्षलवाद्यांनी केले त्यांना २२ दिवस ओलीस ठेवून मागण्या मान्य करून घेतल्या. हे झाले राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांतले, पण हा नक्षलवाद आणि त्यांच्या कारवाया आता शहरांतही घुसल्या त्यांची पाळेमुळे येथे पसरू लागली आहेत. महाराष्ट्राचीएटीएस’ म्हणजे दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून १० नक्षलवाद्यांंना पकडले. त्याआधी या प्रकारचे अनेकम्होरके’ पुण्यात पकडले गेले. हे सर्व लोक शहरी भागात राहून नक्षलवादी कारवायांची सूत्रे हलवीत असतील तर त्याकडे आताच गांभीर्याने पाहावे लागेल. नक्षलवाद म्हणजे दहशतवाद नसून गरीब, आदिवासी, नाडलेल्या-पिचलेल्यांनान्याय’ मिळवून द्यायची चळवळ हे चित्र आता बदलले आहे. कधीकाळी या चळवळीस मोठी सहानुभूती मिळाली होती स्वत: विचारवंत म्हणवून घेणाराबुद्धिजीवी’ वर्ग या चळवळीस छुपा पाठिंबा, अर्थात लपूनछपून देत होता. . बंगालात या चळवळीने जे रौद्ररूप धारण केले रेल्वेगाड्या बॉम्बस्फोटाने उखडण्यापासून ते पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत जे प्रकार झाले त्यामुळे हे लोक सहानुभूती गमावून बसले. ज्या प्रकारे ज्ञानेश्‍वरी एक्स्प्रेसचा अपघात घडवून शेकडो निरपराध मारले गेले तो प्रकार या चळवळीचा भेसूर चेहरा दाखवणाराच ठरला. या सर्व प्रकारांतून शेतकरी तसेच गरीबांवरील कोणता अन्याय दूर झाला नोकरदार पोलिसांना मारून कोणते प्रश्‍न सुटले याचे उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. नक्षलवाद का फोफावला? याचे उत्तर मंत्रालयाच्या कारभारात आहे, पण मंत्रालयाच्या पोटातले पाणीही हलत नाही त्या सर्व मंत्र्यांचे मजेत चालले आहे. सावकारीने शेतकरी मरतो आहे, बेरोजगारीने तरुणवर्ग सडतो आहे, पण सावकारही आनंदात सरकारही मस्त आहे. पोलीस,सरपंच,गरीब जनता वगैरे नाहक मारले जातात. या सर्व प्रकारांचे समर्थन कोणी करणार नाही. मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यासारख्या शहरांत नक्षलवादी घुसले आहेत.ते परराज्यांत गुन्हे करून इकडे घुसले आहेत. . बंगालच्या मिदनापुरातून पुण्यात १० नक्षलवादी घुसले. ते काही दगडूशेठ गणपतीची आरती करायला इकडे आले नव्हते किंवा पत्र्या मारुतीवर तेलाचा अभिषेक करायला आले नव्हते. शहरात घुसून मोक्याच्या जागा हेरून प्रसंगी डोके वर काढायचे मोठी आर्थिक उलाढाल करून पसार व्हायचे. म्हणजे त्यासाठी खून, अपहरण, दरोडे हे त्यांचे उद्योग आलेच. त्यातून आदिवासींना कोणता कसा न्याय मिळणार? गेल्या तीन दशकांत नक्षलवाद्यांंनी हजारावर पोलीस इतरांचे बळी घेतले. गेल्या महिनाभरातच ४० पोलीस जवानांच्या हत्या त्यांच्याकडून झाल्या आहेत. झारखंड, छत्तीसगड, आंध्रात हा रक्तपात सुरूच असतो. . बंगालातील सत्तांतरामुळे तेथील कचराही मुंबई-पुण्यात वाहत येऊ शकतो. त्यामुळे राज्याने सावध राहायला पाहिजे प्रसंगी त्यांच्या बंदुकीस त्याच पद्धतीने उत्तर देण्याची तयारी ठेवली पाहिजे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे आव्हान याआधीच स्वीकारले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण मुंबई-पुण्यासारख्या शहरात घुसलेले हे नक्षलवादीही तितकेच खतरनाक आहेत त्यांचे हात परदेशात पोहोचले आहेत. ते हात आजच कलम करा

No comments:

Post a Comment