Total Pageviews

Monday, 10 December 2018

चीनमध्ये तिबेटियन खतरेमें#humanrights violation in china #tibedtiyan PAR...



 झिजीयांग प्रांतात धुमाकूळ घालणारा इस्लामी दहशतवाद
झिनजिआंग प्रांतात मोठा हिंसाचार सुरू असून, यामध्ये २०१२ मध्ये १०० ठार झाले आहेत. 
"
ईस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मूव्हमेंट'चे पाकिस्तानानत प्रशिक्षण घेतलेले दहशतवादीच या हिंसाचाराला जबाबदार आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात येते.संघटनेने स्वतंत्र इस्लामी राज्याची मागणी केली आहे.  पाकिस्तानव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या चीनच्या सीमेवर झिनजिआंग हा प्रांत ,चीनचा सर्वांत संवेदनशील भाग मानला जातो. आठ देशांच्या सीमा या भागाशी जोडल्या गेल्या आहेत. या प्रांतात 41 टक्के लोकसंख्या उईगूर समुदायाची असून 40 टक्के लोक हंन जमातीचे आहेत. स्वतंत्र राज्याची मागणी करीत  
अल-कायदाशी लागेबांधे असलेल्या इस्ट तुर्कस्तान इस्लामी चळवळ (इटीआयएम) संघटनेच्या कारवायांनी चीनच्या झिजीयांग प्रांतात धुमाकूळ घातला आहे.  गेल्या काही वर्षांपासून या भागात उघर मुस्लीम पोलिसांमध्ये अनेक वेळा रक्तरंहित संघर्ष झाला आहे. 2009 मध्ये झिन्जियांगमधील उरुमकी येथे झालेल्या दंगलीत 200 लोक ठार झाले होते.
चिनी दहशतवाद्यांना पाकिस्तानचा आश्रय
उईगूर जमातीचे लोक अमेरिका, युरोपमध्येही असून, त्यांचाही येथील चळवळीला पाठिंबा असल्याचा चीनला कायम संशय असतो. तसेच उईगूरला "अल् कायदा' या दहशतवादी संघटनेचे समर्थन आहे.'' स्वातंत्र्यासाठीच्या सर्व चळवळी आतापर्यंत चीनने बळाचा वापर करीत मोडून काढल्या. मात्र "झिनजिआंगमधील हिंसाचार आतापर्यंत शमवता आला नाही. मागच्या वर्षी  झिनजिआंग प्रांतात हिंसाचार घडविणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांमध्ये प्रशिक्षण मिळाल्याचा आरोप चीनने केला. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने पाकिस्तान आणि चीन हे गेली अनेक वर्षे मित्र झाले आहेत. त्यामुळेच पाकिस्तानने दहशतवादाला कितीही आश्रय दिला तरी चीनने आतापर्यंत कधीही चकार शब्द उच्चारला नाही. जेव्हा स्वतःच्याच घराला आग लागायची वेळ आली तेव्हा मात्र चिनला जाग आली. 
झिनजिआंग प्रांतातील दहशतवादाबाबत चीनने पाकिस्तानवर दबावही टाकला, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

No comments:

Post a Comment