Total Pageviews

Wednesday, 19 December 2018

दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद अरुण करमरकर यांनी ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड

मुंबई : “कोणीही दहशतवादी म्हणून जन्माला येत नाहीत्यामुळे सामान्य माणूस नंतर बंदूक हाती का घेतो, याचा विचार करायला हवा.त्यामुळे दहशतवादी जन्माला येत नाहीत, तर ते घडवले जातात. त्यातच धार्मिक, सामाजिक, राजकीय तुष्टीकरणासाठी असाच हिंदू दहशतवादाचाही वापर केला गेला,” असे परखड मत केंद्र सरकारच्या आर्म फोर्सेस् आधुनिकीकरण कमिटीचे प्रमुख असलेल्या लेफ्ट. जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले. ते परममित्र पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ या मूळ इंग्रजीतून अनुवादित मराठी पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव आरव्हीएस मणी यांच्या ‘दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद अरुण करमरकर यांनी ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी वाचकांच्या भेटीला आणला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ताज हॉटेलमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आरव्हीएस मणी, अरुण करमरकर, प्रकाशक माधव जोशी, पत्रकार दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह मकरंद मुळे उपस्थित होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ताज हॉटेलमध्येच या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
आपल्या भाषणात दहशतवादाची संकल्पना उलगडताना लेफ्ट. जन. शेकटकर म्हणाले की, “दहशतवादाला, कुठलाही रंग नसतो. धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे काम पाश्चिमात्त्यांनी केले. इस्लामिक दहशतवादातून मग पुढे मतांसाठी, स्वत:च्या इच्छापूर्तीसाठी दहशतवादाला हिंदू धर्माशी जोडले गेले. विशेष म्हणजे, जे नेते हातात हिंदू धर्माच्याच नावाचा गंडा घालतातत्याच लोकांनी आपल्याच हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडलेत्यामुळे पृथ्वीवर राहणारी प्रत्येक सहावी व्यक्ती ही आज भारतीय असून ती जगभरात जिथे कुठे असेल, तिथे त्या प्रत्येकाला ‘हिंदू दहशतवादी’ म्हणावे का, असा प्रश्नही यावेळी शेकटकर यांनी उपस्थित केला.
दहशतवाद हा फिफ्थ जनरेशन वॉरफेअर असल्याचे सांगत, शेकटकरांनी, दहशतवाद ही एकप्रकारे मनी मेकिंग मशीन असल्याचेही अधोरेखित केलेदहशतवादाच्या जागतिक समस्येवरील उपाययोजनांविषयी बोलताना शेकटकर म्हणाले की, “सर्वप्रथम धर्माला दहशतवादाशी जोडता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे, भारतीयांनी आपली स्मरणशक्ती वाढवली पाहिजे. या संदर्भातील गोष्टी आपण सहजासहजी विसरता कामा नये. तिसरे महत्त्वाचे म्हणजे, राजनीती, कुटनीती, रणनीतीमध्ये सत्य बोलणे हे आत्महत्या करण्यासारखे आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सध्या धर्मयुद्ध नाही, तर धर्माच्या नावावर युद्धं लढली जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविलीकसाब हा आपल्यासाठी दहशतवादी, मात्र पाकिस्तानसाठी कसा हिरो ठरतो, लाल किल्ल्यावरील लाल निशाण आणि नक्षलवाद्यांची विचारसरणी यांचाही शेकटकर यांनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला.
 
सदर अनुवादित पुस्तकाचे लेखक अरुण करमरकर यांनी पुस्तकातील संदर्भांवर खासकरून दृष्टिक्षेप टाकला. २००६-२०१२ या काळातील दहशतवादी घटनांचा मणी यांनी इंग्रजी पुस्तकात वेध घेतला असून आजपर्यंत या पुस्तकातील आरोपांचा संबंधितांनी प्रतिवाद केला नसल्याची महत्त्वपूर्ण बाब करमरकर यांनी प्रारंभीच अधोरेखित केली. शिवाय, इंग्रजी पुस्तकाची दखल इंग्रजी माध्यमांनीच घेतली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविलीकेंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव आरव्हीएस मणी यांच्यावर २६/११ नंतर पुढच्याच महिन्यात गुदरलेल्या भयंकर प्रसंगाचे करमरकर यांनी कथन केले. ते म्हणाले की, “३० डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनातून परत येताना मणी यांना त्यांच्या गाडीचा पाठलाग होत असल्याचे समजले. पण, कसाबसा त्यांनी तो पाठलाग चुकवला व ते सुरक्षितरित्या घरी पोहोचलेनंतर मिळालेल्या माहितीनुसारमणी यांचे अपहरण करून त्यांना पाकिस्तानात नेण्याचा कट असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.कालांतराने मणी यांना त्यांच्या ८७ वर्षांच्या आईसमोर ‘टॉर्चर’ करण्यात आले आणि त्या धक्क्याने काही दिवसांतच त्यांच्या आईचेही निधन झाले.” पुढे बोलताना करमरकर यांनी २६/११ पासून इतरही दहशतवादी हल्ल्यांच्या तपासातील माजी गृहमंत्री पीचिदंबरम यांच्या संशयास्पद भूमिकेवर रोखठोेक भाष्य केलेमराठी वाचकांसमोर मणी यांच्या इंग्रजी पुस्तकातील ही सर्व थक्क करणारी तथ्ये उजागर व्हावीतम्हणून हे पुस्तक मराठीत अनुवादित केल्याची भूमिकाही करमरकर यांनी यावेळी बोलताना मांडली.
 
दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक आरव्हीएस मणी यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केलेमहाराष्ट्र ही हिंदू दहशतवादाची प्रयोगशाळाच असल्याची स्पष्टोक्ती करतमालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडन करून, ते जेव्हा या खटल्यातून निर्दोष मुक्त होतील, तेव्हाच या पुस्तकाचा खरा उद्देश सफल होईल, असे प्रारंभीच मणी यांनी सांगितले. २००६ नंतर हिंदू दहशतवादाचा भ्रम कसा देशभर पसरविण्यात आला, याची खासकरून महाराष्ट्रातील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मणी यांनी पोलखोल केली. “पूर्व महाराष्ट्रात नक्षलवाद, तर पश्चिमेला किनारपट्टीवरील दहशतवादी हल्लेही टाळता आले असते,” असेही ते म्हणाले.
 
२६/११ च्या हल्ल्याबद्दल बोलताना मणी यांनीदहा सशस्त्र दहशतवादी समुद्रकिनार्‍यानजीकच्या बधवार पार्कमधून संध्याकाळी रहदारीच्या वेळी कुलाब्यापर्यंत, ताज हॉटेलपर्यंत टॅक्सीतून आले आणि त्याचा कोणालाच संशय कसा आला नाही, हा प्रश्न उपस्थित करत, या हल्ल्यात ‘इनसाईड हँड’ असल्याची दाट शक्यताही बोलून दाखविली. “शिवाय, या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात नौसेनेला या दहशतवाद्यांच्या आगमनाची सूचना असूनही त्यांनी पुढील कारवाई केली नसल्याचा ठपका नौसेनेवर ठेवला, जो नौसेनाप्रमुखांनी खोडूनही काढला,” अशी माहितीही मणी यांनी दिलीचिदंबरम यांनी या खटल्याशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप मणी यांनी यावेळी केला.
 
त्याचबरोबर इशरत जहाँ प्रकरणी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांना गोवण्याचा कट असून त्या प्रकरणीही मणी यांच्यावर कशाप्रकारे केंद्र सरकारकडून उच्च न्यायालयातील अ‍ॅफिडेविटमध्ये फेरफार करण्याकरिता दबाव टाकण्यात आला, याचेही मणी यांनी वर्णन केले. ते म्हणाले की, “पण, मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही. माझ्या आई-वडिलांसमोर माझा अनन्वित छळ केला गेला. पण, देश सर्वोतोपरी मानून मी काम केले,” असे अंगावर शहारा आणणारे पुस्तकात मांडलेले वैयक्तिक अनुभवही मणी यांनी यावेळी कथन केले. तसेच, या पुस्तकातील सर्व माहिती ही कोणतीही परिकल्पना नसून ती प्रमाणित तथ्येदस्तऐवजांच्या आधारावर मांडली असल्याचेही मणी यांनी बोलताना सांगितलेप्रकाशक माधव जोशी यांनी आपल्या भाषणात पुस्तक प्रकाशनामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होतेसदर कार्यक्रमाला टीजेएसबी सहकारी बँक आणि पितांबरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
 
दहशतवादी हल्ल्याचा किनारी राज्यांना सर्वाधिक धोका : शेकटकर
 
गुजरातपासून ते पश्चिम बंगालपर्यंत किनारी राज्यांचा जीडीपी जास्त असून आर्थिक उलाढालीची महत्त्वाची केंद्रेही याच राज्यात आहेत.त्यामुळे समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याचा किनारी राज्यांना सर्वाधिक धोका आहे. पण, दहशतवादी समुद्र किनार्‍यावरुन येणार नाहीत, तर समुद्रातूनच तीन-चार किमी अंतरावरुन रॉकेटमिसाईल यांचा मारा करु शकतात आणि त्यामुळे होणारे नुकसान हे आधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा मोठे असेल. तेव्हा, सरकारसह नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज लेफ्ट. जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी यावेळी बोलून दाखविली

No comments:

Post a Comment