Total Pageviews

Friday 28 December 2018

आपल्या स्वभावाचा आणि* *आजारांचा संबंध काय आहे ?* ✴

*
तर आता आपण जाणून घेऊया की मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो...

१) अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.

२) स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.

३) अती क्रोध व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.

४) अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.

५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.

६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुप्फुसाचे रोग होतात.

७) आपलं तेच खरं / मी म्हणेन तीच पूर्व दिशा, अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्ठता होते.

८) दु:ख दाबुन ठेवल्याने फुप्फुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.

९) अधिरता, अतिआवेश, घाई-गडबड अशा सवयींमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.

१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.

११) प्रेम / प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.

१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.

१३) हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.

तर मग आता आपल्या  रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.

✳     *वरील ज्ञान होमिओपॕथी*     ✳ 
               *औषधीपद्धतीतून*

No comments:

Post a Comment