Total Pageviews

Thursday, 20 December 2018

*सावधान*! *सावधान*! *सावधान*!गाय, मंदिर, मशिद, धर्म, धर्मग्रंथ, राष्ट्रध्वज यांविषयी सुद्धा तुम्हाला भडकवणारा मेसेज तुमच्याकडे येऊ शकतो. कृपया असे मेसेज पुढे पाठवू नका


२०१९ च्या निवडणुका जवळ येत आहेत. जातीय तणाव वाढवण्यासाठी आणि दंगली भडकवण्यासाठी अतिशय योग्य हंगाम जवळ आलाय. आता दंगली घडवण्याची कारस्थाने शिजू शकतात. सोशल मिडिया आणि विकाऊ इलेक्ट्रॉनिक मिडियातून अनेक खोट्या-नाट्या बातम्या पसरवल्या जाऊ शकतात. फोटोशॉपने तयार केलेले फोटो, एडीट केलेले व्हिडीओ, जातीय भावना भडकावणारे मेसेजेस फॉरवर्ड करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. दलित, मुस्लिम, शेतकरी, आदिवासी कुणाही विरुद्ध कसलाही मजकूर तुमच्याकडे आला तर फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून बघा. गाय, मंदिर, मशिद, धर्म, धर्मग्रंथ, राष्ट्रध्वज यांविषयी सुद्धा तुम्हाला भडकवणारा मेसेज तुमच्याकडे येऊ शकतो. कृपया असे मेसेज पुढे पाठवू नका. आपल्याच देशातील व्यक्तींविरुद्ध विष पसरवू नका. *तुम्ही फॉरवर्ड केलेला एक मेसेज अनेकांच्या घरांची राखरांगोळी करायला कारणीभूत ठरू शकेल.* आणि एक लक्षात ठेवा, आज ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत. आज त्यांच्याविरुद्ध रान पेटवले जाईल. उद्या आपल्याविरुद्ध रान पेटवले जाणार आहे. त्यावेळी आपल्या मदतीला येण्यासाठी कुणी शिल्लक रहावे. अनेक राजकारण्यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून पैसा कमावून परदेशात सुरक्षित ठेवला आहे. त्यांची मुलेबाळे परदेशात मस्त शिक्षण, व्यवसाय सांभाळत आहेत. आपण मात्र एकमेकांची डोकी फोडत आणि घरे जाळत बसलो आहोत. म्हणून विनंती की, राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनू नका. *त्यांनी छू म्हटले की कुणावरही भुंकायला आणि चावायला आपण काही त्यांनी पाळलेले कुत्रे नाही आहोत.* आपण या देशाचे देशप्रेमी नागरिक आहोत. या देशातील नागरिकांवर प्रेम करणारे सच्चे देशप्रेमी आहोत. म्हणून आज आपण या देशातील कोणत्याही समुदाय, धर्म वा जातीविरुद्ध कसल्याही प्रकारचा अपप्रचार न करण्याची शपथ घेऊया. देशप्रेमी नागरिकाचे कर्तव्य पार पाडूया. 
आपणा सर्वांना विनंती आहे की ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी ही पोस्ट हिंदी, इंग्रजी किंवा अन्य भाषांमध्ये भाषांतरित करून भारतातील सर्व नागरिकांपर्यंत पोचवावी. कॉपी-पेस्ट केले तरी चालेल. नाव टाकले नाही तरी चालेल. पण हे आवाहन सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजे.

No comments:

Post a Comment