https://www.youtube.com/watch?time_continue=4&v=VbJy7D37cRI
एका बाजूला या योजनेमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंधांत एक नवा अध्याय सुरू होईल, असे म्हटले जाते. पण, पाकिस्तानी राज्यकर्त्यांमध्ये या उद्देशपूर्तीप्रती नेहमीच गांभिर्याचा अभाव पाहायला मिळाला.
एका बाजूला या योजनेमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंधांत एक नवा अध्याय सुरू होईल, असे म्हटले जाते. पण, पाकिस्तानी राज्यकर्त्यांमध्ये या उद्देशपूर्तीप्रती नेहमीच गांभिर्याचा अभाव पाहायला मिळाला.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेपलीकडील दोन्ही बाजूंना असलेल्या धार्मिक स्थळांना एकमेकांशी जोडण्याचे काम हे या दोन्ही देशांतील नागरिकांना जवळ आणू शकते. शिवाय दोन्ही देशांतील सरकारेदेखील आपल्या तणावग्रस्त संबंधांत सुधारणा घडवण्याच्या मार्गातील एक नवा टप्पा म्हणून याकडे पाहतील. २६ नोव्हेंबर, २०१८ रोजी याच आशेसह भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुरुदासपूर जिल्ह्यातील मान या गावात कर्तारपूर कॉरिडोरचे भूमिपूजन केले. दुसरीकडे सीमेपलीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी २८ नोव्हेंबरला या प्रकल्पाचा पाया रचला. केंद्र सरकारमधील हरसिमरत कौर आणि हरदीप सिंह सुरी आणि पंजाब राज्य सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू व अमृतसरचे खा. गुरजीत सिंह यावेळी उपस्थित होते. कर्तारपूर कॉरिडोर एक प्रस्तावित मार्ग आहे, जो भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळील शीख धार्मिक स्थळ गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक साहेब (पंजाब-भारत) आणि गुरुद्वारा दरबार साहेब कर्तारपूर (पंजाब-पाकिस्तान) या दोन ठिकाणांना जोडणारा आहे. प्रस्तावित योजनेनुसार भारतातील भाविकांच्या कर्तारपूर यात्रेसाठी भारत-पाकिस्तान सीमेवर ४.७ किमी लांब मार्ग सुरू करण्यात येणार आहे, ज्याचा वापर करून प्रवास करण्यासाठी व्हिसाची आवश्यता नसेल.गुरुनानक यांच्या ५५० व्याजयंती सोहळ्याआधी म्हणजेच २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत या मार्गाची उभारणी पूर्ण करण्याची योजना आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
‘डेरा बाबा नानक’ (भारताच्या पंजाबातील गुरुदासपूरमध्ये) रावी नदीच्या किनारी प्रदेशातील पखोहे नामक गाव होते. ‘डेरा बाबा नानक’मध्ये सध्या तीन प्रसिद्ध गुरुद्वारे आहेत. इथे गुरुनानक देव ध्यान करत असत आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील १८ वर्षे इथे व्यतित केली.भविष्यात महाराजा रणजीत सिंग यांनी इथे गुरुद्वारा उभारला. विशेष म्हणजे, गुरुनानक यांनी १५०४ साली कर्तारपूर इथेच पहिली शीख संगत आयोजित केली होती. सध्या जिथे गुरुद्वारा दरबार साहिब आहे, तिथेच १५३९ साली गुरुनानक देव ईश्वरात विलीन झाले. १९४७ सालच्या फाळणीवेळी ‘रेडक्लिफ लाईन’ने या धार्मिक स्थळाला दोन भागांत विभाजित केले. फाळणीमुळे गुरुदासपूर तालुका भारतात राहिला, तर कर्तारपूर पाकिस्तानात गेले. सध्या कर्तारपूर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवल जिल्ह्यात आहे. उल्लेखनीय म्हणजे, जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या शासनकाळात सन २००० मध्ये पाकिस्तानमधील शीख भाविकांना विनाव्हिसा इथे यात्रा करण्याची सुविधा देण्यासाठी तयार होती. परंतु, त्याने अशा काही अटी ठेवल्या की, ज्या पूर्ण करणे शक्य नव्हते. पाकिस्तानातील नवनिर्वाचित सरकारमुळे मात्र, या दिशेने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये नवी ऊर्जा आली आहे.
सामरिक दृष्टिकोन
गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने वृद्धी झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये दडून बसलेले हाफिज सईद आणि मसूद अझहरसारखे दहशतवादी म्होरके तिथले सरकार आणि लष्कराच्या इशाऱ्यावर नेहमीच भारतातील शांतताभंग करण्यासाठी गुंतलेले असतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून संबंध सुधारण्याच्या नावाखाली रस्ता बांधण्यासाठी तयारी दर्शवणे शंकास्पद होऊन जाते. पाकिस्तानध्ये इमरान खान यांच्या राजकीय यशामागे पाकिस्तानी लष्कराचा किती मोठा हात आहे, हे उघड गुपित आहे. अशा परिस्थितीत या योजनेला पाकिस्तानी लष्कराची सहमती नसेल, असे होऊच शकत नाही. दुसरीकडे काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे इमरान खान यांच्या शपथविधीला हजर होते. त्यावेळी त्यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांची गळाभेट घेतली. यावेळी जनरल बाजवा यांनी सिद्धू यांना आमची कर्तारपूर कॉरिडोर सुरू करण्यात विशेष रुची असल्याचे सांगितले होते आणि ही गोष्टी सिद्धू यांनी स्वत: सांगितलीदेखील आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय सातत्याने भारताविरोधात कटकारस्थान रचण्यात व्यस्त आहेत. जम्मू-काश्मीरमधील सक्रिय दहशतवादी आणि खलिस्तानी दहशतवादी या दोहोंत सामंजस्य करून भारताविरोधातील दहशतवादी कारवायांना एक नवी धार यावी, अशी पाकिस्तानची आकांक्षा आहे. (पाकिस्तानात या योजनेच्या शिलान्यासप्रसंगी खलिस्तानी गोपाल सिंग चावला उपस्थित होता. जो की, गेल्या काही वर्षांपासून आयएसआय आणि हाफिज सईदच्या सदैव संपर्कात आहे.)पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादाच्या सूत्रधारांकडून भारताच्या पंजाबमध्ये ड्रग्सचा व्यापार विस्तारण्याच्या दृष्टीने कर्तारपूर कॉरिडोरचा एखाद्या साधनासारखादेखील वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, या रस्त्याच्या आधाराने तस्करी आणि भारतात अवैध घुसखोरी करण्याचा एक मार्गदेखील खुला होऊ शकतो, ज्यावर सतत निगराणी ठेवण्याची आवश्यता असेल. सोबतच खलिस्तानी दहशतवाद्यांच्या सक्रिय सहकार्याने पंजाबमध्ये पुन्हा एकदा अशांतता पसरवण्याची षडयंत्रेदेखील केली जाऊ शकतील.
पाकिस्तान आपल्या दहशतवादाला समर्थन देण्याच्या कारवायांमुळे जगभरात एकटा पडला आहे. पाकचा घनिष्ठ सहकारी म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेनेदेखील त्यापासून दूरच राहणे पसंत केले आहे. ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ने पाकिस्तानला या कारवायांतून बाहेर पडण्यासाठी कठोर इशारा आणि वेळमर्यादा घालून दिली आहे. शिवाय पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटांचादेखील सामना करत आहे.अशा स्थितीत भारताबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न जागतिक समुदायाला भ्रमित करण्याचा प्रयत्नदेखील असू शकतो, ज्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल. गुरुदासपूर आणि आणि त्याच्या जवळील प्रदेश सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. इथे बीएसएफची टिबरी छावणी आहे. जवळच पठाणकोटमध्ये आशियातील सर्वात मोठे शस्त्रागार आणि एक हवाईतळ तसेच छावणीदेखील आहे आणि ही सर्वच ठिकाणे नेहमीच पाकिस्तानच्या निशाण्यावर राहिली. पठाणकोटवर याआधीच एक मोठा दहशतवादी हल्ला झालेला आहे. अशा स्थितीत भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण परिवर्तन करणे आवश्यक ठरेल.
हा कॉरिडोर केवळ कर्तारपूर आणि गुरुदासपूर या दोन ठिकाणांतला मार्गच उघडणार नाही, तर दोन्ही देशांतील चर्चेसाठी एक संधीदेखील देत आहे. या मार्गामुळे दोन्ही देशांतील लोकांना आपापसात मिसळण्याचा एक पर्याय उपलब्ध होईल. दोन्ही देशांतील लोक परस्परांच्या संपर्कात येतील, ज्याचा लाभ अप्रत्यक्षरित्या भारताला होऊ शकतो. कारण, पाकिस्तानी जनतेत राजकीय आणि सामाजिक सुधारण व मोकळेपणाच्या अपेक्षा यामुळे वाढू शकतात. एका बाजूला या योजनेमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंधांत एक नवा अध्याय सुरू होईल, असे म्हटले जाते. पण, पाकिस्तानी राज्यकर्त्यांमध्ये या उद्देशपूर्तीप्रती नेहमीच गांभिर्याचा अभाव पाहायला मिळाला. यात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या शासकांचाही समावेश होतोच होतो. याच परंपरेला पुढे नेत पंतप्रधान इमरान खान या कॉरिडोरच्या शिलान्यासप्रसंगीदेखील कुरापत काढण्यातच धन्यता मानता दिसले आणि त्यांनी यावेळीही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यातूनच पाकिस्तान भारताशी संबंध सुधारण्याबाबत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. एकेकाळी इमरान खान क्रिकेटमधील एक उत्तम आणि वेगवाग गोलंदाज म्हणून ओळखले जात, त्यामुळे ते ही गोष्ट चांगलीच समजतात की, चेंडू कितीही वेगाने फेकला तरी त्याच्या ‘लाईन’ आणि ‘लेन्थ’मध्ये गडबड झाली, तर त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. जर पाकिस्तान भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी खरोखरच गंभीर असेल, तर त्याने दहशतवाद आणि हिंसक साधनांचा त्याग करून चर्चेच्या टेबलावर यावे. केवळ जगाला दाखवण्यासाठी प्रकट केलेले सद्भावनेचे सोंग टिकाऊ नव्हे, तर टाकाऊच असते.
-
No comments:
Post a Comment