• राष्ट्रीय एकात्मता-ऐक्य टिकवणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य
• माओवाद किंवा कुठल्याही सुरक्षेच्या प्रश्नावर आपली भूमिका निर्भीडपणे मांडली पाहिजे. हे वैचारिक युद्ध माओवाद्यांशी युद्धपातळीवर करून ते जिंकण्याकरता देशप्रेमी नागरिकांची आवश्यकता आहे.
सामान्य माणूस आपल्या जीवनात देशासाठी काय करू शकतो
• झुंड्शाही देशभक्ती नाही
• बस, रेल्वे या ‘सार्वजनिक’ मालमत्तांचे नुकसान, देशभक्ती नाही
• आपापलं काम व्यवस्थित करणं हीच देशभक्ती
• रस्त्यावरील सिग्नल पाळणं ही देशभक्ती आहे,
• रस्त्यावर न थुंकणं ही देशभक्ती आहे,
• स्त्रियांचा आदर करणं ही देशभक्ती आहे,
• दिलेला शब्द पाळणं ही देशभक्ती आहे, दिलेली वेळ पाळणं ही देशभक्ती आहे,
• भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं ही देशभक्ती आहे, लाच न देणं ही देशभक्ती आहे,
सामान्य माणूस आपल्या जीवनात देशासाठी काय करू शकतो
• सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ही देशभक्ती आहे,
• आपल्याआधी लोकांचा विचार, ही देशभक्ती आहे,
• रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत न नाचणं ही देशभक्ती आहे, चूक मान्य करणं ही देशभक्ती आहे,
• जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं ही देशभक्ती आहे,
• सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे,
• मतदान करणं ही देशभक्ती आहे, योग्य उमेदवार निवडणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं, ही देशभक्ती आहे,
• वाद न घालता काम करणं ही देशभक्ती आहे,
• जागा मिळेल तिथं मलमूत्र विसर्जन न करणं ही देशभक्ती आहे,
• इतिहासापासून शिकणं ही देशभक्ती आहे,
• सामान्य माणूस आपल्या जीवनात देशासाठी काय करू शकतो
• गतकालातील गोष्टींवर वाद न घालणं ही देशभक्ती आहे,
• स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं ही देशभक्ती आहे,
• महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार् यकर्ते--धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम न माजवणं ही देशभक्ती आहे,
• चांगल्या कामात कोलदांडा न घालणं ही देशभक्ती आहे,
• स्वत:पलीकडे पाहणं ही देशभक्ती आहे आणि "सुजाण नागरिक' बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे.
• ज्या देशामधील नागरिक देशाचे नागरिक म्हणून घेण्यास पात्र असतात, त्या देशाला प्रगती करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते. प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करणं हीच आजच्या काळातली देशभक्ती आहे.
सामान्य माणूस आपल्या जीवनात देशासाठी काय करू शकतो
• साध्या साध्या हजारो कामांची यादी करता येईल.
• रस्त्यानं नीट आणि वेग मर्यादित ठेवून वाहन चालवणं, रस्ता क्रॉस करणाऱ्यांना रस्ता ओलांडू देणं, आपल्या वाहनाची धडक बसून कोणी पडणार नाही, जखमी होणार नाही, मरणार नाही अशी सावधगिरी बाळगणं, ही देशभक्ती आहे
• रस्त्यांवरचे दिवे लावणं आणि सूयोर्दयाला ते बंद करणं,
• शिक्षकांनी नीट शिकवणं, परीक्षकांनी उत्तरपत्रिका नीट तपासून परीक्षांचे निकाल वेळच्या वेळी लावणं, ही देशभक्ती आहे
• सरकारी कार्यालयातली काम नियमानुसार करणं, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, अशी पाटी सरकारी कार्यालयात लावण्याची पाळी न येणं,
• अचानक संप अथवा बंद पुकारून सामान्य माणसांना वेठीला न धरणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामं भराभर संपवणं, 'वरकमाई' चा मोह न धरणं. ही देशभक्ती आहे
• माझ्या प्रिय,मित्रानो
• देशप्रेम हे आपण केवळ सोयीने वापरण्याची, स्वातंत्र्य सैनिक आणि लष्करावर सोपवलेली बाब नसावी.
• आज आपला भारत तरुणांचा देश आहे.
• तरुणाईत भारत बलशाली होण्याचे स्वप्न "स्वामी विवेकानंद,सरदार वल्लभभाई पटेल,ईन्दीरा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलामांनी पाहिले.
• देशाच्या सीमा, सुरक्षा-संरक्षणाचे काय?
• अंतर्गत सुरक्षेचा सर्वांत मोठा धोका
• भारताच्या सरहद्दीवर आक्रमण प्राचीन काळापासून होत होते, होत आहे.
• युद्धे झाली, यापुढेही होतील.
• देशासाठी जगणं, देह झिझवणं यात परमार्थ आहे.
• राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे
• "महाराष्ट्र हा भारताचा "खड्गहस्त झाला पाहिजे' हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे शब्द
मी माझ्या देशाला काय देऊ शकतोदेशासाठी आपल्या जवळ दहा मिनिटे आहेत का?''
• देश सुरक्षा ,देश प्रेम आणि सामान्य नागरिकांची जबाबदारी
• प्रत्येक नागरिकाने देशाच्या सुरक्षेकरिता काही वेळ (दहा मिनिटे) रोज खर्च करायला हवे.
• प्रत्येक नागरिकाने सैनिक आणि गुप्तहेर बनणे जरूरी
• आपण जर सुरक्षा दलाचे कान आणि डोळे बनलो तर आपला भाग सुरक्षीत होऊ शकतो.
• आतन्क वाद्याना/ माओवाद्यांना कसे ओळखावे याचे प्रशिक्षण पोलीस, होमगार्ड नागरिकांना देऊ शकतील.
• आपल्या मुलांना शिक्षण आणि कामावर पाठवून सुरक्षित ठेवता येईल.
• वनमाफिया वर लक्ष ठेवावे. मिळालेली माहिती गुप्तपणे सुरक्षा दलांकडे पोहचावी.
• विधवा आणि अनाथ मुलांची ज्येष्ठ नेत्यांची मदत घेऊन काळजी घ्यावी.
• जास्तीत जास्त तरूणांनी पोलीस होम गार्ड, स्पेशल पोलीस अधिकारी म्हणून भरती व्हावे.
• अकार्यक्षम सरकारी अधिकाऱ्यांची माहिती वरच्या अधिकाऱ्यांना आणि लोक प्रतीनिधींना द्यावी.
• विकास योजनांच्या अंमलबजावणी वर लक्ष ठेवावे. भ्रष्टाचाराची माहिती सरकारी अधिकारी, पोलीस, भ्रष्टाचार विरोधी खाते, पत्रकार आणि नेत्यांना ,पोलीसांना गुप्तपणे द्यावी.
• गुन्हेगारी/दहशतवादी/माओवाद्यां मध्ये सामील असलेल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना शरण येण्यास प्रोत्साहन द्यावे.
वैचारीक दहशतवाद
• चिन, सौदी अरेबिया,पाकिस्तानचे पैसे घेऊन दहशतवादी, नक्षलवादी,बांगलादेशी घुसखोरांना मदत करणार्या सामाजिक संस्था यावर लक्ष
• भरकटलेले तरुण,राष्ट्रविरोधी लिखाण करणारे काही पत्रकार, वर्तमानपत्रे,
• राष्ट्रविरोधी संकेतस्थळे एस एम एस,ई मेल, पाठवणारे
• सोशल मिडीया वर(फ़ेस बुक,ट्वीटर,यु ट्युब) देशद्रोही लिखाण
• अनेक राष्ट्रद्रोही विचारवंत माओवाद्यांना समर्थन करणारी वक्तव्ये, भाषणे, चर्चासत्रे करतात, अशा भाषणांना , लेखांना विनाकारण प्रसिध्दी देण्याचे काम टीव्ही वाहिन्या, वर्तमानपत्रे का करतात?
• त्यांनी या वेचारिक आतंकवादाचे उदात्तीकरण करायला हवे का?
• वर्तमानपत्रे व टीव्ही वाहिनी यांची काही कर्तव्ये आहेत की नाही?
• गुन्हेगारी/दहशतवादी/माओवादि/ची न /पाकीस्तनवादी विचारवंत जे हिन्सांचाराचे समर्थन करतात ,त्या समर्थकांशी वैचारिक लढाई.
• नागरिकांनी सरकारला वैचारिक लढाई लढण्यास मदत करावी.
• हर हर महादेव ! भारत माता की जय !! वंदे मातरम्!
.
No comments:
Post a Comment