Total Pageviews

Friday, 16 November 2018

स्टार्टअप इंडिया’, ‘स्टॅण्ड अप इंडिया’ या त्यापैकीच काही योजना, तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी व्यावसायिकांना कर्जरूपाने निधी उपलब्ध-TARUN BHARAT

आपण काहीतरी नवीन उपक्रम सुरू केला, ज्यातून कितीतरी हातांना काम मिळाले, बाजारपेठेत पैसा खेळू लागला, त्या आपल्या कामाची दखल सरकारने घेतली आणि आपल्या कामाचा सन्मानही केला, ही भावना नवउद्योजकांत वाढीस लागेल. यातूनच आणखी कित्येकांना उद्योग-व्यवसायाच्या मार्गावर चालण्याची इच्छा होईल.
 
कोणत्याही देशाच्या विकासात उद्योगधंदे इंजिनाचे काम करतात. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी उद्योगांची उभारणी, भांडवलाची गुंतवणूक, उद्योजकांची, उद्योगउभारणीच्या प्रेरणेची आवश्यकता असते. देशातल्या मोठ्या लोकसंख्येला रोजगार देण्याचे काम उद्योगांतूनच होते,म्हणूनच उद्योगव्यवसायाला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरतेदेशात नरेंद्र मोदींचे सरकार अस्तित्वात आल्यापासूनच उद्योगउभारणीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्टॅण्ड अप इंडिया’ या त्यापैकीच काही योजना, तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी व्यावसायिकांना कर्जरूपाने निधी उपलब्ध करुन देण्यात सरकारने आघाडी घेतलीनुकतीच केंद्र सरकारने नवोदित उद्योजकांना ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार - २०१८’ देऊन सत्कार करणार असल्याची घोषणा केली. तरुण, होतकरू आणि उद्योगव्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना उद्योग उभा करणाऱ्या उद्योजकांना हे पुरस्कार देण्यात येतील. एखादा उद्योग सुरू होतो तेव्हा त्याचे स्वरूप निश्चितच छोटे असते. पण या छोट्या उद्योगांतच एकत्रितरित्या देशातली मोठी लोकसंख्या गुंतलेली असते. सध्याच्या काळात केवळ देशाचीच नव्हे तर जगाचीही अर्थव्यवस्था सुधारणारे आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारे हेच क्षेत्र आहेआता अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी राबणाऱ्या या उद्योजकांच्या पाठीवर सरकारच कौतुकाची थाप देणार असेलतर ती नक्कीच नवउद्योजकांना प्रेरणादायी ठरेल, यात कोणतीही शंका नाही.
 
देशात शिक्षणाचा प्रसार झाला, प्रांरभीच्या काळात धनाढ्यांनी उद्योगांचीही स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर तर केंद्र सरकारनेच निरनिराळ्या क्षेत्रात उद्योग उभारले, काही ताब्यातही घेतले. जे काही करायचे ते सरकारनेच, अशी धारणा तत्कालीन नेतृत्वात होती. समाजवादाच्या स्वप्नील राजकारणाचाच तो काळदरम्यानच्याच काळात सरकारी नोकरी म्हणजे राजेशाही थाट, अशी अवस्था निर्माण झाली. एकदाची का सरकारी नोकरी मिळाली की, मग कसलीही चिंता नाही व कामाचे मूल्यमापन करणारे कोणीच नसल्याने जो तो सरकारी नोकरीच्या मागे धावू लागला. ९० च्या दशकात खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणाने परकीय गुंतवणुकीला देशाची कवाडे खुली करण्यात आलीपरिणामी इथून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ लागल्याआयटी व सेवाक्षेत्राच्या उदयानंतर नोकऱ्या करणाऱ्यांना भलेमोठे वेतनही मिळू लागलेअशा एकूणच परिस्थितीत देशातल्या तरुणवर्गात ‘नोकरी एके नोकरी’ चीच भावना तयार झाली. पण महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येकालाच नोकरी देण्याएवढी सरकारी आणि खाजगी क्षेत्राची कुवत कधीही नव्हती आणि आताही नाहीपरिणामी या मोठ्या लोकसंख्येला जिकडे आवश्यकता आहे, तिकडे वळवणे गरजेचे होते. हे क्षेत्र अर्थातच उद्योग-व्यवसायाचे होते. स्वप्नील समाजवादामुळे उद्योजक म्हणजे जणू काही चोरच अशीही वृत्ती अनेकांनी बाळगलेली होती, तिचाही निपटारा करणे आवश्यक होते. म्हणूनच मोदी सरकारने प्रथमपासूनच तरुणांना स्वतःचा काही उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.उद्योजकांबद्दल बाळगलेले गैरसमज दूर करत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणाऱ्या या क्षेत्राच्या मागे खंबीरपणे उभे राहत केंद्र सरकारने परवानगी-मंजुरीसंदर्भातल्या अनेक किचकट प्रक्रिया सोप्या केल्या. छोट्या उद्योगांना करसवलत, अनुदान, कर्जावर कमी व्याजदर अशा स्वरूपात सहकार्यही केले. सरकार आता अशाच मेहनती उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेत आहे. ज्यामुळे आपण काहीतरी नवीन उपक्रम सुरू केला, ज्यातून कितीतरी हातांना काम मिळाले, बाजारपेठेत पैसा खेळू लागला, त्या आपल्या कामाची दखल सरकारने घेतली आणि आपल्या कामाचा सन्मानही केला, ही भावना नवउद्योजकांत वाढीस लागेल. यातूनच आणखी कित्येकांना उद्योग-व्यवसायाच्या मार्गावर चालण्याची इच्छा होईल.
 
कोणाची तरी चाकरी करण्याच्या कातडीबचावू संस्कृतीपासून नाविन्याचा ध्यास घेऊन व्यवसायाकडे वळणेहे खरोखरच जोखमीचे काम.शिवाय बहुतांश नवे आणि छोटे उद्योग ग्रामीण भागातच उभे राहतात, त्यामुळे ते नक्कीच आव्हानात्मक काम. आपल्या गावाशी, आपल्या मातीशी नाळ टिकवून तिथे विकासाचे, प्रगतीचे प्रवाह निर्माण करणारे हे नवउद्योजक अनेक संकटांचा सामना करत टिकून राहतात, आपल्या उद्योगांना मोठे करतात. अन्नप्रक्रिया, फळप्रक्रिया, मशीन टूल्स, बीपीओ, कृषीविषयक सल्ला आदी विविध क्षेत्रांत पाय रोवून सध्या असे अनेक उद्योग उभे आहेतमहिलादेखील उद्योग उभारणीत हिरीरीने सहभागी होत असून खाद्यपदार्थच नव्हे तर अन्य क्षेत्रांतही आपले कर्तृत्व गाजवताना दिसतातव्यापाराची पार्श्वभूमी नसलेल्या अशा सर्वांनाच सुरुवातीच्या काळात नक्कीच धाकधूकही वाटली असेल. आपण सुरू करत असलेला उद्योग चालेल की नाही, लोकांना आपण देणार असलेली सेवा वा उत्पादने आवडतील की नाहीसरकार आपल्याशी कशी वर्तणूक करेलअसे वेगवेगळे प्रश्नही त्यांच्यापुढे उपस्थित झाले असतीलपण त्या सर्वांवर मात करून आज या नवउद्योजकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहेअशा नवउद्योजकांच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहेजेणेकरून आतापर्यंत आपण जे केले ते कौतुकास पात्र तर होतेच पण आपल्याकडून सरकारच्याही काही अपेक्षा आहेत आणि सरकारही आपल्या पाठीशी उभे आहेयाची जाणीव त्यांच्या मनात निर्माण होईलम्हणूनच केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन आणि नवउद्योजकांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

No comments:

Post a Comment