Total Pageviews

Friday 9 November 2018

सध्या नूरानी महाशय, भारताच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं होणार तरी काय, अशा चिंतेत पडले आहेत आणि ती चिंता त्यांनी व्यक्त कुठे केली, तर पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्रात.-TARUN BHARAT

अब्दुल गफार अब्दुल मजीद नूरानी हे नाव तुम्हाला माहिती आहे का? बरं, ए. जी. नूरानी हे नाव तरी माहिती आहे का? बरोबर! तेच ‘ते’ लेखक महाशय! जे देशभरच्या मोठमोठ्या इंग्रजी वृत्तपत्र-मासिकांमधून राजकारण, समाजकारण, स्वातंत्र्य आंदोलन, संरक्षण, इस्लाम, हिंदुत्व इत्यादी विषयांवर विद्वत्ताप्रचुर लेख, निधर्मीपणाचा आव आणून लिहीत असतात. इरफान हबीब, रफीक झकेरिया वगैरे मुसलमान विचारवंतांप्रमाणेचते स्वत:ला ‘निधर्मी’ म्हणवतात आणि इंग्रजीत लिहितात, बोलतात. याचाच साध्या भाषेतला अर्थ असा की, ते ‘हिंदुत्वविरोधक’ आहेत. पण, असं म्हणायचं नाही बरं का! असं पाहा की, या देशात भाषा, प्रांत, जाती, वेश, समजुती, पद्धती यामध्ये अमर्याद वैविध्य आहे. म्हणजेच भारत हा देश आणि इथला समाज ही ‘प्लुरलिस्टिक सोसायटी’ आहे आणि ही विविधता हजारो वर्षांपासून इथे आहे, आम्ही ती मानतो. म्हFणून ज्यांचं असं म्हणणं आहे की, हे हिंदू राष्ट्र आहे; ते त्यांचं प्रतिपादन तार्किकदृष्ट्या चुकीचं आहे, ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही ते अमान्य करतो.
वाकाय तर्कशास्त्र आहे! काय बुद्धिवाद आहे! याला म्हणतात विचारवंत! तर नूरानी हे अशा विचारवंतांच्या मांदियाळीतील एक आहेत. सध्या ते ८८ वर्षांचे आहेत. ते मूळचे मुंबईचे. मुंबई उच्च न्यायालयात उत्तम वकील म्हणून नावलौकिक मिळवल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकिली केलीकायद्याच्या कलमांचाआपल्या अशिलाला अनुकूल असा अर्थ लावणे आणि न्यायालयापुढे तशी मांडणी करणे, हे कोणत्याही कुशल वकिलाचं कर्तव्यच असतं. त्यासाठीच अशील त्याला पैसे देत असतंनूरानी महाशयांचं मोठा अशील म्हणजे शेख अब्दुल्ला. काश्मीरचा भारतात विलय करणं हे कसं अन्याय्य आहे; शेख अब्दुल्लांना भारत सरकारने काही वर्षं नजरकैदेत ठेवलं होतं, ते कसं अन्याय्य आहे, इत्यादी गोष्टींवर त्यांनी अत्यंत विद्वत्ताप्रचुर पुस्तकं, लेख लिहिले आहेत. भाषणं केली आहेत. तीच गोष्ट हैद्राबाद संस्थानची. निजाम-उल्-मुल्क हा हैद्राबाद संस्थानचा अधिपती आपलं राज्य भारतात विलीन करायला तयार नसताना, सरदार पटेलांनी पोलीस कारवाई करून ते विलीन करणं हे कसं चुकीचं आहे, याचं विवेचन करणारी पुस्तकं, लेख, भाषणं नूरानी महाशय, आपलं सगळं वकिली कौशल्य पणाला लावून करत असतात. नूरानी आणि त्यांच्या सहप्रवासी विद्वानांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, हिंदू समाजाला ज्यामुळे बरं वाटेल, सुख वाटेल, असं एखादं वाक्यदेखील ते कटाक्षाने लिहीत नाहीत. उदा. त्यांचं जीना आणि टिळक यांच्यावरचं पुस्तक पाहा. महंमद अली जीना हे लोकमान्य टिळकांपेक्षा २० वर्षांनी लहान होते आणि एकेकाळी ते टिळकांचे अनुयायी होते. पण, असं म्हणायचं नाही. कारण, मग टिळक मोठे ठरतात ना! म्हणून मग पुस्तकाचं नाव ‘जीना अ‍ॅण्ड टिळक : कॉम्रेडस् इन फ्रीडम स्ट्रगल’ असं ठेवायचं आणि पुस्तकातलं प्रतिपादनही तशाच रोखाने करायचं. असो. तर सध्या नूरानी महाशय, भारताच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं होणार तरी काय, अशा चिंतेत पडले आहेत आणि ती चिंता त्यांनी व्यक्त कुठे केली, तर पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्रात. आता या ‘डॉन’चीदेखील मोठी गंमतच आहे. ‘इंडियन मुस्लीम लीग’ या आपल्या राजकीय पक्षाची बाजू इंग्रजी भाषेत मांडण्यासाठीमहंमद अली जीनांनी १९४१ साली ‘डॉन’ हे साप्ताहिक दिल्लीत सुरू केलं. जीनांचा फाळणीकडे नेणारा सगळा विषारी, विखारी हिंदुत्वविरोध प्रकटला तो ‘डॉन’मधूनच.१९४४ साली ‘डॉन’ साप्ताहिकाचा दैनिक बनला आणि १९४७ साली फाळणीपूर्वीच दिल्लीहून कराचीला स्थलांतरित झाला. 
पाकिस्तानात वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांना काय किंमत दिली जातेहे सगळ्या दुनियेला माहिती आहे. सौदी अरेबियन युवराज महंमन-बिन-सलमान आणि सौदी पत्रकार जमाल खाशोगी याचा रहस्यमय खूनया प्रकरणावरून सध्या जगभरच्या वृत्तपत्रांचे रकाने ओसंडून वाहत आहेत. पण, त्याबद्दल नूरानी यांनी कुठे चिंता व्यक्त केलेली नाही. कारण, हा विषय मुसलमानांशी संबंधित आहे नाज्या तुर्कस्तानमध्ये खाशोगी नाहीसा झाला, तो तुर्कस्तान खरं म्हणजे इस्लामी देशांमधील एकमेव निधर्मी देश. केमाल पाशा उर्फ कमाल अतातुर्क याने मोठ्या हिमतीने तुर्कस्तानला इस्लामच्या कचाट्यातून बाहेर काढून आधुनिक निधर्मी देश बनवला, अशी त्याची मोठी परंपरा. त्या देशाचे सध्याचे अध्यक्ष रसीप तय्यीप एर्देगान हे पुन्हा देशाला कट्टर इस्लामी बनवण्याच्या मागे लागलेत आणि ते करताना राजकीय विरोधकांसह लेखक, पत्रकार यांनाही चेपून टाकतात, याबद्दल नूरानींना चिंता वाटत नाही. त्यांना चिंता पडलीय भारताची. “ग्रंथांवर बंदी घालणं हे ग्रंथ जाळून टाकण्यासारखंच आहे, हिटलरशाहीची आठवण करून देणारं आहे,” असं ते म्हणतात. नूरानींची निधर्मी चिंता एकदम उफाळून येण्याची दोन तात्कालिक कारणं म्हणजे ‘दी ब्रिटिश राज’ आणि ‘औरंगजेब : दी मॅन अ‍ॅण्ड दी मिथ’ नावाची दोन पुस्तकं. सॅम्युअल मार्टिन बर्क हा इंग्रज आय.सी.एस. अधिकारी फाळणीनंतर पाकिस्तानातच राहिला. त्याने पाक नागरिकत्व तर घेतलंच, पण पाकिस्तानी परराष्ट्र खात्यात त्याने बरीच मोठी कामगिरी केली. अनेक पुस्तकं लिहिली. पाक राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांच्या काळात त्याला ‘सितारा-ए-पाकिस्तान’ असा किताब मिळाला. २०१० साली तो १०४ वर्षांचा होऊन मरण पावला. त्याने आणि सलीम अल्दिन कुरेशी नावाच्या ब्रिटिश लायब्ररीतील विद्वानाने मिळून लिहिलेले ‘दी ब्रिटिश राज’ नावाचं पुस्तक आता प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकावर भारत सरकारने बंदी घातली आहे. बंदीचं कारण देताना सरकारी अधिकारी म्हणाले की, “यात सरदार पटेलांविषयी अनुचित मजकूर आहे.”
दुसरा किस्सा तर आणखी रंजक आहेऑड्रे ट्रुश्कनावाची कुणी एक महिला अमेरिकेत न्यूजर्सीच्या रुटगर स्टेट युनिव्हर्सिटीत इतिहासाची प्राध्यापिका आहे. ‘साऊथ एशियन स्टडीज’ हा तिचा विभाग आहे. झटपट पैसा आणि झटपट प्रसिद्धी हवी असेल तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना भरवायचा, हे जसं जगभरच्या धंदेवाईकांना कळलं होतं; तसंच विद्यापीठ क्षेत्राचंही आता झालं आहे. झटपट नावलौकिक, प्रतिष्ठा, कीर्ती, पैसा हवा असेल, तर एखादा मुसलमान बादशहा, मुसलमान पंथ, बादशाही यांच्यावर एकदम विद्वत्ताप्रचुर भाषेत, खूप अभ्यास वगैरे करून लिहिलंय असा आभास निर्माण करणारं एखादं पुस्तक लिहायचं. त्यात मुसलमानांची तरफदारी करायची आणि हिंदुंची नालस्ती करायची. हे उघड-उघड नाही करायचं बरं का! तशा रोखाने लिहायचं. म्हणजे पाहा, अलाउद्दिन खिलजी हा फार पराक्रमी आणि न्यायीसुद्धा होता बरं का! पण, कधीकधी त्याला हिंदुंवर जुलूम करावे लागले. काय करणार? शेवटी तो माणूसच होता. राणा रतनसिंह रावळने एवढी सुंदर बायको स्वत: करण्याऐवजी अल्लाउद्दिनलाच देऊन टाकायचीम्हणजे एवढा रक्तपात टळला नसता का?
असो. तर या ऑड्रे ट्रुश्क नावाच्या महिलेने ‘औरंगजेब : दी मॅन अ‍ॅण्ड दी मिथ’ नावाचं पुस्तक लिहिलंय. त्याला बंदी नाही, पण त्यावर भाषण करण्यासाठी ती भारतात आली. तिचे दोन कार्यक्रम हैद्राबादमध्ये ठरले, पण दोन्ही रद्द करावे लागले. अखेर दिल्लीत तिचं भाषण झालं एकदाचं. तिच्या पुस्तकात आणि भाषणात जाणत्या मंडळींना काहीही नवीन आढळलं नाही. जुन्या दिल्लीवर अजूनही मुसलमानी राजवटीचा प्रभाव आहे. नव्या दिल्लीवर तो नाही. तिथे ऑड्रचं भाषण होऊ शकलं, पण हैद्राबाद शहर, निजामाची राजधानी, जिथे आजही इस्लामचा मोठा प्रभाव आहे; तिथे बजरंग दलाच्या आक्षेपामुळे औरंगजेबावरील कार्यक्रम रद्द करावे लागलेहे नूरानींचं खरं दु:ख... त्यावरून मग त्यांना वेंडी डोनिगर या विद्वान महिलेची नि तिच्या ‘दी हिंदुज’ या ग्रंथावरच्या बंदीचीही आठवण येते. या ग्रंथावर झालेल्या चौफेर टीकेमुळे प्रकाशकांनी ते पुस्तकालयांमधून काढून घेतलं, याचं त्यांच्यातील वकिलाला जास्त दु:ख होतं. वेंडी डोनिगर ही अमेरिकन विदुषी भारतविद्यातज्ज्ञ म्हणजे ‘इंडॉलॉजिस्ट’ आहे. पण, तिला स्वत:ला इतर खंडीभर पदव्या लावण्यापेक्षा नुसतं ‘संस्कृततज्ज्ञ’ म्हणवून घ्यायला आवडतं. १९७३ साली तिचा पहिला मोठा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचं नाव ‘शिव : अ‍ॅन एरॉटिक अ‍ॅसेटिक’ म्हणजे ‘शिव : एक कामुक बैरागी.’ खेरीज हिंदू पुराणांमधील दुष्ट व्यक्ती, पशू वगैरे तिचे बरेच ग्रंथ आहेत. एखाद्या भव्य राजवाड्यात सुशोभित दालनंही असतात, देवघरही असतं आणि संडासही असतो. आपण कुठे रमायचं ते आपल्यावर असतं. वेंडी डोनिगर कोणत्या अभ्यासात रमली ते आपल्याला तिच्या विषयांवरून कळलंच असेल. तिच्या ग्रंथांची हकालपट्टी झाल्यामुळे तिच्याहीपेक्षा कदाचित जास्त दु:ख नूरानींना झालं आहे. आपण अशा विद्वान, निधर्मी वकिलांना ओळखून असावं आणि त्यांच्या मायावी ‘प्लुरलिस्टिक’ राजकारणालाही ओळखून असावं.

No comments:

Post a Comment