Total Pageviews

Sunday 1 May 2011

चव्हाणांच्या सासूला ६५ लाख सीबीआय तपासात माहिती CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 104

अशोक चव्हाणांच्या सासूला ६५ लाख सीबीआय तपासात माहिती उघड
INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 104
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/ 
. टा. खास प्रतिनिधी आदर्श घोटाळ्यात मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेल्या अशोक चव्हाण यांच्या सासू भगवती शर्मा यांनी आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांच्याकडून ६५ लाख रुपये २००९ साली चेकने घेतल्याची माहिती सीबीआय तपासात उघड झाल्याचे समजते. हा व्यवहार झाला तेव्हा चव्हाण महसूलमंत्री होते. आदर्श घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. चव्हाण यांच्या सासू शर्मा यांना बर्वे यांनी ६५ लाख रुपयांचा चेक दिला होता. परंतु हे कर्ज नव्हते. त्यामुळे ही रक्कम देण्यामागील कारणांचा शोध सुरू आहे. या पैशांच्या बदल्यात बर्वे यांच्या वडिलांना 'आदर्श'मध्ये फ्लॅट देण्यासाठी चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांनाही आदर्शमध्ये फ्लॅट मिळाले. त्यासंदर्भातही सीबीआय चौकशी करीत आहे.
चव्हाण हे मंत्री असताना त्यांच्या सासूंनी एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडून चेकने कशी रक्कम घेतली, तसेच इतकी रक्कम बर्वे यांच्याकडे कुठून आली, असा प्रश्न सीबीआयला पडला आहे. सीबीआय आता याबाबत आयकर खात्यामार्फत माहिती मागविणार आहे. चव्हाण आणि बर्वे यांच्यातील आर्थिक संबंधाबाबत सीबीआय माहिती घेत आहे. रिअल इस्टेटमधील काही बड्या कंपन्याना पार्किंग लॉट मिळाले होते. यावेळी चव्हाण यांच्याकडे नगरविकास खाते होते. तसेच त्याचवेळी बर्वे हे वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे या दिशेनेही सीबीआयचा तपास सुरू आहे.
कर्ज घेतले नाही !
विनोद शर्मा यांचा खुलासा
माझी आई भगवती शर्मा हिच्या निधनानंतर आदर्श सोसायटीतील सदस्य राहण्यास आम्हाला स्वारस्य नाही, असे आम्ही सोसायटीला याआधीच कळविले आहे. तसेच माझ्या आईने तिच्या हयातीत कधीही कर्ज घेतले नाही. संजय बर्वे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कोणताही आथिर्क व्यवहार केलेला नसून बर्वे कुटुंबीयांशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा भगवती शर्मा यांचे पुत्र विनोद शर्मा यांनी केला आहे. 'माझ्या आईच्या निधनानंतर शर्मा कुटुंबांचा प्रमुख म्हणून मी खुलासा करीत आहे. माझ्या आईने बर्वे यांच्याकडून कर्ज घेतले, असे वृत्त प्रसिद्ध करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बर्वे यांच्याकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही', असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
पैसे दिले नाहीत संजय बर्वे यांचा दावा आदर्श सोसायटीशी संबंधित कुणाही व्यक्तीला मी पैसे दिलेले नाहीत. सीबीआय आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कागदपत्रात काही तरी गफलत झाली असावी असे मला वाटते. माझ्या वडिलांच्या नावे आदर्श सोसायटीत फ्लॅट आहे आणि त्यांनी त्याचे रितसर पैसे दिले आहेत. या पलीकडे पैशाचा कोणताही व्यवहार झालेला नाही, असा खुलासा आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांनी केला आहे

No comments:

Post a Comment