Total Pageviews

Friday 18 November 2011

NAXALS RULE GADCHIROLI & CHANDRAPUR

नक्षलवादग्रस्त भागातील ग्रामभेटीची योजना बारगळली अधिकाऱ्यांच्या थंड प्रतिसाद
राबणारे जवान देखील वैतागले
 नक्षलवाद विरोधी मोहिमेत सहभागी असलेले जवान राबवत असलेल्या ग्रामभेटीच्या योजनेला इतर खात्यांकडून अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने ही योजनाच आता बारगळल्यात जमा आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या थंड प्रतिसादामुळे जीवावर उदार होऊन ही योजना राबवणारे जवान देखील वैतागले आहेत.शासनाने तयार केलेल्या नक्षलवाद विरोधी धोरणात युध्दासोबतच विकासाला सुध्दा तेवढेच प्राधान्य देण्यात आलेले आहे. यातूनच काही वर्षांपूर्वी ग्रामभेटीची संकल्पना समोर आली. नक्षलवाद्यांचा प्रभाव असल्यामुळे गडचिरोली गोंदिया जिल्ह्य़ातील दुर्गम भागात प्रशासनाचे अस्तित्व जाणवत नाही. त्यामुळे सामान्य जनता प्रशासनात मोठी दरी निर्माण झाली आहे. या दुर्गम भागात शोध मोहिमा राबवणाऱ्या केंद्रीय राज्य पोलिसांच्या जवानांनी प्रशासन सामान्य जनतेत सेतू म्हणून काम करावे, या उद्देशाने ग्रामभेटीची योजना तयार करण्यात आली. शोध मोहिमेच्या निमित्ताने दुर्गम भागातील गावांमध्ये जाणाऱ्या जवानांनी जनतेच्या वैयक्तिक सामूहिक समस्यांची, तसेच तक्रारींची नोंद घ्यायची आणि नंतर या तक्रारी त्या त्या खात्याकडे निराकरणासाठी पाठवाव्यात, असे या योजनेचे स्वरूप होते. प्रारंभीच्या काळात या योजनेला स्थानिक जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा जवानांमार्फत मिळणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याने शोध मोहिमा राबवणारे जवान वैतागले आहेत. गेल्या चार वर्षांत जवानांनी गोळा केलेल्या हजारो तक्रारी त्या त्या खात्याकडे पाठवल्या, मात्र त्याच्या सोडवणुकीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. नक्षलवाद्यांकडून धोका आहे, असे कारण समोर करत प्रशासनातील अधिकारी कर्मचारी या तक्रारींच्या निराकरणासाठी दुर्गम भागात दौरेच करायला तयार नसल्याने बहुसंख्य कार्यालयांमध्ये या तक्रारी पडून आहेत, अशी माहिती पोलीस दलातील एका जबाबदार अधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलतांना दिली. जवानांकडे दिलेल्या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याने दुर्गम भागातील गावकरी सुध्दा वैतागले आहेत. शोध मोहिमा राबवतांना दुसऱ्यांदा त्याच गावात जाणाऱ्या जवानांना या गावकऱ्यांना काय उत्तर द्यायचे, हेच कळेनासे झाले आहे. दुर्गम भागात शोध मोहिम राबवणे अतिशय जोखमीचे काम आहे. अशा मोहिमा राबवतांना अनेकदा जवानांचा नक्षलवाद्यांशी संघर्ष उडतो. अशा विपरीत स्थितीत गोळा केलेल्या तक्रारींची दखल प्रशासनातील इतर खात्याचे अधिकारी कर्मचारी घेत नसतील तर ही योजनाच कशासाठी राबवायची, असा सवाल या अधिकाऱ्याने उपस्थित केला. या योजनेला आणखी बळ मिळावे म्हणून दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने गडचिरोली परिक्षेत्रासाठी तीन कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर केला. हा निधी गडचिरोलीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी भलत्याच योजनेवर खर्च करून टाकल्याची माहिती या पोलीस अधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलतांना दिली. शोध मोहिमा राबवणारे जवान तक्रारीच्या माध्यमातून का होईना, पण गावकऱ्यांशी संवाद निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे शासनाच्या नक्षलवाद विरोधी धोरणात या ग्रामभेटीच्या योजनेला मोठे महत्व देण्यात आले होते, मात्र इतर खात्यातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे सुरू केल्याने ही योजना आता बारगळल्यात जमा आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेंतर्गत जनजागरण मेळावे सुध्दा घेण्यात येतात. यासाठी इतर खात्यांना सुध्दा निमंत्रित करण्यात येते. गेल्या दोन वर्षांत या अधिकाऱ्यांना याकडेही पाठ फिरवणे सुरू केले आहे. या माध्यमातून सुध्दा जनतेच्या अनेक तक्रारी गोळा होतात, मात्र अधिकारीच येत नसल्याने या तक्रारंींचे काय करायचे, असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना पडला आहे. गेल्या दहा दिवसांपासून भामरागडची दूरध्वनी सेवा नक्षलवाद्यांनी बंद पाडली होती. ती त्वरीत कार्यान्वित करावी, असे लेखी पत्र अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांनी बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. त्याला प्रतिसाद देता या अधिकाऱ्यांनी भामरागड परिसरात शोध मोहीम राबवून नक्षलवादी नाहीत, याची खात्री करावी, त्यानंतरच बीएसएनएलचे अधिकारी दुरुस्तीसाठी या भागात जातील, असे पत्र पोलिसांना दिले. यावरून या भागातील अधिकाऱ्यांची मानसिकता लक्षात येते
माओवादी नक्षलवादी हे दहशतवाद्यांपेक्षा भयंकर छत्तीगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सीआयएसएफच्या पथकावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.रायपूर- छत्तीगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पथकावर बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. सीआयएसएफचे पथक गस्त घालत होते. आकाशनगर येथील बिचेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय खाण विकास संस्थेच्या परिसरात सीआयएसएफचे जवान गस्त घालत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान मारले गेले असून चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment