Total Pageviews

Thursday, 3 November 2011

BOYCOTT CHINESE GOODS SAVE INDIAN INDUSTRY

देशी बोकडाला चिनी बोकडाची टक्कर
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 03, 2011 AT 03:15 AM (IST)
मुंबई - चिनी वस्तूंपाठोपाठ आता चिनी बकऱ्यांनीही भारतीय बाजारपेठेवर आक्रमण सुरू केले आहे. बकरी ईदच्या निमित्ताने "झिंक्‍स' म्हणून ओळखल्या जाणारे चिनी बकरे देवनारमध्ये विकले जात आहेत. शौकीन ग्राहक कुर्बानीसाठी या बोकडांसाठी दहा हजारांपासून ते थेट दीड लाखापर्यंतची किंमत देत आहेत.

बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी देवनारच्या बाजारात लेह-लडाखपासून थेट उटी-म्हैसूरपर्यंतचे बकरे दाखल झाले आहेत. रंगरूपाने आणि किमतीनेही आपली वैशिष्ट्ये जपत पाच लाखांपेक्षा अधिक बकऱ्यांनी हा बाजार फुलला आहे. सर्वाधिक मागणी महागड्या अशा "दुंबा' जातीच्या बोकडांना असली तरी "झिंक्‍स' हे चिनी बकरे मुख्य आकर्षण आहेत.

भायखळ्यातील बकऱ्यांचे व्यापारी रियाझ यांनी लडाखहून तीन-चार महिन्यांचे काही "झिंक्‍स' आणून त्यांना पाळले. त्यापैकी दहा महिन्यांच्या छोट्या "झिंक्‍स'ची विक्री दहा हजारांपासून ऐंशी हजारांपर्यंत झाली आहे. दोन-अडीच वर्षांच्या मोठ्या "झिंक्‍स'ची किंमत दीड लाखांपर्यंत आहे. हौस म्हणून रियाझ लडाखमधील गावांमधून चिनी बकऱ्यांची खरेदी गेली चार वर्षांपासून करत आहेत. ""लडाखला झिंक्‍सची छोटी पिलं तीन-चार हजारांना मिळतात. त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. गोरखपूरमार्गे रेल्वेने ती आणली जातात. इथल्या हवामानात त्यांची काळजी घेणे आणि त्यांचा आहार चांगला ठेवणे आवश्‍यक असते,'' असे रियाझ यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांच्याकडील आठ "झिंक्‍स'ची विक्री झाली आहे. आता केवळ दोन उरले आहेत. "झिंक्‍स' बाजारात नवीन आहे. मात्र, शौकीन ग्राहक त्याच्याविषयी आवर्जून चौकशी करतात. चवीला मात्र भारतीय बकऱ्यांपेक्षा हा वेगळा नाही. ""हा चिनी असला तरी इतर चिनी मालासारखा बनावट नसून, "ओरिजिनल' आहे,'' असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

उटीचे "दुंबा'ही लोकप्रिय
उटीमधील गावांमधून अगदी शोधून आणलेल्या "दुंबां'नाही बाजारात मागणी आहे. ते प्रत्येकी अडीच लाख रुपयांपर्यंत विकले जातात. पुण्यातील हिंजवडी येथील दलालसिंग उद्यसिंग चितोडीया हे काश्‍मीरपासून उटीपर्यंत फिरून बकरी ईदसाठी "दुंबां'ची खरेदी करतात. "खूप कमवता तुम्ही', असे विचारल्यावर मात्र ते हिरमुसले. "खूप पैसे येतात, पण ते पुन्हा सावकारालाच जातात. देशभर फिरून चांगले बकरे शोधण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. ते फेडून हातामध्ये 80 हजारांपर्यंत उरतात. त्यावर वर्ष काढायचे असते.' "दुंबा' खूपच मांसल असल्याने त्याला थोडेही खरचटले तरी रक्‍त येऊ शकते. त्यामुळे त्याला काटासुद्धा रुतू नये, यासाठी हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घ्यावी लागत असल्याची माहिती चितोडीया यांनी दिली. त्यांना ज्वारी शिजवून किंवा मका आणि चण्याचा भरडा आहारात द्यावा लागतो.
प्रतिक्रिया
On 03/11/2011 07:43 PM anshu said:
पुण्यातील हिंजवडी येथील दलालसिंग उद्यसिंग चितोडीया हे काश्‍मीरपासून उटीपर्यंत फिरून बकरी ईदसाठी "दुंबां'ची खरेदी करतात. "खूप कमवता तुम्ही', असे विचारल्यावर मात्र ते हिरमुसले. "खूप पैसे येतात, पण ते पुन्हा सावकारालाच जातात. देशभर फिरून चांगले बकरे शोधण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. ते फेडून हातामध्ये 80 हजारांपर्यंत उरतात. त्यावर वर्ष काढायचे असते. अबब...किती गरिबी...ते नाही मटण खात का?
On 03/11/2011 06:29 PM sharad said:
समस्त प्राणी प्रेमी या काळात उंदरा सारखे लपून बसतात व मटणावर चांगलाच ताव मारतात.
On 03/11/2011 10:44 AM makarand ghule said:
अहिंसा मानणाऱ्या भारत देशात बकरी ईद च्या निमित्ताने हिंसेचे खूप समर्थन केले जाते. का नाही हा उत्सव सुद्धा हिंदू उत्सवाप्रमाणेच एको फ्रेंडली पद्धतीने साजरा केला जावा. आयडिया जरा विचित्र वाटते ना, विशेष करून मांसाहार करणाऱ्या लोकांना.

No comments:

Post a Comment