Total Pageviews

Friday, 18 November 2011

MISSING WOMEN IN MUMBAI

हरवणा-या व्यक्तींचे काय होते, या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी देता येत नाही. प्रत्येक हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागतोच असे नाही. पोलिसांकडे इतक्या जबाबदा-या असतात की, अशा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न फारसा होत नाही.
हरवणा-या व्यक्तींचे काय होते, या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी देता येत नाही. प्रत्येक हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागतोच असे नाही. पोलिसांकडे इतक्या जबाबदा-या असतात की, अशा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न फारसा होत नाही. त्यामुळे अशी हरवलेली व्यक्ती परत घरी येणे हे अपघातानेच होत असते. त्यामुळे हरवलेल्या व्यक्तींचे काय होते, म्हणजे त्या कुठे पळून जातात, स्वेच्छेने निघून जातात, त्यांचे अपहरण होते, घरातील त्रासाला कंटाळून जातात की त्यांची हत्या होते, कारण काहीही असू शकते.. पोलिस तपास सुरू असतो. कुटुंबीयांनी पुढाकार घेतला तर रेल्वे स्थानकावर त्यांचे स्पष्ट-अस्पष्ट फोटो झळकतात. पोलिसांच्या वेबसाइटवर फोटो झळकतात. पोलिसांची जबाबदारी तिथेच संपते.
 
गेल्या पाच वर्षात 6508 अल्पवयीन मुलं आणि 3673 अल्पवयीन मुली पोलिसांना सापडल्या. एकूण 10 हजार 181 मुलांपैकी 9056 मुला-मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. आणखी 250 मुला-मुलींच्या पालकांचा वा त्यांच्या घराचा शोध सुरू आहे. रेल्वे पोलिस आयुक्त प्रभात कुमार यांनी गेल्याच आठवडय़ात ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीबरोबर आणखी एक आकडेवारी त्यांनी जाहीर केली. ती आहे हरवलेल्या महिलांची. गेल्या दहा महिन्यांत 46 महिला पोलिसांना सापडल्या, त्यापैकी 42 महिलांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं. या सज्ञान महिला होत्या. अर्थात ही आकडेवारी फक्त रेल्वे पोलिसांना आढळलेल्या महिलांची आहे. देशभरातून शेकडोने रेल्वे गाडय़ा मुंबईत येतात, त्यामधून आलेल्या या महिला होत्या. रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या अशा भेदरलेल्या महिला लगेच ओळखून येतात. पोलिसांना आणि समाजकंटकांनाही. समाजकंटकांची किंवा दलालांची नजर पडण्याआधी पोलिसांच्या नजरेस आल्या तरच त्यांना घराची परतीची वाट सापडू शकते, नाहीतर मग बहुतेकींचा रस्ता ठरलेला असतो.
मुंबई ही अशी नगरी आहे की, इथून अनेक दिशांना वाटा फुटतात, तशाच अनेक दिशांनी येणा-या वाटा इथे संपतात. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येणा-यांची संख्या असते, तशी येथून बाहेर जाणा-यांची संख्याही मोठी असते. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत येणा-या मुलं किंवा महिलांपैकी बहुतेक उत्तर प्रदेशातून आलेले असतात. घरातली भांडणांबरोबरच अन्य अनेक कारणे त्यामागे असू शकतात. पोलिसांना किंवा सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना अशा हरवलेल्या महिला आढळल्या तर त्यांना घरी पाठवण्याबरोबरच सुधारगृहात पाठवून त्यांचं पुनर्वसन करण्याचाही प्रयत्न असतो. त्या जर दलालांच्या तावडीत सापडल्या तर मात्र त्यांचे शक्यतो त्यांची रवानगी रेडलाइट एरियातच होत असते. मुंबईतून गायब होणा-या महिलांनाही अनतिक व्यवसायासाठी विकलं जातं. जगभर असा मानवी व्यापार चालतो आणि त्यात भारताची आíथक राजधानी मुंबई आघाडीवर आहे.
 
येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. घरात भांडण झाल्यामुळे किंवा पालक रागावल्यामुळे घर सोडून आलेल्या मुलांना परत पाठवल्यावर त्यांचे पालक त्यांचा स्वीकार करतात. परिस्थितीमुळे घर सोडून आलेल्या मुलांच्याबाबतीत ही गोष्ट थोडी कठीण असते. महिलांच्या बाबतीत तर ती अधिकच बिकट असते. घर सोडलेल्या सज्ञान महिलेला पोलिसांनी परत पाठवले तरी तिला घरचे लोक स्वीकारतातच असे नाही किंवा ती महिला पुन्हा घरीच राहील असे नाही. कारण अशा हरवलेल्या महिलांचे जगणेही कुठे तरी हरवून गेलेले असते.
"अनेकदा घराच्या समस्यांमुळे किंवा पालक नसल्यामुळे मुले घरातून पळून जातात. यातील सर्वच तक्रारींची नोंद पोलिसांकडे नसते. त्यामुळे पोलिस जी आकडेवारी जाहीर करतात त्यामध्ये आणि वास्तवात बराच फरक असतो. अशा घरातून पळून आलेल्या मुला-मुलींना आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत असून पोलिसांच्या सहकार्याने त्यांचे पुनर्वसन केले जाते. महिलांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना स्वावलंबीपणे जगता यावे यासाठी राज्य सरकारने विविध योजना राबवल्या आहेत." - प्रीती पाटकर, प्रेरणा सामाजिक संस्था, संचालक
  • मुंबईत गेल्या दोन वर्षात दररोज 28 व्यक्ती हरवतात.
  • 2009 आणि 2010 मध्ये मुंबईतून हरवलेल्या व्यक्ती : 21 हजार
  • त्यामध्ये 18 ते 35 वयोगटातील महिला :

No comments:

Post a Comment