Total Pageviews

Thursday, 3 November 2011

CORRUPT RTO PUNE

'आरटीओ'नेच नेली 'नो एंट्री'तून गाडी
-
Friday, November 04, 2011 AT 05:15 AM (IST)
Tags: rto,   no entry,   crime,   hadapsar,   pune


हडपसर - आरटीओची गाडी नोबेल रुग्णालयासमोर नियम धाब्यावर बसवून "नो एंट्री'मधून जाताना. (संदीप जगदाळे - सकाळ छायाचित्रसेवा)

हडपसर - वाहतूक नियमांचे धडे देणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यानेच प्रवेश बंदीचा नियम धाब्यावर बसवीत आपली गाडी "नो एंट्री' तून दामटली, शिवाय असाच नियमभंग करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करता तिलाही मोकाट सोडले. मात्र, परिसरातील दक्ष नागरिकांनी पोलिसांची भूमिका बजावत ट्रकला अडवून धरल्याने नाइलाजाने तिच्यावर कारवाई करणे त्याला भाग पडले. हडपसर येथील नोबेल रुग्णालयाजवळ गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला.

नगर बाह्यवळण रस्त्यावरील नोबेल रुग्णालयापाशी सकाळी साडेदहाच्या सुमारास धोकादायकरीत्या लोखंडी सळया घेऊन निघालेला ट्रक आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला. वजन करण्यासाठी त्याला त्याने वजन काट्याजवळही नेले. तथापि, तेथेच एका आडोशाला त्यांच्यात "गुफ्तगू' झाली आणि त्याने त्याला सोडून दिले. पुढे तर नोबेल रुग्णालयाकडून प्रवेश बंदी असलेल्या मार्गाने जाण्याची मुभाही त्याने ट्रकचालकाला दिली, इतकीच नव्हे तर जातीने वाहतूक थांबून त्याच्यासाठी मार्ग मोकळा करीत त्याच्यापाठोपाठ हे अधिकारीही आपल्या गाडीतून (एमएच 04-ईपी 2000) वेगळ्या मार्गाने मात्र नो एंट्रीतूनच पुढे गेले.

'सकाळ'च्या प्रतिनिधीने या साऱ्या प्रकाराची छायाचित्रे काढली. त्या वेळी तर आरटीओच्या गाडीवरील चालक उद्दामपणे म्हणाला, 'काढा फोटो, काढायचे तेवढे, आम्हाला काही फरक पडत नाही.'' त्यानंतर त्याने आपली गाडी भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने नेली. या प्रकाराने चिडलेल्या नागरिकांनी सोलापूर रस्त्यावरच बेशिस्त ट्रकला अडवून आरटीओ अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईची माहिती घेतली. मात्र, दंड भरलेलाच नसल्याने चालकाला कसल्याही पावत्या दाखविता आल्या नाहीत. त्यानंतर या चालकानेच संबंधित आरटीओ अधिकाऱ्याला मोबाईलवरून या प्रकाराची माहिती दिली. परिणामी तो अधिकारी तातडीने त्याच्या मदतीला धावून आला. चिडलेला जनसमुदाय पाहून अधिकाऱ्याने हा ट्रक ताब्यात घेऊन पीएमपीएल आगारात नेला आणि चालकाला दंड ठोठावला. या प्रकाराबद्दल विचारले असता, आपली ओळख दडवून काहीही न सांगताच हा अधिकारी तेथून निघून गेला

No comments:

Post a Comment