Total Pageviews

Thursday 3 November 2011

DONT EAT FAST FOOD

वैद्य रजनी गोखले.

काय करणार भूकच लागते मला.? भूक कसली.? तलफच येते. पूर्वी चॉकलेटची यायची ना तशीच. किंवा आईस्क्रीम खाऊन डिप्रेशन जायचं ना तसंच.! आता मला सतत ‘तेच’ लागतं. तोच सुगंध. तोच आवाज.! कुरकुरीत वेफर्सची चुरचुरीत गोष्ट.!

‘‘वेफर्स किंवा कोणतेही सॉल्टी पदार्थ
पचायला जड असतात. वेफर्सचं उदाहरण
द्यायचं झालं तर बटाट्यामध्ये जर ५0 ग्रॅम
कॅलरीज असतील, तर वेफर्समध्ये त्याच
कॅलरीज ५00 ग्रॅमइतक्या वाढतात.
फ्रस्ट्रेशन आलं की चॉकलेटबरोबर लोक
वेफर्स खातात. पण वेफर्स खाण्याला तसं
काहीच कारणं नाही. ही फक्त एक सवय
आहे. बदललेली लाईफस्टाईल हेच त्याला
कारण आहे. वेफर्स किंवा असे तळलेले
पदार्थ शरीरात अनावश्यक टॉक्सिन्स तयार
करतात. हे अनावश्यक टॉक्सिन्स शरीरात
साचून राहतात. त्यामुळे शरीरावर वेगवेगळे
परिणाम होतात. त्वचाविकार, रक्तदाब असे
परिणाम शरीरस्वास्थावर दिसायला
लागतात. वेफर्स खाण्याचं टेम्पटेशन आणि
सवय असं दोन्ही असतं. मानसिक ताणामुळे
लोक वेफर्स खातात असं नाही. वेफर्स किंवा
मिठाचे पदार्थ खाण्यानं आपलं लक्ष विचलित
होतं. म्हणून ते अतिप्रमाणात खाणं धोक्याचंच.!’

रात्रीचा एक वाजला होता. दुसर्‍या दिवशी इकोनॉमिक्सचा पेपर. कसलं टेन्शन आलं होतं. मग रात्री रट्टा मारता मारता दुसरंही काम सुरू होतं. कररर. कुरररर. असले आवाज होते सोबतीला..!
***

हॉस्टेलवर रात्री गप्पा मारण्याचा प्रोग्रॅम ठरला. पहाटेपर्यंत गप्पांबरोबर एक गोष्ट होतीच सोबत. कररर. कुरररर. !
***

ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं. डबा होताच सोबत. पण ऐनवेळी लहर आली मग काय पुन्हा कररर. कुरररर. !
***

काय करणार भूकच लागते मला.?
भूक कसली.?
तलफच येते.
पूर्वी चॉकलेटची यायची ना तशीच .किंवा आईस्क्रीम खाऊन डिप्रेशन जायचं ना तसंच.!
आता मला सतत ‘तेच’ लागतं.
तोच सुगंध.
तोच आवाज.!
***

काय आहे हे.?
आणि कसला हा कररर. कुररर आवाज.? फार विचार करण्याची गरज नाही. मुद्दा वेफर्सचा आहे. वेफर्स खाण्यासाठी वेळेचं, काळाचं आणि इतर कसलंच बंधन नसतं. दिसले वेफर्स की सुरू होतं चरण्याचं काम. किती सवय असते आपल्याला या गोष्टी खाण्याची. रस्त्यावर चालताना सहज नजर टाकली की काही लोक सहज दिसतील, जे सतत वेफर्स किंवा असं काही सॉल्टी पदार्थ, कुरकुरीत पदार्थ खात असतात. तुमच्याही बाबतीत असं होतं का.?
कॉलेजमध्ये लेक्चरला बसूनही वेफर्स खाण्यात एक गंमत असते. कुठून येतो आवाज म्हणून सगळे पाहतात. काही त्या वासानं बावचळतात. पण खाणारे मात्र वस्ताद. लपवून खातात. तोंड हलत नाही. अशी मज्जा कॉलेजात करणारे कमी नाहीत.!
जेवणाबरोबर, स्नॅक्सबरोबर किंवा मग अगदी चहा, कॉफीबरोबरही वेफर्स खाल्ले जातात. सवय लागते मग आपल्याला त्या वेफर्सची. सोबती होऊन जातात ते आपले.
एकदा एखादं पाकीट फोडलं की त्यातून बाहेर येते हवा आणि काही वेफर्स.
बकाबक सुरू होतं खाणं.
मग शेवटचा उरलासुरला चुराही आपण तितक्याच उत्साहाने संपवतो. पाकीटच्या पाकीट रिकामी होतात. सुटे वेफर्स तर असतातच. पण मोठमोठय़ा बॅ्रण्डेड कंपन्याही वेगवेगळ्या आकर्षक पाकिटात हे वेफर्स विकतात. पाच रुपयाच्या पाकिटात चार रुपयांची हवा मिळते आणि एक रुपयाचं वेफर्स ! तरीही आपण ते विकत घेतच असतो. साहजिक मोह होतोच. ट्रेनमध्ये, बसमध्ये, रिक्षा, टॅक्सी आणि अगदी कुठेही वेफर्स खाणारी आपल्यासारखी लोकं सापडतात. घशाला त्रास होतो पण चवीमुळे तो त्रास दुर्लक्षित केला जातो.
***

वेफर्स आवडतच नाहीत असा एखादा अपवाद सापडेलही कदाचित; पण ही संख्या फारच कमी. कारण मुळात वेफर्स हे खोट्या भूकेसाठी असतात. त्याची चव आवडत असते आपल्याला. टेम्पटेशन हे केवळ एकच कारण असतं वेफर्स खाण्यासाठी. खायला हलके असले तरी पचायला हलके नसतात. एका वाईट आणि विचित्र भाषेत सांगायचं तर वेफर्सच्या रूपात अँसिडिटीचे बकाणे भरत असतो आपण. डाएट कॉन्श्शिअस असणारी अनेक लोकही वेफर्स पाहून आपलं डाएट विसरतात. एक खाल्ला की मग आणखी एक, आणखी एक असं करत अख्खं पाकीट संपत. या वेफर्समधून आपलं वजन प्रचंड प्रमाणात वाढतं. एका वेफर्सच्या पाकिटात तब्बल १५४ कॅलरीज असतात. फ्लेवर्समध्ये तर व्हरायटी असतेच. जितकी वेगळी व्हरायटी तितक्या जास्त कॅलरीज असं त्याचं गणित असतं. बट हू केअर्स. वेफर्समध्ये अँडिक्शन देणार्‍या कॅलरीज असतात म्हणून ते आपल्याला परत परत खावेसे वाटतात, असं एक सर्व्हे सांगतो.
***

वेफर्स खाणं हेसुद्धा एक व्यसन असतं म्हणे. एकतर हे चवीला मस्त असतात अणि सहज कुठेही मिळतात. थोडेसे खारे वेफर्स चवीला मस्त लागतात; पण त्यांनी ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. एकूण काय तर वेफर्समुळे पोषण मूल्य फारच कमी प्रमाणात मिळतात आणि तोटे जास्त होतात. तरीही आपण खात राहतोच. अर्थात, आज आता हे वाचूनही आपण सुधारणार नाही. हा लेख वाचतानाही वेफर खाणार्‍यांची संख्या कमी नसेल. दुपारच्या वेळी एखादं पुस्तक किंवा पेपर निवांतपणो वाचत असताना सोबत वेफर्स असले तर मजाच येते. मानसिक समाधान होतं. अनेक जण फ्रस्ट्रेशन आलं की वेफर्स खातात. त्याने वेळ जातो. डोक्याला कटकट राहत नाही असं काहींचं म्हणणं असतं. पण एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही. काहीच काम नसेल आणि खरोखरीच वेळ जात नसेल तर वेफर्स खायला हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला कळेल की वेफर्स खाताना दीड-दोन तास सहज जातात. म्हणून तर प्रवासात अनेक जण वेफर्स खात असतात. खरंच पण कसली सवय असते आपल्याला हे असं काहीतरी कुरकुरीत खाण्याची. हे सतत खाऊन पुढे तब्येतीनं ‘कुरकुर’ केली तर कोण जबाबदार.?
- आपण.!

No comments:

Post a Comment