Total Pageviews

Thursday, 17 November 2011

VOTE BANK POLITICS BY CONGRESS

मुस्लिम विद्यापीठाचा घाट
 विद्यापीठे ही ज्ञानदानाची केंद्रे न ठेवता ती राजकारणाचे आणि समाजकारणाचे अड्डे करण्याचा नाद अनेकांना लागला आहे. कॉंग्रेसने हे सुरुवातीपासूनच केले आहे. आताही अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा देशभरात आणखी पाच मोठ्या शहरात उपकेंद्रे स्थापन करण्याचा आटापिटा चालला आहे. या सर्व पाच मोठ्या शहरांत अतिशय सक्षम अशी विद्यापीठे अस्तित्वात असताना तेथे मुस्लिम विद्यापीठाचे आणखी एक केंद्र स्थापन करण्याची गरज काय? असा प्रश्‍न विचारत या उपद्व्यापाला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध असला की हटकून ती गोष्ट करायची, असा या तथाकथित सेक्युलॅरिस्टांचा खाक्या असतो. त्यामुळे आता या पाचही ठिकाणी तशा प्रकारचा हकनाक आग्रह चालला आहे. तामिळनाडूत चेन्नई, पश्‍चिम बंगालमध्ये कालिकत, बिहारमध्ये किशनगंज, मध्यप्रदेशात भोपाळ आणि महाराष्ट्रात संभाजीनगर अशा पाच ठिकाणी या विद्यापीठाची उपकेंद्रे करण्याचा घाट घातला गेला आहे. या पाच ठिकाणांत महाराष्ट्रात संभाजीनगर आहे. या सर्व शहरांत मोठी आणि सक्षम विद्यापीठे असताना अलिगढ मुस्लिम विद्यापीठांचे उपकेंद्र स्थापन करण्याचा जो आग्रह आहे, त्यामागे हेतू शुद्ध नाही. परदेशातून येणारे पेट्रो डॉलर्स वापरून ही उपकेंद्रे करायची आणि तेथे अध्यापनापेक्षाही विद्यापीठाच्या नावाखाली जात्यंध आणि अराष्ट्रीय कारवाया करायच्या, अशा हेतूने हे चालले असल्याचा आरोप या केंद्राला विरोध करणार्‍या संघटनांनी केला आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा अनुभव काही चांगला नाही. येथून सिमीसारख्या बंदी घातल्या गेलेल्या अराष्ट्रीय संघटनांना प्रेरणा मिळाली, असा आरोप आहे. देशातील मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या भागात आता उपकेंद्रे काढण्याचा अट्टहास याच कारणाने होत असल्याचे बोलले जात आहे. या सर्व उपकेंद्रांना बिहारमध्ये गोपाल शर्मा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्रात शिवसेना यांनी तीव्र विरोध केला आहे. शासनाकडून मोफत मोठ्या जागा घ्यायच्या, तेथे पेट्रो डॉलर्स आणि विद्यापीठ अनुदान मंडळाचे अनुदान वापरून भव्य इमारती उभ्या करायच्या आणि या पोलादी पडद्याआड कट्टर इस्लामिक जिहादी वृत्तींना उत्तेजन देणारे शिक्षण आणि संघटन उभे करायचे. त्यांच्या मार्फत देशात अराष्ट्रीय स्वरूपाच्या चळवळी चालवायच्या, अशा प्रकारचे हे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीनगरजवळ शूलिभंजन येथे हिंदू देवस्थानाची जागा अधिग्रहण करून या विद्यापीठाला देण्याचा प्रयत्न चालू आहे. शूलिभंजन येेथे शांतिब्रह्म एकनाथ महाराजांची तपोभूमी आहे. तेथे दत्तात्रेयाचे जागृत देवस्थान आहे. मोठ्या संख्येने हिंदू भाविक तेथे येत असतात. अशा भागात जागा अधिग्रहण करून तेथे मुस्लिम विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रयत्न करण्याला हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध आहे. शिवसेनेने या जागेवर जाऊन तेथे या कृतीला विरोध दर्शवत निदर्शने केली आहेत. येथील एक इंचही जागा मुस्लिम विद्यापीठाला देऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेच्या खासदारांनी जाहीर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असताना या उपकेंद्राची गरजच काय? या विद्यापीठामुळे कोणत्या शैक्षणिक सुधारणा होणार आहेत? असा खडा सवाल या उपकेंद्राला विरोध करणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. हे उपकेंद्र आधी पुणे येथे होणार होते. मात्र, तेथे विरोध झाल्याने आता ते संभाजीनगरकडे आले आहे. संभाजीनगर हे अतिरेक्यांच्या कारवायांमध्ये सतत नाव येत असलेले ठिकाण आहे. घाटकोपरच्या बॉम्बस्फोटातील सिमीचे अतिरेकी संभाजीनगरचे होते. काही महिन्यांपूर्वी वेरूळच्या भागात स्फोटके घेऊन जाणार्‍या अतिरेक्यांना पकडण्यात आले होते. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील आरोपी मराठवाड्यात उदगीरमधून या कारवाया करत होते, हे तपासात पुढे आले होते. या पार्श्‍वभूमीवर आता हे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे केंद्र संभाजीनगरला आणणे, ही गोष्ट काही चांगली नाही. महाराष्ट्र सरकारमधील फौजिया खान आणि नसीमखान या मंत्र्यांनी या उपकेंद्रासाठी शूलिभंजनची जागा अधिग्रहण करून देण्याचा आग्रह धरला आहे. हेतू शुद्ध नसलेल्या या उद्योगाला सर्वच थरातून कसून विरोध झाला पाहिजे

No comments:

Post a Comment