http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5194777580987885015&OId=4799078011967497261
गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका कार्यक्रमात संपूर्ण काश्मीरचा भाग पाकिस्तानच्या सीमेत दर्शविणारे, तसेच अक्साई चीन व अरुणाचलचा भाग चीनच्या हद्दीत दाखविणारे वादग्रस्त साहित्य वितरित होत असताना, त्यातील आक्षेपार्ह नकाशांबद्दल तेथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पत्रकाराने लक्ष वेधले असता, चिनी राजदूताने ‘शटअप’ म्हणून त्या पत्रकाराचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. तथापि, सर्व प्रसिद्धी माध्यमे सरकारद्वारे नियंत्रित केली जायला हा काही चीन नाही, याकडे आपण डोळेझाक करीत आहात, या शब्दात पत्रकारानेही त्यांना सडेतोड उत्तर दिले. चिनी राजदूताचा हा व्यवहार राजनैतिक शिष्टाचाराला संमत होणारा वा शोभणारा तर नव्हताच, उलट त्यातून चीनची वाढती मग्रुरीच दिसून येत होती.
पंतप्रधानांनी लष्कराला दोन नव्या डिव्हीजन्स उभारण्याची परवानगी दिली आहे. (९०,००० सैनिक) आपल्या लष्करी इतिहासात अशी वाढ कधीच झाली नव्हती. ह्या वाढीसाठी किमान ६५,००० कोटी खर्च होऊ शकतात हे वाचून जनतेचा उगीच गैरसमज होऊ शकतो की, आपण आपले भित्रट परराष्ट्र धोरण सोडून आक्रमक धोरण स्वीकारले आहे.वस्तुस्थिती अशी आहे की, १९६२ सालापासून आजपर्यंत आपल्या लष्कराकडे केवळ ८-१० डिव्हीजन चिनी सीमेवर तैनात आहेत. (१.२-१.५ लाख सैन्य) याउलट चीनकडे आपल्या सीमेवर ४०-४५ डिव्हीजन्स (६-७.५० लाख सैनिक) आहेत. म्हणजेच आपल्यापेक्षा चौपट सैन्यशक्ती त्यांच्याकडे आहे. ह्याच्या जोडीला चिनी रस्ते तिबेटमधून भारतीय सीमेपर्यंत पोहोचले आहेत. आपले रस्ते मात्र सीमेपासून ३०-४० मैल मागेच आहेत. म्हणजेच पुढे लढत असलेल्या सैन्याला रसद पोहोचवण्यास आपण अजूनही असमर्थ राहणार आहेत. भारताने २०१०साली दोन नवीन सैन्याच्या डिव्हीजन्स उभारल्या (अंदाजे ३०,००० - ३५,००० सैनिक), पण अजूनही त्या सैनिकांना योग्य शस्त्रे मिळाली नाहीत. सरकारचा आणखी दोन डिव्हीजनस उभारण्याचा इरादा आहे म्हणजे अंदाजे ९१,००० सैनिक. या सर्वांचा खर्च ६५,००० कोटी असेल. पण या घोषणा निव्वळ कागदोपत्रीच आहेत; कारण मंत्रिमंडळाच्या समितीने अजून त्याला होकार दिलेला नाही. बरे नवीन सैन्य पूर्ण कार्यक्षम व्हायला ७ -१० वर्षे लागतील व रस्ते सीमेपर्यंत पोहचायला किमान १५ वर्षे लागतील. चिनी ड्रॅगन याची वाट पाहील का?
चाणक्याने शेजार्यांपासून सावध राहण्याची सूचना केली होती.चिनीने भारताच्या सीमेत घुसखोरी करण्यापासून, ते भारताचा भूभाग आपलाच असल्याचे नकाशात दाखविण्यापर्यंत अनेक खोड्या सतत केल्या आहेत. भारतीय सीमेत घुसून अरुणाचल प्रदेशात दगडांवर चीन असे लिहून जाणे असो की लडाख भागात घुसून भारतीय सैनिकांनी उभे केलेले बंकर्स उद्ध्वस्त करण्याचा उद्दामपणा असो, अशा कितीतरी घटना सतत घडलेल्या आहेत.

No comments:
Post a Comment