Total Pageviews

Friday, 4 November 2011

MOST POULAR ARTICLE ON LT NAVDEEP E SAKAL

हे व्यर्थ न हो बलिदान
२१ ऑगस्ट २०११ सीमेवर आणखी एका शूर वीराने आपले प्राण बलिदान केले. भारतीया -सीमांचे रक्षण करताना प्राणार्पण केलेल्या या वीराची आठवणही वर्तमानपत्रांना टीव्हीवाल्यांना झाली नाही. लेफ्टनंट नवदीपसिंग अवघ्या २६ वयाचा हा अधिकारी. गुरेझजवळ तैनात १५ मराठा लाइट इन्फंट्रीवर सीमेपलीकडून घेणारी घुसखोरी थांबवण्याची जबाबदारी असते. पाचच महिन्यांपूर्वी योथे रुजू झालेल्या लेफ्टनंट नवदीप डोळ्यात तेल घालून सीमेवर गस्त घालतोय. २१ ऑगस्टची ती रात्र मध्यरात्रीचे १२.४५ होत आलेले. आपल्या हद्दीतील नियांत्रणरेषा असणारी नीलम तरी ओलांडून १२ घुसखोर आत घुसल्याची माहिती नवदीपला मिळाली. आपल्या पथकासह नवदीपने या अतिर्नेयांवर हल्ला चढवला आणि पहिल्याच तडाख्यात तीन अतिरेकी टिपले. पथकातील शिपाई विजया गजरे जखमी झाला. त्याला वाचवण्याच्या प्रयात्नात याशस्वी होत नवदीपने धडाडीने आणखी एका पाकिस्तानी घुसखोरास आपल्या बंदुकीचा हिसका दाखवत झटक्‍यातच खतम केले. पण त्याचवेळी अतिरेक्‍यांच्या एका गोळीने नवदीपचा वेध घेतला आणि भारतमातेचा हा वीरपुत्र धारातीर्थी पडला. आठवत असेल की २६/११ ला १० आतंकवाद्यांना मारण्याकरता मुंबईमध्यो तीन दिवस झाले होते. पण काश्‍मीर सीमेवर निलम नदी मधून झालेल्या या घुसखोरीनंतर पूर्ण रात्र चाललेल्या लढाईस आपल्या प्रसारमाध्यमांनी फारसे महत्त्व दिले नाही.
काय अर्थ आहे तुझ्या बलिदानाचा?
सीमांचे संरक्षण करत असताना भारतीय सैन्य कायमच शीर तळहाती घेऊन वावरत असते आणि आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही क्षणी प्राणांचे मोल द्यायला तयार असते, हे नवदीपच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.प्रिय नवदीप, तू खरोखरच वीरमरण पत्करलेस. ती लढाई अत्यांत अटीतटीची आणि तीव्र होती हे निश्‍चित. तुझ्या गौरवास्पद बलिदानाचा विचार मी करू लागलो आणि दुःख, अस्वस्थता, निराशा, अभिमान अशा सर्वच भावनांनी मनात गर्दी केली. काय हे अर्थ आहे. तुझ्या बलिदानाचा? तुझ्या त्यागाचा ?
एका लहानशा खेड्यातला तुझा जन्म. मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊनही वडील आणि आजोबांच्या पावलावर पाऊल ठेऊन तू लष्करात भरती झालास. का निवड केलीस तू लष्कराची ? अर्थातच नोकरी मिळवण्यासाठी, पण तेवढेच एक उत्तर नक्कीच नाही. कुटुंबातील लष्करी पार्श्‍वभूमी, छावणी प्रदेशातील जीवनशैलीचा प्रभाव या सर्व कारणांमुळे तू लष्करात दाखल होण्यास प्रेरित झालास?
पण आज? आज मात्र तू या जगात नाहीस. राष्ट्रसेवेच्या साऱ्या स्वप्नांनी धगधगणारी तुझी छाती आता कायामची थंडावलीय. तुझा शहीद देह घरी आणला जाईल तेव्हा अमेरिकेतल्याप्रमाणे भारत सरकारकडून तुला मानपत्र दिले जाणार नाही किंवा इंग्लंडमधल्याप्रमाणे संसदेच्या सर्वोच्च सभागृहात तुझ्या नावे शोकसंदेश वाचला जाणार नाही. एखाद्या राष्ट्रीय स्मारकावर आम्ही तुझे नाव कोरून ठेवणार नाही कारण आम्ही अजून तसे स्मारकच उभारले नाहीये. तुझ्यासारख्याच अनेक वीरपुत्रांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडया गेटवर जळते आहे, पण त्याच इंडिया गेटवर तुझे नाव मात्र आम्ही कोरणार नाही. कारण त्यावर ब्रिटिशांसाठी लढलेल्या तत्कालिन जवानांची नावे आहेत. यापेक्षा विरोधाभास ते कोणता.
पण अगदीच काही निराश होऊ नकोस. तुझे लष्करी सहकारी नक्कीच तुझी कदर करतील. काश्‍मीर खोऱ्यातून तुला निरोप देताना सर्वात ज्योष्ठ अधिकारी तुला अन्य अधिकाऱ्यांसह मानवंदना देतील. तुझ्या युनिटचे प्रतिनिधी तुला सुखरुप घरी पोहचवतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या तिरंग्यासाठी तू तुझे प्राण वेचलीस त्या छतात लपेटूनच तुझा देह अंतिम संस्कारासाठी नेला जाईल. तुझ्या आईच्या दुःखभरल्या डोळ्यातून अखंड वाहणारी आसवे आणि तुझ्या अकाली जाण्याने प्रचंड धक्का बसलेले आणि दिग्‌मूढ झालेले तुझे वडील यांना पाहून पाषाणालाही पाझर फुटेल. तुझ्या युानिटचे अधिकारी तुला शौर्यापदक मिळावे यासाठी निश्‍चितच प्रयत्न करतील. (बारा घुसखोरांना कंठस्नान घातलेस तू!) कालांतराने तुझे वडील किंवा आईला ते शौर्य पदक देऊ केले जाईल आणि अत्यंत गर्वाने तुझ्या घरांत ते मिरवले जाईल. हळूहळू तुझ्या मृत्यूच्या दुःखाची धार कमी कमी होत जाईल.
नवदीप, तुसा तू नशीबवानच म्हणायाला हवास. जरी तुझा विवाह निश्‍चित झाला होता आणि तुझ्या बलिदानाच्या एकच आधी सुटी मिळाली की घरी येईन मग लग्न उरकून टाकू, असे आईला म्हणाला होतास. तरी तो क्षण आलाच नाही. किमान आता तुझ्यामागे तुझी विधवा पत्नी तरी नाही. तिच्यामागे तुझा तरुण मुलगा तरी नाही. ज्या मुलाने कायम तुला हिरो मानले असते आणि तुझ्या मागोमाग लष्करात दाखल होण्यासाठी धडपड केली असती. आज लष्करी अधिकारी पदाला असणारी अत्यंत कमी क्रेझ पाहता, त्याच्या आईने त्याला विरोधच केला असता. तुझ्यासारखेच अनेक जवान कारगिलच्या भूमीवर धारातीर्थी पडले. परंतु आज त्या अत्यंत पराक्रमी जवानांचा साधा स्मृतिदिनदेखील साजरा करणे या देशवासीयांना जमत नाही. त्या अत्यंत वीरश्रीपूर्ण लढाईची आठवणही दरवर्षी योग्य त्या पद्धतीने केली जात नाही.
मात्र तुझे युनिट आणि तुझ्या रेजिमेंटमध्यो तुझे नाव चिरकालासाठी कोरुन ठेवले जाईल. युनिटच्या क्वार्टर गार्डवर देखील तुझे नाव येऊन दरवर्षी तुला आदरांजली वाहिली जाईल. तुझे फॉर्मेशन हेडक्वार्टर आणि रेजिमेंटल सेंटरमध्ये तुझे नाव अभिमानाने झळकत राहील. लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावरील हॅटस्‌ ऑफ रिमेम्बरन्स मध्ये तुझे नाव राहील. सेवेत दाखल होण्याआधी प्रत्योक जवान तुला त्या हटमध्ये येऊन वंदन करेल.. काही वर्तमानपत्रांमध्ये तुझ्या सहकाऱ्यांकडून तुझ्या नावे शोकसंदेशही छापला जाईल. अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करतील. मात्र लष्करी गणवेश ज्यांनी अनुभवला आहे. ते सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक मात्र हा संदेश अत्यांत तपशीलात वाचतील. त्यांचा तुझ्याविषयीाच्या अभिमानाने भरुन येईल.
आयुष्याच्या संध्याकालाकडे झुकताना तुझ्या शौर्याच्या आणि धाडसाच्या आठवणी ही तुझ्या मातापित्यांकडची सर्वात मोठी ठेव असेल. तुझ्या सहवासातील क्षण त्यांच्याकरता सर्वात अनमोल असतील. तुझी प्रिय आई तुझा विचार जेव्हा जेव्हा करेल, तेव्हा तेव्हा तिचे डोळे भरून येतील. मात्र तिच्या त्या अश्रूभरल्या डोळ्यात तू तुझ्या खांद्यावर कधीच मिरवले नसतील. त्याहून कितीतरी अधिक स्टार्स नक्कीच असतील. तुझे वडील कदाचित धीर गंभीरपणे तुझ्याविषयी बोलत राहतील. मात्र त्या धीरोदात्त संवादातही त्यांची अभिमानाने फुलून आलेली छाती कुणाचाच नजरेतून सुटणार नाही. तुझे नातेवाईक, भावंडे, तुझा भाव आणि परिसर यांच्यासाठी तू कायामच एक रिअल हिरो बनून राहशील. तुझ्या नावाची शाळा उघडली जाईल. गावातल्या एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला शहीद नवदीपसिंग मार्ग असे नाव दिले जाईल. गावकऱ्यांच्या तोंडी तू एक दंतकथा बनून राहशील अजरामर होशील.
तू आमच्यातून निघून गेलास. तू प्राणत्याग केलास कारण तुझे कुटुंबीय, तुझे मित्र, तुझे सहकारी या सर्वांनाच अगदी खात्रीच होती, की वेळ येईल तेव्हा तू मागे हटणार नाहीस. आपले कर्तव्य बजावताना प्राणांचेही मोल देत तू त्या साऱ्यांचा विश्‍वास खरा ठरवलास, लेफ्टनंट आपल्या कर्तव्यापेक्षा खूपच अधिक मोलाचे काम तू करुन दाखवलेस. तू असे तसे मरण पत्करले नाहीस. तुझे बलिदान व्यर्थ नाहीच.
ईश्‍वर आणि सैन्य सर्वांच्याच आदराचा विषय !! मात्र केवळ संकटकाळीच, एकदा का संकट टळावे मग देवाकडे दुर्लक्ष आणि सैन्याचा तर विसरच. प्रतिक्रिया On 02/11/2011 03:47 PM sangram kadam said: देशहितासाठी लागणारी जिगर खूप कमी तरुणांकडे असते.नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून,त्याच उमेदीने नवदीप सारखे जवान सैन्यदलात जाऊन देशासाठी बलिदान देतात.खरच असे तरुण या भारत भूमीत जन्माला येन म्हणजे भारत भूमीच भाग्याच होय.धन्य तो नवदीप आणि धन्य त्या नवदीप चे माता पिता. रजनी, श्रद्धांजली नवदीपला दे ब्रिगेडीर महाजन यांना का देते ? मूर्ख आणि वेन्धली कुठली ? काय वाचतात आणि काय करत तेही यांना नीट काळात नाही. धन्यवाद... ब्रिगेडीअर महाजन... वीर जवानानबद्दल लिहिण्यासाठी... तुमच्यामुळे या शुरविराची माहिती कळली... लेफ्टनंट नवदीपसिंग अमर रहे... भारत माता कि जय... सर्व जवानांना प्रणाम जय हिंद जो शहीद हुवे उनकी जरा याद करो कुर्बानी भारतीय सैन्य हे आमची पहिली आणि शेवटची आशा आहे.. आज काळ नुसते खान मंडळी आणि राजकीय लोकांचे एक मेक्नावर आरोप ... या मुले सुन्न झाले डोके.. चांगले दाखवाया मेडिया ला पैसे मिळत नाही.. आमचा सलाम सलाम त्या शहीद जवानांना ..................... लष्करात भारती होण्यासाठी तरुण उत्सुक नाहीत हे म्हणणे चुकीचे आहे. माझ्या एका मित्राने वेळा interview दिला. प्रत्येक वेळी स्वतामध्ये improvment केली पण जीव ओतून प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. जे उत्सुक असतात त्यांना एन्ट्री मिळत नाही अन नंतर म्हणतात तरुणांना लष्करात भरती होवेसे वाटत नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन" यांना कृतज्ञातापुर्वक सलामी श्रद्धांजली !! डोळ्यात पाणी आलं... राजकारण्याचं सोडा पण आपण सामान्य नागरिक तरी थोडा तारतम्य थोडा आदर दाखवू शकतो अशा शूर वीरा साठी. आपल्या मूर्ख मिडिया ला कधी तरी अक्कल आणि समज यावी हि प्रार्थना. नवदीप आणि त्याच्या सारख्या सर्व शहीद जवानांची आधी माफी मागतो आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. देव त्यांच्या आत्म्याला शान्तो देवो आणि पुढच्या जन्मात सर्व सुख समृद्धी देवो जेणे करून त्यांना आपल्या सारख्या कृतघ्न्य लोंकाच्या सीमेचे राखण नाही करावे लागणार. शहीद ले. नव दीप सिंग याना सलाम, सर्व जवानान मुले आपण सुरक्षित आयुष्य जगात आहोत त्यामुळे त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुम्ही लेख लिहून ... मुक्त पीठ आणि त्यांच्या वाचकावर खरंच उपकार केले आहेत !!!! सिंग नाही ... सिंघम आहे ...होता हा नवदीप .. नवदीप तू खरच mahaan आज आपल्या देशाची हि शोकांतिका मानली पाहिजे ज्या सैनिकानी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्या देशाचे rashan karit आहे .tyana shradhyajali denya साठी apalyala vel nasato thanks हेमंत सर सुंदर लेख सुदर लेख सगळ्या जवानांना माझे खूप खूप प्रणाम , तुम्ही खरे भारत भूमीचे सुपुत्र आहात, तुमच्या झोळीत नेहमी यश आणि यशच पडो. तुम्ही आहात म्हणून माझ्या सारखे सगळे भारतीय सुखाची झोप घेऊ शकत आहेत . खरच अगदी शतशः प्रणाम. भारत माता की जय !!! हे अमर वीरा तुला कोटी कोटी प्रणाम शहीद लेफ्टनंट नवदीपसिंग यांना कृतज्ञातापुर्वक सलामी श्रद्धांजली !! पोसा अजून कसाब ला नवदीप आणि सीमेवरच्या सर्व शहिदांना मनापासून प्रणाम. आज तुम्ही आहात म्हणून आम्ही श्वास घेऊ शकतो नाहीतर या घुसखोरांनी केव्हाच आपल्या सगळ्यांची होळी केली असती. डोळ्यात पाणी आले, आम्ही सदैव प्रत्येक जवानाची आठवण मानत ठेऊन भारतीय प्रमाणे वागू, तुम्हाला सलाम!! ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांना सलाम. भारतात asha बर्याच गोष्टी आहेत कि ज्यामुळे सानिकांचे बलिदान व्यर्थ ठरते. कसाब आजही जिवंत आहे हि अशीच एक गोष्ट आहे. अतिशय सुंदर लेख तितकेच कटू सत्य .हेच आत्तापर्यंत होत आलं आहे आणि असेच होणार ...........जोपर्यंत आपण फक्त प्रतिक्रियाच देत राहणार ! नवदीप तुला मना पासून सलाम.......................आम्हाला तुझा अभिमान आहे तुझ्या तर इस्राईल च्या तुला नाक कुह्प्सायला कुणी सांगितलं ईशावर तुमच्या आई-वडील-बहिण-भाऊ यांना खूप सुख देवो. तुमच्या आत्म्यास सती लाभो. मराठे-मावळे यांच्यासारखेच तुमचे बलिदान आहे. देशातले तरुण सलमान खान, शाहरुख खान चे सिनेमे बघण्यात व्यस्त आहेत. तरुणी मेक-उप मध्ये. कॉंग्रेस चे लोक आणि गवर्न मेंट चे लोक जनतेला छाळाण्यात व्यस्त आहेत. आणि जनता सास-बहु चे कार्यक्रम बघण्यात आणि विचार करता कॉंग्रेस ला आपले मत देण्यात. लाज वाटते !! देवा या देशाला तुम्हीच वाचवा आता. नवदीप तुला आमचा मनाचा सलाम. या देशात मूर्ख आणि चिरपूट गल्ली पुढार्यांचे वाढदिवस आणि ते मेल्यानंतर त्यांचे स्मृतीदिवस मोठ्या उत्साहाने साजरे होतात. त्याला त्यांचा पैसा, तसेच नेभळट जनता तितकीच जबाबदार आहे. अशा या देशात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांची काय कदर असणार ? नवदीप तुला मना पासून सलाम.......................आम्हाला तुझा अभिमान आहे आमच्या इस्राईल मध्ये असे नाही होत - Sasonkar Yardena, Israel राजेश said: फार कमी वेळा आपण सैन्यातल्या लोकांचा मन ठेवतो खरतर राजकारणी आणि बाबू लोकांपेक्षा हे शिलेदार महत्वाचे आहेत आणि त्यांच्या पाठीशी देश आहे.. आणि त्यांच्या कुटुंबाची देश काळजी घेईल हि भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न होण्याची खरी गरज आहे. जर नवीन लोकांनी लष्करात भरती व्हावा असा वाटत असेल तर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या मागे सुरक्षित आहेत आणि शूर मरण आलेतरी देश विसरत नाही हिभावाना तयार होण्या साठी प्रयत्न गरजेचे आहेत... वीर योध्यास आमची श्रद्धांजली.... सकाळने हा विषय मांडला ह्याबद्दल त्यांचेही आभार. आमची प्रसारमाध्यमे हरामी आहेत आणि सरकार तर त्याहून जास्त हरामी आहे, हि प्रसारमाध्यमे big boss मधल्या फालतू गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवत बसतील पण अशा बातम्या जास्त महत्वाच्या आहेत याची त्यांना अक्कल नाही, आमचा मनमोहन निषेध नोंदवून गप्पा बसेल आणि राहुल बाबा ला याच्याशी काही देणे घेणे नाही, भाजप वाले पण यात्रा आणि घोटाळ्यात मग्न आहेत, त्यामुळे त्यांना इकडे लक्ष द्यायला सवड नाही ....... मेरा भारत महान अभिजीत गुर्जर said: आपले उपकार हि मायभूमी कधीच विसरणार नाही ,हे बलिदान कधीच विस्मरणात जाणार नाही.प्रसारमाध्यमे हि सुधा इटालियन आज्ञा पाळतात.या देशासाठी तुम्ही अमर झालात. या बलिदानास असंख्य भारतीयांकडून मानाचा सलाम.आपले राजकारणी अजूनही बिर्याणी खात आणि खायला घालत बसले आहेत.न्यायव्यवस्थेला सुधा कॉंग्रेसची हांजी हांजी करावी लागतीये.न्यायव्यवस्थाच राजकारण्यांनी नष्ट केलीये.न्यायालयाचा अपमान हेच लोक जास्त करतात.तुम्ही मारलेले दहशतवादी इथे येऊन आणखी लोकांना मारून गेले असते.आपल्या शौर्या पुढे आम्ही भारतीय नतमस्तक आहोत. नवदिपाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! अजून काय बोलणे, आपण असेच आहोत. :( खरच डोळ्यात पाणी आले हा लेख वाचून. आणि खरोखर किती दुर्दैव आहे कि या बातमीला कोणीच काहीही महत्व दिलेले नाही. नवदीप सिंघ अमर रहे !!!! खरोखरीच अश्रू आले डोळ्यात हे सर्व वाचताना. आपल्या भावना एवढ्या बोथट झाल्या आहेत का कि आपण देशासाठी प्राण वेचणार्या आपल्या जवानांची दखल सुधा घेत नाही. तिथे रोज असे जवान शहीद होतायेत. कधी थांबणार हे, का हक्क नाही त्यांना सुधा जिवंत राहण्याचा, आयुष्याचे सुख अनुभवण्याचा..... श्रद्धांजली. लेख खरेच छान आणि सुंदर आहे या शूर वीरांचे बलिदान आपणास रात्रीची सुखाची झोप देते. आपण कष्ट करतो पुढे जातो मन सन्मान मिळवतो ते यांच्यः मुळे. पण मला एक खटकते काय उपयोग आहे अश्या बलिदानाचा? तुम्ही प्राण तळहातावर घेऊन लढता विजयही मिळवता पण आम्ही मात्र तहात हरतो आणि तुमच्या विजयावर पाणी सोडतो. तुमचे बलिदान व्यर्थ जाते. जिवंत पकडलेले राक्षस (कसब आणि अफजल गुरु) मात्र ऐश करतात जेल मध्ये. हीच का लोकशाही??? शहीद लेफ्टनंट नवदीपसिंग यांना कृतज्ञातापुर्वक सलामी श्रद्धांजली !! निदान लष्कराने तरी घपले बाजीत राहता आपल्या वीर जवानांची कदर करावी. बाकी आम्ही लोकशाही चा इतका बोजवारा वाजवला आहे कि आम्हाला माणसाची माणुसकीची कदरच राहिलेली नाही. हे व्यर्थ हो बलिदान अस शीर्षक हवं होत. काय छापताय राव? लेफ्टनंट नवदीपसिंग यांना आदरांजली आणि ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांना धन्यवाद ! आजच्या मलिन आणि लाजिरवाण्या राजकीय आणि सामाजिक वर्तमानात ´जय जवान जय किसान` हा नारा लोप पावला आहे. महासत्तेची स्वप्नं बघणाऱ्या भारताची ही शोकांतिका आहे. सचिन सोनवणे said: चूक आपलीच आहे, आपल्याला बिग बॉस, just dance महत्वाचे वाटते. सचिन सोनवणे said: सुन्न झालोय हे वाचून. शहीद लेफ्टनंत नव दीप सिंग अमर रहे. वीर जवान तुझे सलाम !!! "भारत मत कि जय " सामान्य नागरिकांप्रमाणे ब्रिगेडियर महाजन ह्यांनी सरकारला टार्गेट केलेले बघून आश्चर्य वाटले निदान सैन्यदले तर विशेष एका प्रेरणेने लढत असतात आणि कुठल्या कागदाच्या चिटोर्यावर किंवा भिंतीवर लिहिलेले नाव त्यांच्या बलिदानाची प्रेरणा नक्कीच नसतील, असो ज्या देशात टीम अण्णा प्रमाणे कुठलीही जबाबदारी घेता केवळ चारचौघांना उचकून लावणारे खरे राष्ट्रप्रेमी मानले जात असतील तिथे मेडीयाला सैन्याच्या बातम्या द्यायला वेळ कुठे असणार आपले खरे राष्ट्रप्रेमी म्हणजे अन्ना आणि बाबा. नाही नाही मुळीच नाही व्यर्थ नाही होणार तुझे बलिदान ................आमच्या हृद्य सिहासनावर तू सतत विराजमान राहशील हि बातमी वाचून माझ्या लहानपणाची कविता आठवते जे देश साठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार सोडीला सुखी संसार डोळ्यात पाणी आल. सलाम सलाम...! खूपच मार्मिक आहे. आपल्या देशातील so called लोकशाही वादी नेत्यांना याची कडी मात्र किंमत नाही. २६/११ च्या शहिदांचे काय झाले हे सुद्धा आपण पहिलेच आहे......... भारतात फक्त एखादा CELEBRITY मेला तर ती बातमी सारखी दाखवली जाते,पण सीमेवर शहीद होणारे कायम दुर्लक्षित केले जातात.......................GRAND SALUATE TO ALL SOILDERS
On 25/10/2011 03:11 PM VILAS said:
On 25/10/2011 03:13 PM Atul G said:
On 25/10/2011 03:14 PM pravin said:
On 25/10/2011 03:18 PM Amol shivabhakta said:
On 25/10/2011 03:18 PM MAYUR said:
On 25/10/2011 03:24 PM nil said:
On 25/10/2011 03:32 PM asd said:
On 25/10/2011 03:39 PM
On 25/10/2011 03:40 PM
On 25.10.2011 03:40 Amruta said:
On 25/10/2011 03:41 PM pravin said:
On 25/10/2011 03:46 PM Prasanna said:
On 25/10/2011 03:51 PM rahul said:
On 25-10-2011 03:55 PM AVINASH SHITOLE said:
I salute you
On 25/10/2011 03:51 PM tushar said:
On 25/10/2011 03:56 PM Tushar said:
On 25/10/2011 04:06 PM Sc said:
On 25/10/2011 04:09 PM manojdharap said:
On 25/10/2011 04:17 PM
On 25/10/2011 04:21 PM sandip said:
On 25/10/2011 04:45 PM
On 25/10/2011 04:57 PM Abhijit said:
RIP
On 25/10/2011 04:49 PM Sasonkar Yardena, Israel said:
On 25/10/2011 05:14 PM shekhar said:
On 25/10/2011 05:16 PM sanjay deshpande pune said:
On 25/10/2011 05:31 PM Nilesh said:
On 25/10/2011 06:01 PM V. Sawarkar said:
On 25/10/2011 06:57 PM @Sasonkar Yardena, Israel said:
On 25/10/2011 07:00 PM Vivek said:
On 25/10/2011 07:22 PM MK said:
On 25/10/2011 08:24 PM Sagar said:
On 25/10/2011 08:53 PM yogesh said:
On 25/10/2011 09:13 PM mona said:
On 25/10/2011 10:39 PM bina said:
On 25-10-2011 11:47 PM Sameer said:
On 26/10/2011 12:34 AM BRIG HEMANT MAHAJAN (AUTHOR) said:
MARTYRS :INDIAN ARMY OFFICERS WHILE CARRYING OUT ANTI TERRORIST OPERATIONS IN KASHMIIR & NORTH EAST INDIA IN 2010 WHEN YOU GO HOME TELL THEM OF US, FOR YOUR TOMORROW WE GAVE OUR TODAY THIS SACRIFICE IN ONE YEAR IS MORE THAN SACRIFICES BY ANY OTHER ORGANIZATION SINCE 1947 SER NO NUMBER RANK NAME ARMS/ SERV DATE OF DEATH 26. IC-69022K CAPT PRATEEK PUNTAMBEKAR INF 08/02/2010 43. IC-70151W CAPT DAVINDER SINGH JASS SIGNALS 23/02/2010 45. MR-08609M MAJ LAISHRAM JYOT
On 26/10/2011 12:21 AM BRIG HEMANT MAHAJAN (AUTHOR) said:
ON AN AVERAGE 20-30 OFFICERS ARE DYING EVERY YEAR IN ANTI TERRORIST OPERATIONS IN KASHMIR,NORTHEAST & ON INDOPAK/INDO CHINA BORDER. THIS HAS BEEN HAPPENING SINCE 1988.INDIAN ARMY IS THE ONLY ORGANIZATION IN INDIA WHICH HAS BEEN SHORT OF 20,000 OFFICERS SINCE LAST 20 YEARS.
On 25/10/2011 11:55 PM sham said:
On 26/10/2011 01:35 AM Anamika said:
On 26-10-2011 08:24 PM Sachin said:
Salute to You
On 26/10/2011 07:31 PM indian said:
GRAND SALUATE TO ALL SOILDERS
On 26/10/2011 01:55 PM shailesh said:
salute to you
On 26/10/2011 05:41 AM keval said:
On 27/10/2011 10:41 AM sarvesh said:
grand salute ...!!!
On 27/10/2011 09:37 AM manoj said:
On 27/10/2011 03:34 PM swaraj said:
Brigediar Hemant sir,basically our media is very immatured. Dirty polititians, cheapless celibraties (with their affaires) are always on top list of media since this gives good TRP. We salute to all soilders .Because of them only we can live securely and can enjoy the freedom. hats off to them and thanks for sharing this article
On 27/10/2011 02:13 PM manasi said:
On 27/10/2011 04:42 PM Sunil C said:
On 27/10/2011 05:18 PM sach said:
On 27/10/2011 11:23 PM Amol said:
On 28/10/2011 09:52 AM Rajni said:
"
On 28/10/2011 06:53 AM smita said:
On 29-10-2011 11:07 AM monika said:
On 29/10/2011 12:00 PM ketan said:
On 29/10/2011 06:04 PM hemant deshpande said:
This sacrifice is incredible . It does't need any media like tv channel & news paper. it's gifted by god with bravery virtue & then reward given by the god to this valuable personality by calling this human being to near the mighty one. don't need to discuss about mistakes ignoring the main things & themes. SALUTE THIS INDIAN................ THE GREAT INDIAN.
On 29/10/2011 12:47 PM neena said:
On 30/10/2011 06:17 PM mumbaikar said:
On 31/10/2011 09:48 AM Rahul Pathare said:
On 31/10/2011 12:01 PM Ravi S said:
On 31/10/2011 01:07 PM vendhala said:

No comments:

Post a Comment