व्यापाऱ्यासह मुलास पोलिसांकडून मारहाण सकाळ वृत्तसेवा dhule, police, crime, north maharashtra धुळे - व्यापाऱ्याने गर्दी हटविण्यासंबंधी केलेल्या विनंतीच्या क्षुल्लक कारणावरून "इगो' करत येथील आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व सहा कर्मचारी दबंगगिरीवर उतरले. त्यांनी आग्रा रोडवरील सराफ बाजारातील सोने व्यापारी, त्याच्या मुलास मारहाण करतच दुकानातून फरफटत बाहेर काढले. आज सकाळी साडेअकराला ही घटना घडली. पोलिसांच्या या दहशतीविरोधात सर्व व्यापाऱ्यांनी तत्काळ सराफ बाजार बंद केला. नंतर संतप्त व्यापारी संघटनांसह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला. त्यांनी येथे सायंकाळी घेतलेल्या संयुक्त बैठकीनंतर पत्रकार परिषदेतून उद्या (ता. 18) धुळे शहरासह व्यापार, व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. जखमी व्यापाऱ्यासह त्याच्या मुलास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यापाऱ्याच्या कानासह डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी दोषी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. त्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी बैठकीतून करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. गुंडगिरीला अटकाव करण्यात अपयशी आणि उलट व्यापाऱ्यांवर दबंगगिरी करणाऱ्या पोलिसांविरोधात येथे शहर बंद ठेवण्याची वेळ ओढावल्याने पोलिस प्रशासनाला ही सर्वांत मोठी नामुष्की सहन करावी लागत आहे. विनंतीवरून "इगो' पेटला
घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील केमिस्ट भवनात संघटित सर्व व्यापारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, बजरंग दल यासह विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सायंकाळी साडेपाचला बैठक व पत्रकार परिषद झाली. त्यात श्रीपाल मुणोत यांनी भावासह पुतण्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी कथन केली. ते म्हणाले, आग्रा रोडवरील सराफ बाजारात तेजराज मूलचंद मुनोत फर्मची सोने-चांदीची पेढी आहे. अभय मुणोत (वय 52), सुदर्शन अभय मुणोत (22) हे आज दैनंदिन कामात व्यस्त होते. गुरुपुष्यामृतमुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी होती. रस्त्यावरील साहित्य, भाजी विक्रेते लोटगाडीधारक व दागिन्यांवर डागडुजी करणाऱ्या कारागिरांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे रस्त्यावर गर्दी झाली. वर्दळीच्या या रस्त्यावर चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी वर्षभरापासून दोन पोलिस नियुक्त आहेत. गुरुपुष्यामृतमुळे महिला ग्राहकांची गर्दी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी गर्दी हटवावी, अशी विनंती श्री. मुणोत यांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना केली. त्याचा राग या दोन पोलिसांना आला. आम्हाला अक्कल शिकवतो का? दाखवतोच, असे म्हणून ते कर्मचारी निघून गेले. गर्दीही हटली. मुणोत यांना मारहाण
काही वेळानंतर आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील हे सहा पोलिस कर्मचाऱ्यांसह अभय मुणोत यांच्या दुकानावर आले. त्यांनी थेट अभय व सुदर्शनला मारहाण करत फरफटत बाहेर काढले. मुणोत यांची विनंती धुडकावून लावत दुकानही बंद करू दिले नाही. जखमी अवस्थेत आझादनगर पोलिस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. तुझ्याविरुद्ध तक्रार करायची आहे, असे मारहाण करणारे पोलिस सांगत होते. मारहाणीत जखमी मुणोत यांच्या कानासह डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ते व सुदर्शनही जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. पोलिसांना गर्दी हटविण्याची विनंती करणे हा गुन्हा आहे का? मुणोत यांनी काय असा गुन्हा केला की त्यांना जबर मारहाण झाली? गुंडगिरीविरोधात कर्तव्यात कसूर करणाऱ्या आझादनगर पोलिसांना एवढा "इगो' कसला? आदी विविध गंभीर प्रश्न उपस्थित करत श्रीपाल मुणोत व उपस्थित सर्व व्यापारी, राजकीय प्रतिनिधींनी पोलिसांच्या अशा कृत्याचा निषेध करून उद्या धुळे शहरासह व्यापार, व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला
Friday, November 18, 2011 AT 02:45 AM (IST)
Tags:

No comments:
Post a Comment