Total Pageviews

Thursday, 17 November 2011

POLICE INSPECTOR CAUGHT WHILE ACCPTING BRIBE

क्षुल्लक कामासाठी सतत लाच मागणारे विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पोलीस ठाण्यातच रंगेहाथ अटक केली. वरिष्ठ निरीक्षकालाच लाच घेताना पकडले गेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांनी अलीकडेच परिपत्रक काढून लाच घेताना पोलीस पकडला गेला तर त्या पोलीस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक आणि सहायक आयुक्ताच्या वार्षिक गोपनीय अहवालावर शेरा मारला जाईल, असे स्पष्ट केले होते. परंतु आता वरिष्ठ निरीक्षकच पकडला गेल्यामुळे आयुक्त कोणाचा गोपनीय अहवाल खराब करतात याकडे लक्ष लागले आहे.या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त ठेवले आहे. या तक्रारदाराचे विलेपार्ले येथे किराणा मालाचे दुकान आहे. या व्यतिरिक्त जुनी झोपडी विकत घ्यायची आणि ती दुरुस्त करून पुन्हा विकायची असा धंदाही तो करतो. तेथीलच संजय गांधी नगरातील एका महिलेची झोपडी या तक्रारदाराने विकत घेऊन ती दुरुस्त केली. ही झोपडी ते चहाचा व्यवसाय करणाऱ्यास भाडय़ाने देणार होते. याच काळात तक्रारदाराची त्याच्या शेजाऱ्यांनी वरिष्ठ निरीक्षक पाटील यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा ज्या महिलेकडून झोपडी विकत घेतली होती, ती झोपडी बांधण्यास आपण उपनिरीक्षक असताना त्या महिलेला मदत केली होती. त्यामुळे या व्यवहारात आपल्याला ५० हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशी मागणी पाटील यांनी केली होती. तक्रादाराने पाटील यांची मागणी पूर्ण केली. तरीही पुन्हा त्यांच्याकडून रक्कम मागितली जात होती. सदर रक्कम न दिल्यास झोपडीदादा ठरवून कारवाई करण्याची धमकी पाटील यांच्याकडून दिली जात होती.
त्यामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबई विभागाचे अतिरिक्त आयुक्त नितेश कौशिक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून पाटील यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या आणखी एका कारवाईत सशस्त्र पोलीस दलाच्या ताडदेव येथील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक अनिल गांगुर्डे यांना पोलिसाकडून एक हजाराची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. पगारात भाडे मिळावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसाची  कागदपत्रे त्रुटी काढून तीन वेळा गांगुर्डे यांनी अमान्य केली होती.   

No comments:

Post a Comment