तरुणींच्या धर्मांतरामुळे हिंदू भयग्रस्त
3 Nov 2011, 0126 hrs IST हिंदू तरुणींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करणे आणि त्यांचा मुस्लीम मुलांशी निकाह करण्याचे प्रमाण पाकिस्तानात वाढले आहे. त्यामुळे येथील तरुण हिंदू मुलींचे पालक भयग्रस्त झाले आहेत.
कराचीमधील लायर भागात राहणाऱ्या धनबाई यांच्या २१ वर्षांच्या बानो या मुलीचे तीन वर्षांपूवीर् अपहरण करण्यात आल्यानंतर तिचे धर्मांतर करून मुस्लिम तरुणाशी लग्न लावण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी धनबाई व त्यांचे पती बुधाराम लालजी यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
धनबाई म्हणाल्या, 'मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर बानोला नोकरी करण्याची परवानगी आम्ही दिली होती. आपल्या वडिलांना ती हातभार लावत होती; पण एक दिवस काही जण आले आणि बानोला घेऊन गेले. त्यांनी तिचे जबरदस्तीने धर्मांतर केले आणि नंतर परस्पर लग्न लावून दिले. तिचा चेहरा अजून आम्हाला दिसलेला नाही. माझ्या इतर दोन मुली लक्ष्मी आणि श्रद्धा यांची चिंता मला लागली आहे. मला बिल्डिंगवरुन उडी मारुन जीव द्यावासा वाटत आहे.'
धनबाई या काही एकमेव नाहीत. त्यांच्यासारखी चिंताग्रस्त असंख्य कुटुंबे पाकिस्तानात आहेत. कराची हिंदू पंचायतीनुसार, दर महिन्याला किमान २२ हिंदू तरुणींचे धर्मांतर करून त्यांचे लग्न लावल्याच्या तक्रारी येतात. पंचायचीचे अध्यक्ष अमरनाथ म्हणाले, 'ही येथील हिंदूंची सर्वात मोठी समस्या आहे. सरकार आणि पोलिस दोघेही मदत करत नाहीत. अलीकडे या सर्व प्रकारांत मुस्लीम कट्टर गट आणि मदरशांतील मुले सहभाग घेत आहेत.'
कराचीतील सर्वात मोठा मदरसा असलेल्या जामिया बिनोरियाचे अध्यक्ष मुफ्ती नईम म्हणाले, 'गेल्या दोन महिन्यांत २०० मुले आणि मुली मुसलमान झाले, पण त्यापैकी एकानेही आपल्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचे सांगितले नाही.'

No comments:
Post a Comment