Total Pageviews

Tuesday 8 November 2011


चार हिंदू डॉक्‍टरांची पाकिस्तानात हत्या
वृत्तसंस्था

कराची - पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध प्रांतात चार हिंदू डॉक्‍टरांची मंगळवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे तेथील अल्पसंख्याक समुदायात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

शिकारपूरजवळील चाक शहरात या डॉक्‍टरांच्या दवाखान्यातच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. डॉ. अशोक, डॉ. नरेश. डॉ. अजित आणि डॉ. सत्या पॉल यांची पाकिस्तानी हल्लेखोरांनी हत्या केल्याचे पाकिस्तान हिंदू कौन्सिलचे माजी प्रांतप्रमुख डॉ. रमेश कुमार यांनी सांगितले. अशाप्रकारचे हल्ले वारंवार होत असून, सुरक्षायंत्रणाही गुन्हेगारांनाच सहकार्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या शहरात हिंदूंची संख्या सुमारे 50 हजारच्या आसपास आहे, त्यामुळे सरकारने तातडीने याची दखल घेऊन अल्पसंख्याकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात हिंदूंना संरक्षण दिले जात होते, मात्र आता गुन्हेगारांना रान मोकळे झाले आहे. याबाबत अध्यक्ष असिफ झरदारी, मुख्य न्यायाधीश आणि लष्करप्रमुखांकडे दाद मागितली असल्याचेही डॉ. रमेश म्हणाले.

या बाबीची झरदारी यांनीही गंभीर दखल घेतली असून, गुन्हेगारांना तातडीने अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते फराहतुल्ला बाबर यांनी इस्लामाबादेत सांगितले. अल्पसंख्याकांचे संरक्षण ही सरकारची जबाबदारी असल्याचे झरदारी यांनी म्हटले आहे. गुन्हेगारांनी कायदा हातात घेतला असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा होईल, असेही बाबर म्हणाले. दरम्यान, सिंध प्रांताचे हिंदू खासदार रमेश लाल यांनी तातडीने मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
प्रतिक्रिया
On 09/11/2011 05:15 AM sarvesh(USA) said:
कॉंग्रेस ला म्हणावं पाकिस्तानच्या अभिनंदनाचा ठराव पास करावा..

No comments:

Post a Comment