माओवादी नक्षलवादी हे दहशतवाद्यांपेक्षा भयंकर छत्तीगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सीआयएसएफच्या पथकावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.रायपूर- छत्तीगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पथकावर बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. सीआयएसएफचे पथक गस्त घालत होते. आकाशनगर येथील बिचेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय खाण विकास संस्थेच्या परिसरात सीआयएसएफचे जवान गस्त घालत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान मारले गेले असून चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
माओवादी नक्षलवादी हे दहशतवाद्यांपेक्षा भयंकर माओवादी नक्षलवादी हे दहशतवाद्यांपेक्षा भयंकर आहेत. त्यामुळे यापुढे त्यांच्या विरोधात गप्प राहणार नाही, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी प्रतिसाद देण्याऐवजी रक्तपात घडवून आणणाऱ्या नक्षलवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला.
पुरुलिया जिल्ह्यातील दोन तृणमूल समर्थकांची माओवादी नक्षलींनी हत्या केली. त्यांच्या शोकसभेला उपस्थित असलेल्या ममतांनी हा इशारा दिला. नागरिकांचे रक्षण हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे यापुढे नक्षलींचे हल्ले शांत बसून सहन करणार नाही. नक्षलवाद्यांना मुख्य धारेत आणण्याच्या प्रयत्नांबाबत आशावादी आहोत, त्यांनी तयारी दाखवली तर पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नक्षलींना मदत करणाऱ्यांवरही सराकरची नजर असल्याचे ममता म्हणाल्या. हुगळी जिल्ह्यातील उत्तरपारा भागातील नक्षलींच्या हालचालींबाबत नागरिकांनी सतर्क राहावे तसेच जडावपूर विद्यापीठासारख्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. संयुक्त सुरक्षा दलाने माओवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली असून पुरुलिया आणि पश्चिम मिदनापूर भागात शोधमोहीम आणि छापेसत्र हात घेतले आहे. यात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि विस्फोटके हस्तगत करण्यात यश आले आहे.
साठ किलो विस्फोटके, एके ४७च्या शंभर फैरी, दोन इन्सास रायफली, भूसुरुंग, जिलेटीनच्या कांड्या पूर्णपाणी भागातून जप्त करण्यात आल्या
गडचिरोली, गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागातील नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवाया कमी करण्यासाठी या भागातील रस्तेबांधणी आ्रठ विकासकामांवर प्रामुख्याने भर देण्यात यावा, केंद्र सरकार त्यासाठी आवश्यक तो निधी देईल, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज सांगितले.सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. त्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर.पाटील, नक्षलग्रस्त भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारी उपस्थित होते.नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्याबरोबर त्या भागाचा विकास करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेपुढे असून त्यासाठी अधिकचा निधी मिळावा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांनी बैठकीत केली. त्यावर नक्षलग्रस्त भागासाठी आवश्यक तो निधी मिळवून देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी दिले.या बैठकीत पोलिस महासंचालक के. सुब्रह्मण्यम यांनी नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या नक्षलवादविरोधी मोहिमेचे सादरीकरण केले. जे नक्षलवादी नक्षली कारवाया सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी पुनर्वसनाची योजना राबविली जात असून आतापर्यंत ३७३ नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपन केल्याची माहिती त्यांनी दिली. नललवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी अल्पकालीन व दिर्घकालीन उपायोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.नियोजन विभागाचे प्रधान सचिव सिराराम कुंटे यांनी नक्षलप्रभावित क्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.नक्षलवाद्यांशी लढणारे पोलीस निराधार ऐक्य समूह छत्तीसगढ राज्यातल्या दंतेवाडा, बिजापूर, बस्तर जिल्ह्या-तल्या घनदाट जंगलात, नक्षल-वाद्यांच्या विरोधी मोहिमेत सक्रिय असलेल्या केंेद्रीय आणि राज्यातले पोलीस जवान मात्र निराधार अवस्थेतच आला दिवस ढकलत आहेत. गेल्या चार वर्षात या भागात नक्षलवाद्यांचा उच्छाद वाढला. जंगलातल्या आदिवासी खेड्यांवर सशस्त्र नक्षलवाद्यांच्या टोळ्यांचे हल्ले वाढले. राज्य सरकारने आदिवासींनाच बंदुका देवून, स्वसंरक्षणासाठी "सलवा जुडूम', द्वारे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा प्रति-कारही सुरु केला. जंगलातून शहरी आणि ग्रामीण भागात घुसणाऱ्या नक्षलवादी टोळ्यांचा जंगलातच शोध घेवून तेथेच त्यांचा खात्मा करायसाठी राज्य सरकारने, घनदाट जंगलातच पोलिसांच्या छावण्याही सुरु केल्या. दिवसभर हे पोलीस नक्षलवाद्यांच्या शोधात जंगलातून गस्त घालतात आणि रात्री छावणीत परत येतात. छावणीतील पोलिसांची संख्या दिवसा कमी असल्याने त्यांना सतत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यापासून बचाव करायसाठी सावध राहावे लागते. दंतेवाडाच्या जंगलातल्या पोलिसांच्या काही छावण्या 28 वर्षापूर्वीच्या जुन्या असल्या तरी, अद्यापही त्यांची अवस्था झोपड्यांचीच आहे. कुडाच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेल्या या छावण्यात विजेची सोय नाही. संपर्काची साधनेही अपुरी आहेत. झोपड्यांना दारे नाहीत. खाटाही नाहीत. ज्या खाटा आहेत, त्या मोडक्या आणि जुनाट आहेत. जंगलात डासांच्या त्रासामुळे अनेक जवानांना मलेरियाची लागण होते. औषधोपचारासाठी त्यांना चाळीस पन्नास किलोमीटर दूरच्या प्राथमिक आरोग्य केेेंद्रात जावे लागते. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या या भागातून एकट्या दुकट्या जवानाला जायचे धाडसही होत नाही. तसे झाल्यास नक्षलवादी अशा पोलिसांना पळवून नेतात, ठारही मारतात. दिवसरात्र या जवानांना नक्षलवाद्यांचा हल्ला होण्याच्या शक्यतेने सावध राहावे लागते. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या किश्ताराम पोलीस छावणी 1982 मध्ये सुरु झाली. या छावणीत कोणत्याही सुविधा नाहीत. संपर्का-साठी असलेले मोबाईल फोन झाडाला बांधून ठेवावे लागतात. पावसाळ्यात तर छावणीतल्या जवानांचे हाल कुत्रेही खात नाही. संपूर्ण झोपडी मुसळधार पावसाने गळते. जमिनीवरही पाणी साठते. या छावणीला जोडणारा बारमाही रस्ता नसल्यामुळे, हेलिकॉप्टरद्वारे अन्नधान्य आणि अन्य वस्तूंचा पुरवठा केला जातो. प्रचंड पाऊस असतो तेव्हा, छावणीजवळ हेलिकॉप्टर उतरू शकत नाही. अन्नधान्याची टंचाई निर्माण होते. संरक्षणाची कोणतीही अत्याधुनिक सुविधा नसल्यामुळे, पावसाळ्यात हे जवान प्रतिकूल परिस्थितीतही दुर्गम जंगल तुडवित नक्षलवाद्यांचा शोध घेतात. नक्षलवाद्यांचा हल्ला झाल्यास पोलिसांची तातडीची मदत त्यांना मिळू शकत नाही. पन्नास किलो-मीटरवर असलेल्या दुसऱ्या छावणीतून तत्काळ मदत मिळू शकत नाही. सहा-सहा महिने हे जवान तुरुंगातल्या बंदीवानासारखे जीवन जगतात. गेल्या वर्षभरात नक्षल-वाद्यांनी अशा छावण्यांवर आणि गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात 120 जवानांचे बळी गेले आहेत.

No comments:
Post a Comment