Total Pageviews

Wednesday 9 November 2011

santosh gore excellent article on hindus in pakistan

पाकिस्तानात चार हिंदू डॉक्टरांचे हत्याकांड, हिंदूस्थानात कोणी ऐकणार आहे का ?

पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात चार हिंदू डॉक्टरांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. शिकारपूरनजीकच्या चक टाऊन परिसरातल्या एका क्लिनिकमध्ये हे ह्त्याकांड करण्यात आलं. या घटनेत तीन हिंदू डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाली. अर्थात पाकिस्तानात हिंदूंच्या या नरकयातना काही नवीन नाहीत. मात्र या नरकयातना कधी थांबणार ? याचंही उत्तर कोणाकडे नाही. संपूर्ण पाकिस्तानातच हिंदू समाजाला टार्गेट केलं जात आहे. चक टाऊन परिसरात असलेले पन्नास हजार हिंदू आणि पाकिस्तानातल्या विविध भागात असलेले हिंदू दहशतीखाली जगत आहेत. अर्थात माझ्यासारख्या मुंबईत बसलेल्या एका पत्रकाराला त्या विषयी काय माहिती आहे ? असा प्रश्न कोणत्याही सेक्युलर किंवा अभ्यासू व्यक्तीला पडणं सहाजिक आहे. चार हिंदू डॉक्टरांची हत्या झाल्याची बातमी सगळ्यांनाच माहिती झाली आहे. अर्थात वृत्तपत्रात आल्यामुळं ती माहित झाली आहे.
मागील आठवड्यातही शंभर हिंदू तरूणांनी धर्मांतर करून ते मुस्लिम झाल्याची एक बातमी मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनुसार मशिदीच्या इमामने या तरूणांनी त्यांच्या स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय धर्मांतर केल्याचा दावा केलाय. अहो इमामसाहेब मात्र पाकिस्तानात तर सोडाच पण कधी हिंदूस्थानातही कधी कोणत्या शंभर मुस्लिम तरूणांनी स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारल्याची बातमी कधी कोणी वाचलेली नाही. अगदी सेक्युलरसुद्धा हे मान्य करतील. पाकिस्तानात भरदिवसा हिंदू तरूणींना पळवून नेऊन त्यांच्या बरोबर निकाह लावले जात आहेत. हिंदू तरूणींची ही विटंबना तिथं खुलेआम सुरू आहे. ही सगळी माहिती कोणत्याही वाचकाला pakistanhindupost.blogspot.com/ वर वाचता येईल.


चार हिंदू डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ तिथल्या हिंदूंनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मात्र तिथल्या इस्लामी राजवटीत हिंदूंना कोणताही न्याय मिळण्याची शक्यता नाही. तिथले हिंदू हिंदूस्थानकडे डोळे लावून बसले आहेत. आम्हाला हिंदूस्थानात आश्रय द्या, अशी त्यांची मागणी आहे. मात्र आमच्या धर्मनिरपेक्ष सरकारकडे हिंदूंसाठी वेळ नाही, अर्थात हिंदूंसाठी तो कधीच नसतो. नाही तरी आपल्या देशात दोन कोटी बांग्लादेशी सुख आणि समाधानानं राहत आहेत. त्यात जर आपल्या रक्तामांसाच्या पाकिस्तानातल्या हिंदूंची भर पडली तर असा कोणता फरक पडणार आहे ?


पाकिस्तानला जर तिथल्या हिंदूंना संरक्षण देता येत नसेल तर त्यांनी तिथल्या हिंदूंना भारतात जाण्याची परवानगी द्यावी. आणि हिंदूस्थानातल्या मुस्लिमांनाही पाकिस्तानात बोलवावं. कारण ज्या देशांची फाळणीच धर्माच्या आधारावर झालेली आहे, तिथं दोन्ही देशांमधील नागरिकांची आदलाबदल करावीच लागेल.

काश्मीरमधली अमरनाथ यात्रा बंद करण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'मुंबईतून एकही मुस्लिम हज यात्रेला जावू देणार नाही' असा खणखणीत इशारा दिला होता. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीतपणे पार पडली होती. असाच खणखणीत इशारा पाकिस्तानला भरण्याची हिंमत आपल्या केंद्र सरकारमध्ये आहे का ? ही हिंमत नसल्यामुळेच पाकिस्तानातल्या हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत

1 comment: