मुंबई : आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसच्या कोल्हापूर विभागातर्फे सहा आणि आठ डिसेंबर २०११ रोजी सोलापूर येथे सैन्यभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण तरुण यात सहभागी होऊ शकतील. सहा डिसेंबरला सोल्डर जनरल ड्यूटी पदासाठी भरती होणार असून त्यासाठी साडे सतरा ते एकवीस वषेर् वयोमर्यादा आहे. किमान १६८ सेमी उंची आवश्यक आहे. तर आठ डिसेंबरला सोल्जर टेक्निकल तसेच नसिर्ंग असिस्टंट पदासाठी भरती होणार असून त्यासाठी साडेसतरा ते २३ वषेर् वयोमर्यादा आहे. त्यासाठी १६७ सेमी उंची असणे आवश्यक आहे. दोन्ही विभागांसाठी किमान ५० किलो वजन असणे आवश्यक आहे
No comments:
Post a Comment