1996च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीचा एकदिवसीय क्रिकेट सामना फिक्स होता. श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात कोलकाता स्टेडियमवर आपण कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली जाणूनबुजून हरलो असा आरोप तब्बल 15 वर्षांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने केल्याने सार्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून आरोप करणार्या विनोद कांबळीवर हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या सर्वच पदाधिकार्यांनी टीकेची झोड उठवली आहे. आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कांबळीचा आरोप बेजबाबदारपणाचा असल्याचे म्हटले आहे. नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण घेण्याचा अझरुद्दीनचा त्यावेळचा निर्णय अगदी मैदानाच्या क्युरेटरपासून श्रीलंकेचे खेळाडू व मॅनेजर यांना धक्का देणारा होता, अशी प्रतिक्रिया नोंदविण्यात आली. तर पहिले क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय संघाने एकमताने घेतला असल्याचा दावा अझरुद्दीन याने केला असून कांबळीचा आरोप हा ‘थर्ड क्लास’ वृत्तीचा असल्याचे त्याने पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. मॅच फिक्सिंगचे पुरावे पुढे आल्यानंतर नऊ वर्षांपूर्वी क्रिकेट बोर्डाने अझरुद्दीनवर आजन्म क्रिकेट खेळण्याची बंदी घातली. अशा या बदनाम क्रिकेटपटूला कॉंग्रेसने उत्तर प्रदेशातील मोरादाबादमधून 2009 साली खासदारकीचे तिकीट दिले आणि निवडूनही आणले. आता कांबळीने अझरुद्दीनवर 1996 चा कोलकाता येथील हिंदुस्थान-श्रीलंकेचा क्रिकेट सामना फिक्स होता असा आरोप केल्याने अझरुद्दीन पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. कॉंग्रेसने अझरुद्दीन हा भला माणूस असून त्याच्यावर असलेली क्रिकेट बंदी उठवावी अशीही मागणी केली आहे. आपल्या देशात आज सत्याची चाड कुणालाच राहिली नाही असे दिसून येते. आज आपल्याकडे गुन्ह्यात अडकलेल्यांना कसे ‘हीरो’ करता येईल याचीच सर्वत्र स्पर्धा सुरू आहे. त्यांनाच प्रसिद्धी दिली जात आहे.
अझरुद्दीन हा भला व सुसंस्कृत असल्याचे कॉंग्रेसने जरी सर्टिफिकेट दिले असले तरी यात काही तथ्य नाही. अझरुद्दीन हा ‘मॅच फिक्सर’च होता असे मुंबई क्राईम ब्रँचच्या 2003 साली तपासात उघड झाले होते. दाऊदचा उजवा हात शरद शेट्टी यास छोटा राजनने आपल्या हस्तकांमार्फत दुबईतच गोळ्या घालून ठार मारले. त्यानंतर मुंबईतील गँगवार दुबईत पोचल्याने तेथील पोलिसांनी हिंदुस्थानी गुंडांचा शोध घेऊन त्यांची हिंदुस्थानात हकालपट्टी केली. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर व अनिल परब ऊर्फ वांग्या यांचाही समावेश होता. मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर इक्बाल कासकरने व वांग्याने दाऊदसह सर्वांचीच तपासात पोल खोलली. त्यात इक्बालने दाऊदचा हस्तक शरद शेट्टीच्या क्रिकेट बेटिंगवर जळजळीत प्रकाश टाकला आहे तो आपल्या कबुलीजबाबात म्हणतो, ‘‘Sharad Anna (Sharad Shetty) and Dawood used to fix the cricket matches through Bukhatir of Dubai. (owner of the stadium in sharjah). In the event Sharad Anna lost the bet, he never used to pay the bookies, Chhota Shakeel used to intervene and tell the bookies to leave him. They used to fix about four batsmen and two bowlers of the team. cheapest team to be fixed was west Indies. Amongst the Indian team Azaruddin and Ajay Jadeja were in contact with sharad Anna. Rais Farooqui used to arrange the party of drinks for Azaruddin, Ajay Jadeja and others.’’
दाऊद व शरद शेट्टी हे चार फलंदाजांना व दोन गोलंदाजांना ‘फिक्स’ करून क्रिकेट मॅचचा निकाल आपल्या बाजूने लावायचे. त्या फिक्सिंगमध्ये अझरुद्दीन व अजय जडेजा यांचा समावेश होता, असे इक्बाल कासकरने 2003 साली मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्यांना सांगितले होते. तशीच माहिती इक्बालबरोबर दुबईतून हकालपट्टी करण्यात आलेल्या अनिल परबने मुंबई क्राईम ब्रँचच्या तपास अधिकार्यांना दिली होती. त्यात अनिल परबने फिक्सर म्हणून नयन मोंगियाचाही उल्लेख केला होता. अझरुद्दीन व शरद शेट्टी एकत्र बसलेले असल्याचे मुंबई क्राईम ब्रँचने एक छायाचित्रही हस्तगत केले होते. परंतु अंडरवर्ल्डच्या संपर्कात असलेल्या या क्रिकेटपटूंच्या राजकीय हस्तक्षेपामुळे कुणी केसाला धक्का लावला नाही. उलट त्यांचे आज ‘ग्लोरिफिकेशन’ केले जात आहे. बंदी आणलेल्या क्रिकेटपटूंना चॅनलवाले स्टुडिओत चर्चेसाठी बोलवीत आहेत, त्यांचे ‘बाईटस्’ घेत आहेत. हे फक्त आपल्याच देशात होऊ शकते. अमिताभ बच्चन आदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आघाडीचे सिनेकलावंत सोडल्यास दाऊद व अनिसच्या वाढदिवसाला बहुसंख्य सिनेकलावंतांनी 1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोटापूर्वी दुबईत जाऊन हजेरी लावलेली आहे. त्यात संजय दत्त, फिरोज खान, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आदित्य पांचोली, गोविंदा, अनिल कपूर, अन्नू मलिक आदींचा समावेेश होता. या कलावंतांची कधी चौकशी झाली नाही, मग या फिक्सर क्रिकेटपटूंवर तरी कशी कारवाई होईल

No comments:
Post a Comment