Total Pageviews

Thursday 5 May 2011

HELICOPTER REQUIRED BY MAHARASHTRA MINISTERS AT TAXPAYERS COST

हेलिकॉप्टर पायजे म्हणजे पायजेच!
राज्यातील
मंत्र्यांचा हट्ट
HELICOPTERS PURCHASED  FOR ANTI NAXAL OPERATIONS ARE USED FOR FREE RIDE BY MINISTERS & BUREAUCRATS

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 107

WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्याची प्रगती कूर्मगतीने होण्याचे गुपित बुधवारी उघड झाले . राज्याच्या प्रगतीचा ध्यास घेतलेल्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांना महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे . पण त्याकरिता त्यांना हवे आहे सरकारी हेलिकॉप्टर . मंत्र्यांना एकतर हेलिकॉप्टर्स द्या अथवा भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर घेण्याकरिता ६० लाखांचा निधी उपलब्ध करून द्या , अशी मागणी दोन्ही काँग्रेसच्या समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आली .

राज्य सरकारकडे सध्या एक हेलिकॉप्टर आहे . पण ते दहा वर्षांपूर्वीचे आहे . येत्या सहा महिन्यांत नवीन हेलिकॉप्टर सरकारी सेवेत दाखल होणारही आहे , पण अनेक कार्यक्षम मंत्र्यांना ते केवळ हवेत उडताना पाहवे लागणार आहे . राज्यपाल , मुख्यमंत्री त्यानंतर उपमुख्यमंत्री या क्रमाने सरकारी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले जाते . सध्या सरकारी हेलिकॉप्टरचा वर्षाला ३०० तास वापर होतो .

मंत्र्यांना हेलिकॉप्टर नसेल तर गृहमंत्री आर . आर . पाटील यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्याकरिता कसे झटायचे ? छगन भुजबळ यांनी पर्यटन क्षेत्र विकासाकरिता वेगवेगळ्या साईटसना भेटी कशा द्यायच्या ? ग्रामविकासाचे जयंत पाटील यांचे ग्रामीण विकासाचे स्वप्न कसे साकार व्हायचे ?

काही मंत्र्यांनी आपल्या कामाला हेलिकॉप्टर नसल्याने किती मर्यादा येतात याची कैफियत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे मांडली . समजा सरकारी हेलिकॉप्टर उपलब्ध होत नसेल तर भाड्याने हेलिकॉप्टर घेण्याकरिता प्रत्येक मंत्र्याला ६० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्र्यांनी केली .
टु - जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी शाहीद बलवा याचे हेलिकॉप्टर वापरल्यावरून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधिमंडळ अधिवेशनात आरोप प्रत्यारोप झाले होते . त्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टर अथवा निधीच्या मागणीला महत्व आहे . विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याचे वृत्त समोर पडद्यावर दिसत असतानाही आपले मंत्री जनसेवेकरिता जीवावर उदार झाल्याचे चित्र दिसले

No comments:

Post a Comment