Total Pageviews

Tuesday, 19 June 2018

जोझिला बोगद्याचे सामरिक महत्त्व June 20, 2018 -सनत कोल्हटकर

श्रीनगरलेह रस्त्यावरील  जोझिला हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ११,५८७ फूट उंचीवर वसलेले आहेजोझिला हा हिंदुस्थानातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा असेलतो बोगदा दुहेरी आहे हे विशेषया बोगद्याच्या बांधकामाचा खर्च सुमारे ६८०० कोटी रुपयांचा आहे.  हा बोगदा सोनमर्गजवळील बालताल ते द्रासमधील मणिमार्गपर्यंत असेलयाबरोबरच या बोगद्याला सामरिक महत्त्वही आहेचशिवाय हा बोगदा या भागातील विकासाचे प्रारूपच बदलवून टाकील असे दिसत आहे.

मागील महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी श्रीनगर-लेह भागातील १४.३१ किलोमीटर लांबीच्या बांधल्या जाणाऱ्या  बोगद्याच्या कामाचा शुभारंभ केला.  हिंदुस्थानची या भागातील पायाभूत सुविधांमधील ही एक मोठी गुंतवणूक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा बोगदा या भागातील विकासाचे प्रारूपच बदलवून टाकील असे दिसत आहे.
या बोगद्यामुळे बालताल आणि द्रास या कश्मीर खोऱ्यातील गावांमधील प्रवासाचे प्रमाण एकदम कमी होणार आहे. प्रवासाचा वेळ फक्त खूप कमी होणार नसून तो जास्त सुरक्षितही होईल. सध्या या दोन गावांमधील प्रवासाचा वेळ साधारण ३ तासांचा आहे, तो फक्त १५ मिनिटांवर येईल (वाहने ८० किलोमीटर प्रति तास वेगाने धावली तर).  तसेच तिथे कडाक्याच्या थंडीत जेव्हा बर्फ पडतो तेव्हा वरील दोन गावांमधील रस्ता बर्फ पडण्यामुळे बंदच होतो. हिमवर्षावामध्ये डिसेंबर ते एप्रिलपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद होतो. त्या काळात पलीकडील गावाचा पुढील किमान तीन महिने इतर गावांशी संपर्कच पूर्णपणे तुटतो. या काळात हवाई मार्ग हाच एक मार्ग आणीबाणीच्या परिस्थितीत उपलब्ध असतो. या दोन्ही गावांना रस्त्यांवर नुसता हिमवर्षावाचा नाही, तर  हिमवादळांचाही (एव्हलॉन्च) सामना करावा लागतो. हा बोगदा झाल्यावर हिमवादळाच्या धोक्यापासूनही सुटका होईल. या मार्गावर प्रवास करणाऱयांसाठी हा प्रवास सुरक्षित होईल हे निश्चित. तिथे राहणाऱ्या रहिवाशांना या काळासाठी घरामध्ये धान्य आणि इतर गोष्टींचा साठा करून ठेवावयास लागतो, परंतु या बोगद्यामुळे दोन्ही गावांमधील प्रवास वर्षाचे बाराही महिने सुकर होईल. औषधे, भाजीपाला यांचा पुरवठा निर्वेधपणे चालू ठेवता येईल. सध्या लेहला जाणारे मार्ग दोनच. एक  जम्मू – श्रीनगर – जोझिला – कारगील – लेह  आणि दुसरा  मनाली – लेह – सरचू.
श्रीनगर-लेह रस्त्यावरील  जोझिला हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ११,५८७ फूट उंचीवर वसलेले आहे. जोझिला हा हिंदुस्थानातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा असेल. तो बोगदा दुहेरी आहे हे विशेष. या बोगद्याच्या बांधकामाचा खर्च सुमारे ६८०० कोटी रुपयांचा आहे.  हा बोगदा सोनमर्गजवळील बालताल ते द्रासमधील मणिमार्गपर्यंत असेल. याबरोबरच या बोगद्याला सामरिक महत्त्वही आहेच. लडाख, गिलगिट आणि बाल्टिस्तान या चीन आणि पाकिस्तानच्या भूभागावरील सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या लष्कराचा संपूर्ण वर्षभर संपर्कही राहीलच, त्याशिवाय लष्कराच्या आवश्यक साहित्याची वाहतूकही बाराही महिने अखंडपणे चालू ठेवता येईल. पर्यटनही वर्षभर चालू ठेवता येऊ शकेल. या भागात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी हा एक स्वप्नवत बदलच असेल. जोडीने या बोगद्याच्या कामामुळे आणि बोगदा झाल्यानंतरही  रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या  अनेक संधी उपलब्ध होतील त्या वेगळ्याच. जोझिला बोगदा प्रकल्प  २०१३ मध्ये यूपीएच्या काळात मंजूर झाला होता. हा बोगदा  २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
विपरीत वातावरण आणि भूभागात या बोगद्याचे बांधकाम हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कारच असेल. बोगद्याची लांबी बघता संपूर्ण १३.५ लांबीच्या बोगद्यात वायुविजन (व्हेंटिलेशन), प्रकाशयोजना, सीसीटीव्ही आणि संपर्क यंत्रणा या आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असतील. ऑक्सिजनचा सलग पुरवठा यात गृहीत धरला आहे. डिसेंबर ते एप्रिलपर्यंत या भागात उणे ४५ पर्यंत तापमान घसरते, २५ ते ३० फूट उंचीचा बर्फ साचतो तसेच समुद्रसपाटीपासून असलेल्या उंचीमुळे वातावरणातील ऑक्सिजनही खूप विरळ होत जातो. पादचाऱयांसाठीही या बोगद्यात सोय करण्यात आल्याचे सांगण्यात येते.  इतक्या कमी तापमानात बोगद्याचे काम करण्यासाठी सरकारने परदेशी कंपन्यांचीही मदत घेतली आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यावर पर्यटकांचेही आकर्षण  ठरल्यास नवल नाही

No comments:

Post a Comment