Total Pageviews

Sunday, 24 June 2018

काश्मीर आणि काश्मिरी आमचेच! महा एमटीबी 24-Jun-2018



गेल्या
 काही दिवसांपासून काश्मीरमध्ये ज्या वेगाने राजकीय घडामोडी घडल्यात्यावरुन तेथील अस्वस्थता लपून राहिलेली नाहीचरमझानच्याकाळात शस्त्रसंधीचा दहशतवादीफुटीरतावाद्यांनी घेतलेला गैरफायदाजवान औरंगजेबची निर्घृण हत्यापत्रकार बुखारींवरील हल्ला या सगळ्याघटनांचे मूळ कित्येक वर्षं चर्चिल्या गेलेल्या काश्मीर समस्येतच आहेकाश्मीरमधील समस्यांवर नेहमीच चर्चा रंगतातपण या समस्येवरीलउपाययोजनांचा म्हणावा तितका गांभीर्याने विचार केला जात नाहीतेव्हाराष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या माध्यमातून काश्मीरमधीलसमस्यांचे निराकरण करण्यासाठी सूचविल्या गेलेल्या महत्त्वाच्या उपाययोजनांचा या लेखात केलेला उहापोह...


काश्मीरला ‘भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जातेकाश्मीर हे भारताची अस्मिता आणि भारताचा गौरवअशा या निसर्गरम्य काश्मीरचीभुलवणारी सुंदरताकाश्मीरचे थंडगार हवामान आणि उत्तुंग हिमालयाच्या भव्यतेची वर्णनं आपण नेहमीच वाचतऐकत आणि पाहात असतोपण,त्याचबरोबरीने भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजतागायत आपण काश्मीरच्या मुद्द्यावर दहशतवादभ्रष्टाचाररक्तपातअपहरणया  अशाबऱ्याच घटनांचा कायम उहापोह करत आलो आहोतपणमुळात काश्मीर समस्या ही भारताच्या पाचवीलाच पुजली आहेअसा बहुतेक भारतीयांचासमज आहेमात्रकिती सरकारे आली आणि गेलीपण या समस्येवर सामंजस्याच्या मार्गाने अद्यापही तोडगा निघालेला नाहीविविध पक्षांचीशिष्टमंडळे काश्मिरात आली  त्यांनीही आपापल्यापरीने काश्मीरच्या सद्यस्थितीवरउपाययोजनांवर अहवाल सादर केलेपणतरीही खोऱ्यातीलपरिस्थिती ‘जैसे थेका आहेकीही चिघळणारी परिस्थिती अशीच ठेवण्यामागे काही गुप्त हेतू आहेत काअसे अनेकविध प्रश्न उभे राहतात.


मुळात काश्मीर प्रश्नाची सुरुवात जरी १९५० च्या दशकात झाली असली तरीआजघडीला काश्मीरमधील समस्येचे मूळ खऱ्या अर्थाने आपल्याला१९७१ पासून पाहावयास मिळते१९७१ च्या युद्धात भारताकडून पराजय पत्करावा लागल्यानंतर पाकवर नामुष्की ओढवली  पाकिस्ताननेथाऊंजड्स कटहे धोरण स्वीकारलेया धोरणानुसार पाकिस्तानने दहशतवाद्यांचा भारताविरोधात हत्यार म्हणून वापर करावयास सुरुवात केली.भारतात विविध समस्या निर्माण करुन सीमेवर तसेच सीमेअंतर्गत अशांतता पसरवण्याचे काम पाकिस्तान वेळोवेळी करत राहिलासीमेवर वारंवारशस्त्रसंधीचे उल्लंघनतर ‘सिमी, ‘इंडियन मुजाहिद्दीन’ यांसारख्या दहशतवादी संस्थांच्या माध्यमातून भारतामध्ये दहशतवादी कारवायांचे मनसुबेराबविले गेलेखरं तर दहशतवाद्यांनी फुटीरतावाद्यांचा मुखवटा चढवून काश्मीरमध्ये कायम संपहरताळबंद पुकारून काश्मीरची अर्थव्यवस्थाखिळखिळी करण्यावर भर दिलात्यामुळे काश्मिरी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीतते म्हणतात नारिकामे हात आणि रिकामेडोके हे नेहमीच घातक ठरतेत्यानुसार काश्मीरमधील बेरोजगारीने हिंसक वळण धारण केलेया फुटीरतावाद्यांना पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनाआयएसआयने कोट्यवधींचा अर्थपुरवठा केलात्यामुळे या बेरोजगारांच्या हाती गैरमार्गाने का होईनाहाती थोडा फार पैसा खेळू लागलात्यामुळेएकीकडे बेरोजगारी वाढावी म्हणून संप घडवायचे आणि बेरोजगारी वाढली कीत्यांना दहशतवादी कृत्यासाठी वित्तपुरवठा करायचाअसे कुटील धोरणपाकिस्तानने भारताविरुद्ध वापरण्यास सुरुवात केली.

२००७ पूर्वी काश्मिरी लोक त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड इमानेइतबारे करत होतेमात्र२००७-२००८ पासून हुरियत नेत्यांनी पाकच्या हुकुमावरूनकाश्मीरमध्ये संप पुकारणे पुन्हा सुरु केलेत्यामुळे काश्मिरातील सर्व व्यवसाय मंदावलेउद्योग ठप्प पडत गेले आणि परिणामी कर्जफेडही मंदावली.काश्मिरातील बेरोजगारीचे विदारक चित्र म्हणजेजे काश्मिरी तरूण विविध राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांत त्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मिरवितातआणि तेच तरूण नंतर दगडफेक करताना दिसतात आणि हेच तरूण सुरक्षा दलांच्या भरतीमध्येही सहभाग नोंदवितातकाश्मीरच्या नागरी समस्याकिती भयंकर आहेतहे आपल्याला या उदाहरणांवरून लक्षात येतेआपल्याकडे विजेचा ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त झालातर जास्तीत जास्त दुरुस्तीसाठीदोन-तीन दिवसात तो सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत दुरुस्त होतोमात्रकाश्मीरमध्ये ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला तरत्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल सहा-सात महिने वेळ लागतोतोपर्यंत तेथील नागरिक अंधारतच आपले जीवनमान व्यतीत करत असतातयामुळे काश्मिरींना किती हालअपेष्टा सहनकराव्या लागतातयाची जाणीव आपल्याला होतेयाचाच नेमका फायदा पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारताविरोधी उठवतानादिसतात.
काश्मीरमधील प्रत्येक नागरिक हा दहशतवादी आहेअसा काही भारतीयांचा मोठा समज असल्याचे काश्मिरींना वाटतेत्यामुळे आम्ही देखीलभारतीय आहोतराष्ट्रवादी विचारसरणीचे आहोतहे सांगताना काश्मिरींचा ऊर अभिमानाने भरून येतोनुकतेच शहीद झालेले औरंगजेब हे पुँछ-राजौरी सेक्टरमधील सलानी गावचे रहिवासी आणि त्यांनी याच मायभूमीसाठी बलिदान दिलेतसेच मकबुल शेरवानी या काश्मिरी युवकाच्याशौर्यगाथा आपल्याला त्याच्या प्रति नमन करावयास भाग पाडतातहा युवक मुळचा बारामुल्लाचा१९४७ मध्ये तो फिरस्तीसाठी म्हणून घराबाहेरपडला  त्याला काही जवानांनी श्रीनगरकडे जाण्याचा मार्ग विचारलामात्रते जवान हे पाकिस्तानचे सैनिक होतेही गोष्ट लक्षात येताचशेरवानीनेत्यांना चुकीचा मार्ग दाखविलात्यामुळे पाकिस्तानी सैनिक तीन दिवस जंगलात भटकत होतेयादरम्यान भारतीय सैन्याने पाक सैन्याचा खातमाकेलात्याची शिक्षा म्हणून पाकिस्तानने मकबुल शेरवानीस जिवंतपणे खिळ्यांनी झाडाला ठोकून मारले  त्या अत्याचारात त्याचा मृत्यू झाला.याचप्रमाणे भारतासाठी ‘रायझिंग काश्मीरया वृत्तपत्राचे मुख्य संपादक सुजात बुखारीसैय्यद मीरकशाहहाजी जाफर खानलेउमर फैय्याज,बिलाल अहमद डार असे अगणित काश्मिरी युवक शहीद झाले आहेत.

या सर्व घटनांचा मागोवा घेण्याचा उद्देश इतकाच कीनेमक्या काश्मीरच्या परिस्थितीची जाणीव आपल्याला व्हावीकेवळ वृत्तपत्रातील बातम्याकिंवा दुरचित्रवाणी संचावरील संभाषणांवरुन आपण काश्मीर समजण्याचा आणि काश्मीरबद्दल मत बनविण्याचा प्रयत्न करत असतोमात्र,काश्मीरमधील विविध क्षेत्रातील सुमारे ३०० पेक्षा जास्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून हे सत्य ‘राष्ट्रीय स्वाभिमान यात्रा’ या चळवळीतूनमांडण्यात आलेकाश्मिरी जनता स्पष्टपणे म्हणते की, “होयभारत आम्हाला प्रिय आहेआमचे भविष्य भारतात आहेआम्हाला शांतता हवी आहे.आम्हाला तुम्ही बंधुभाव द्यावाहीच आमची अपेक्षा आहे.” काश्मीर  काश्मिरी हे आमचेच आहेहा भाव आपणही मनी बाळगलातर आपलीएकजुट दिसेल  पाकच्या नापाक इराद्यांना वेसण घालता येईलरमजानच्या कालावधीत भारतीय सैन्याने जाहीर केलेली शस्त्रसंधी पाकीदहशतवाद्यांच्या पथ्यावरच पडलीया शस्त्रसंधीचा फायदा घेत एका ठिकाणी त्यांचा तासभरापेक्षा जास्त वावर होताअसेही काश्मीरवासीयांचेम्हणणे आहेत्यामुळे भारत सरकारने विविध विकास उपक्रमांबरोबरच काश्मीरमधील दहशतवादविरोधी धोरण कायम ठेवावे आणि खोऱ्यात शांतताप्रस्थापित करावीअशी काश्मीरवासीयांची आशा आहे.

काश्मीर समस्या आणि तिचे उगमस्थान आपल्याला समजलेमात्रत्यावर उपाय काययाचा आपण आता विचार करावयास हवात्यासाठी विविधक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या काश्मिरी नागरिकांशी थेट संवाद साधून राष्ट्रीय स्वाभिमानी चळवळीतील कार्यकर्त्यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेतव त्याचे सादरीकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या समोर केले आहेत्याच उपयांवर आपण सगळ्यांनी मिळून कार्य करणे हेच नंदवनाच्याशांततेचे गमक असेल आणि पुन्हा थंड काश्मीर रक्तरंजित  होताकेशराच्या सुगंधात न्हाहून निघेलतोच आपल्यासारख्या भारतीयांसाठीकश्मिरियतचा दिन ठरेल यात शंका नाही.

नंदनवनाच्या शांततेसाठी सूचविलेले उपाय

काश्मिरींचे संरक्षणप्रोत्साहनसन्मान आणि सशक्तीकरण : या अंतर्गत पाकपासून काश्मिरींचे संरक्षण करणेत्यांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचेरक्षण करणेत्यांच्या जीवनमानास प्रोत्साहन मिळेल अशाप्रकारची धोरणे सरकारने राबविण्यासाठी पुढाकार घ्यावासन्मानजनक जीवन आणि त्याजीवनाचे सशक्तीकरण यावर भर असावा.

भारतातील इतर राज्ये  काश्मीर यामध्ये सलोखा वाढावायासाठी साहित्यकारसांस्कृतिक कार्यकर्तेखेळाडूतरुण पत्रकारसामाजिक कार्यकर्तेआणि विद्यार्थी प्रतिनिधी आदींच्या भारतभ्रमणाचे आयोजन करावेत्याअंतर्गत भारतातील इतर राज्ये आणि काश्मीर यांच्यातील संवाद वाढावा,यासाठी विविध संघटनांच्या सहयोगाने अभ्यासदौऱ्यांच्या आयोजनास प्रोत्साहन द्यावावयास हवे.

काश्मिरी जनतेसोबत भेदभाव  करणे: काश्मिरींची अशी धारणा आहे कीत्यांना भारतातील इतर राज्यात परकीय किंवा दहशतवादी म्हणूनवागणूक दिली जातेत्यामुळे काश्मिरींसोबत भारतातील इतर राज्यातील नागरिकांनी भेदभाव करू नयेअशी अपेक्षा आहे.

केंद्रपुरस्कृत योजनांची योग्य अंमलबजावणी : सरकारी योजनांचा लाभ काश्मीरमध्ये समाजाच्या शेवटच्या स्थरापर्यंत पोहोचत नाही  त्यात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने त्या योजनांची अंमलबजवणी करण्यात मोठी समस्या निर्माण होतेसामान्य व्यक्ती सरकारला न्यायपूर्णसंवेदनशील मानेल असे वातावरण आणि व्यवस्था ही आजमितीस काश्मीरची गरज आहे.

सततच्या आंदोलनामुळे व्यावसायिक कर्जावर कर्जमाफी : काश्मिरी जनता सततचे संपहरताळबंद यांनी ग्रासली आहेत्यामुळे नियमित कर्जफेडकरणाऱ्या काश्मिरींना आता कर्जाचे हफ्ते भरणे शक्य होत नाहीत्यामुळे सरकारने व्यावसायिक कर्जावर कर्जमाफी द्यावीअशी काश्मीरवासीयांचीमागणी आहे.

गृहमंत्रालयात काश्मीरसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती : काश्मीरच्या समस्या सोडविण्याकामी केंद्रात एक नोडल अधिकारी नियुक्त करावा,अशी काश्मिरींची मागणी आहे.

शेतकऱ्यांना हमीभाव आणि सरकारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना : भारतातील इतर राज्यांप्रमाणे काश्मीरमध्ये कृषी उत्पन्न बाजारसमिती अजूनही अस्तित्वात नाहीती स्थापन व्हावी ही काश्मिरी शेतकऱ्यांची विशेष मागणी आहेतसेच काश्मीरमध्ये कोणताही हमीभाव कायदानाहीरिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कोणतेही कर्ज वाटप केले जात नाहीस्थानिक राजकारणी शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळू देत नाहीया सर्वबाबींवर सरकारने योग्य धोरण ठरवावेअशी काश्मीरवासीयांची मागणी आहे.

कश्मीर भी हमाराकश्मिरी भी हमारे...
काश्मिरी जनतेच्या मनात काश्मीर हे भारतभूमीचे अंग जरी असले तरी काश्मिरींची मने ही दुभंगलेली आहेतदहशतवादी वातावरणाच्या छायेतकाश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहेसरकारी योजनांचा लाभ काश्मीरमध्ये समाजाच्या शेवटच्या स्थरापर्यंत पोहोचत नाही वत्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने त्या योजनांची अंमलबजवणी करण्यात मोठी समस्या निर्माण होतेसामान्य व्यक्ती सरकारलान्यायपूर्णसंवेदनशील मानेल असे वातावरण आणि व्यवस्था ही आजमितीस काश्मीरची मुख्य गरज आहेकेवळ काही विशिष्ट कुटुंबीयांचा पगडा हाकाश्मिरी राजकारणावर राहिला आहेकाश्मीरमधील महाविद्यालयांची स्थितीही दयनीय असून केंद्रशासन पुरस्कृत विविध योजना या कार्यन्वितअसूनही तेथील विद्यार्थी हे सदर योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत्युमळे ‘कश्मीर भी हमाराकश्मिरी भी हमारे’ असे आपण भारतीयांनीएकदिलाने ठरवून त्यावर कार्य करण्याची गरज आहे.
अभिमन्यू कोहाड
राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या राष्ट्रीय सुरक्षा
आणि परराष्ट्र संबंधचे राष्ट्रीय संयोजक तथा कार्यक्रम समन्वयक
प्रवर देशपांडे

No comments:

Post a Comment