नुकताच पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी, तपासानंतर अटक करण्यात
आलेल्या माओवादी रोना विल्सन यांच्या घरून जप्त केलेल्या पत्रातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची एखाद्या रोड शोदरम्यान हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले आहे. देशात सुरू असलेल्या या
कारस्थानाबाबत तसेच देशाच्या वर्तमान परिस्थितीवर भारतीय गुप्तचर संस्था- ‘रॉ’चे माजी उपप्रमुख कर्नल
एस. एन. सिंह यांच्या, ‘साप्ताहिक पाञ्चजन्य’ ने घेतलेल्या मुलाखतीतील
काही महत्त्वाचा अंशखास दै. मुंबई तरुण भारतच्या वाचकांसाठी.
एक पैलू असा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हत्येची कारस्थाने गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहेत. सोहराबुद्दीन, इशरत जहाँ ते आता समोर
आलेल्या कटाबाबत आपले काय म्हणणे आहे?
बघा, नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते
आणि त्यांची लोकप्रियता वाढू लागली तेव्हा ते राजकारणात एक हिंदू चेहरा म्हणून
पुढे आले. आधुनिकता आणि विकासपुरुष म्हणून ते लोकांसमोर
आले. आमच्या देशात बर्याच अवधीपासून ‘फोडा आणि राज्य करा,’ या प्रकारच्या
राजकारणानुसार शासनव्यवस्था सुरू होती. कधी जातीच्या
नावावर, तर कधी धर्म आणि संप्रदायाच्या नावावर. ब्रिटिश भलेही आमच्या देशातून गेले असतील; परंतु
त्यांच्या या धोरणानुसारच राजकीय पक्ष आणि नेता काम करीत होते. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी एक वेगळ्या प्रकारचे राजकारण केले. विकासपुरुष
म्हणून त्यांनी आपली छाप पाडली. त्यानंतर त्यांची उंची
वाढत गेली.
त्यामुळे विरोधकांना काळजी वाटू लागली. त्यांना राजकारणातून समाप्त
करण्याचे भरपूर प्रयत्न झालेत, परंतु त्यात विरोधकांना
यश आले नाही. त्यांना असे वाटू लागले आहे की, इथेच या व्यक्तीला थांबविले नाही तर मोदी अवश्य पंतप्रधान बनतील. गुजरात दंगलीनंतर सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास चमू (एसआयटी) स्थापन केला. मुख्यमंत्री असतानाही त्यांची तासन्तास चौकशी केली. नंतर त्यांनाही ‘क्लीन चिट’ मिळाली. त्यानंतर पाकिस्तानच्या मदतीने लष्कर-ए-तोयबाच्या माध्यमातून इशरत जहाँला मोहरा बनवून, मोदींच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला परंतु, हाही
प्रयत्न फसला. त्यानंतर ते भाजपचे पंतप्रधानपदाचे
उमेदवार असताना, पाटण्यातील गांधी मैदानात त्यांना
बॉम्बस्फोटात मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी तिथे
उपस्थित होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मी जेव्हा गांधी मैदानात व्यवस्था बघण्यासाठी गेलो, तर मंचापर्यंत सहज पोचलो. कुणीही मला
अडविण्याचा प्रयत्न केला नाही. मोदी तर पंतप्रधान
होण्यापूर्वीही अत्यंत महत्त्वाचे नेते होते. आता ते
सत्तेत आल्यानंतर माओवाद्यांसह तमाम लोकांची दुकाने बंद झाली आहेत. मोदी सरकार बनल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) जे नारे लागले, ते सर्व प्रकरण पाकिस्तानद्वारा प्रायोजित होते. पाकिस्तान उच्चायोगात एक व्यक्ती आहे- इकबाल
चीमा, त्याचे हे कारस्थान होते. आता एवढ्यातच उमर खालिदचा पिता, पाकिस्तान
उच्चायोगाने दिलेल्या रोजा इफ्तार पार्टीत उपस्थित होता. मोदींच्या हत्येच्या कटाच्या संदर्भात माओवाद्याच्या घरून जप्त पत्राबाबत
जेव्हा मीडियाने उमर खालिदच्या पित्याला प्रश्न विचारला तर तो म्हणाला, “हे पत्र खोटे आहे.” अरे बाबा, तुला कसे कळले की हे पत्र खोटे आहे? तू तर
काश्मिरी आहेस. एकूण काय, मोदींना
राजकीयदृष्ट्या समाप्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा त्यांचे
काहीच नुकसान करता आले नाही, तेव्हा आता त्यांच्या
हत्येची कारस्थाने रचली जाऊ लागली आहेत. मोदींची
सुरक्षा अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हत्येचा कट उघड झाल्यावर, भारतातील मीडिया आणि
राजकारणातील एका गटाने याला हास्यास्पद ठरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तुम्ही याला किती
गंभीरतेने घेता?
काही लोकांना मोदी आवडतात. त्यांच्यासाठी ते जीवदेखील
द्यायला तयार आहेत, तिथेच काहींना मोदी अजिबात आवडत
नाहीत. इतकेच काय, ते
द्वेषही करतात. हा द्वेष इतका पराकोटीचा आहे की, मोदींचे नाव जरी घेतले तरी ते कुढू लागतात. आता
असे लोक, जे मोदींना जिवंत बघू इच्छित नाहीत, ते तर टर उडविणारच ना! गांधी मैदानात जे झाले
त्यानंतर तरी या लोकांच्या मनात काही सहानुभूती तुम्हाला दिसली का? तिथे त्यांना ठार मारण्याचाच कट रचला होता, परंतु
मोदींचे नशीब चांगले म्हणून ते वाचले. हे लोक मोदींचा
इतका द्वेष का करतात, कळत नाही. आता असे लोक तर खुश होणारच ना!
शहरी नक्षलवाद देशाच्या
सुरक्षेला किती मोठा धोका आहे?
एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की, माओवाद्यांचा सर्वांत पहिला
सिद्धांत आहे की, ‘बंदुकीच्या नळीतूनच सत्ता प्राप्त होते.’ दुसरा आहे- ‘शक्तीनेच सत्ता प्राप्त करा.’ त्यांच्या विचारसरणीत लोकशाहीसारख्या गोष्टींना काहीच स्थान नाही. सर्वात आधी त्यांची योजना असते की,दुर्गम क्षेत्रात
जिथे प्रशासन नसल्यातच असते, आपले ‘जाळे’ (नेटवर्क) तयार करणे
परंतु, हे जाळे चालविण्यासाठी एक ‘आधार’ हवा असतो.हा आधार
त्यांच्या कुकर्मांवर पडदा टाकण्यासाठी असतो. न्यायालयात
त्यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी आवश्यक असतो. कुणी
त्यांच्याविरुद्ध लिहू नये म्हणून असतो. विशेषत: इंग्रजी बोलणार्या कथित बुद्धिवाद्यांनी शहरी क्षेत्रात तयार केलेल्या या ‘आधारा’मध्ये वकील, विविध
विद्यापीठांत कार्यरत प्राध्यापक, समाजसेवेच्या नावावर
स्वत:चीच उद्दिष्टे राबविणारे कथित समाजसेवी आहेत. नक्षली क्षेत्रातून अवैधपणे जी हजारो-करोडो रुपयांची
खंडणी गोळा होते, त्यातून ही मंडळी महागडी दारू पीत
असतात. एक गोष्ट मला सांगायची आहे- हे जे शहरी नक्षलवादी आहेत ना, त्यांना तुम्ही
संपवा; माओवाद आपसूकच समाप्त होईल परंतु, हे लोक इंग्रजी बोलणारे आहेत. यांना मीडियात
जागा मिळते आणि म्हणून हे समाजात प्रतिष्ठित असतात. मुळात
यांची प्रवृत्ती आणि प्रकृती गुन्हेगारीचीच आहे. अन्य
गुन्हेगारांशी जसा व्यवहार होतो, तसाच व्यवहार या
लोकांशीदेखील केला पाहिजे.
अंतर्गत सुरक्षेशी
संबंधित कायदे व प्रक्रियांमध्ये भारताला काही परिवर्तन करण्याची गरज आहे का?
मी असे मानतो की, आमचा देश एकप्रकारे छद्म युद्धाचा (प्रॉक्सी वॉर) बळी आहे. एक जिहादी आणि दुसरे साम्यवादी. या दोन्ही विचारसरणी बाहेरून नियंत्रित व प्रोत्साहित होत असतात. ते सोपेही आहे. यात फारच थोड्या लोकांना तुम्हाला
पैसे द्यायचे असतात. तेही येथूनच खंडणी स्वरूपात गोळा केलेले पैसे द्यायचे असतात.
दोन्ही विचारसरणी देशाप्रती द्वेष निर्माण करणार्या आहेत. ही कायदा व
सुव्यवस्थेची समस्या नसून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी
संबंधित आहे. यासाठी कडक कायदे केले पाहिजेत आणि
कठोरपणे हाताळायला हवे.
मुलाखत: हितेश शंकर
No comments:
Post a Comment