Total Pageviews

Saturday, 23 June 2018

शहरी नक्षल्यांना संपवा; माओवाद समाप्त होईल!- भारतीय गुप्तचर संस्था- ‘रॉ’चे माजी उपप्रमुख कर्नल एस. एन. सिंह यांच्या, ‘साप्ताहिक पाञ्चजन्य’ ने घेतलेल्या मुलाखतीतील- काही महत्त्वाचा अंश- महा एमटीबी 18-Jun-2018



 
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहेभीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणीतपासानंतर अटक करण्यात आलेल्या माओवादी रोना विल्सन यांच्या घरून जप्त केलेल्या पत्रातूनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एखाद्या रोड शोदरम्यान हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले आहेदेशात सुरू असलेल्या या कारस्थानाबाबत तसेच देशाच्या वर्तमान परिस्थितीवर भारतीय गुप्तचर संस्था- ‘रॉचे माजी उपप्रमुख कर्नल एसएनसिंह यांच्या, ‘साप्ताहिक पाञ्चजन्य’ ने घेतलेल्या मुलाखतीतील काही महत्त्वाचा अंशखास दै. मुंबई तरुण भारतच्या वाचकांसाठी.


एक पैलू असा आहे कीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची कारस्थाने गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहेतसोहराबुद्दीनइशरत जहाँ ते आता समोर आलेल्या कटाबाबत आपले काय म्हणणे आहे?
बघानरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांची लोकप्रियता वाढू लागली तेव्हा ते राजकारणात एक हिंदू चेहरा म्हणून पुढे आलेआधुनिकता आणि विकासपुरुष म्हणून ते लोकांसमोर आलेआमच्या देशात बर्‍याच अवधीपासून ‘फोडा आणि राज्य करा,’ या प्रकारच्या राजकारणानुसार शासनव्यवस्था सुरू होतीकधी जातीच्या नावावरतर कधी धर्म आणि संप्रदायाच्या नावावरब्रिटिश भलेही आमच्या देशातून गेले असतीलपरंतु त्यांच्या या धोरणानुसारच राजकीय पक्ष आणि नेता काम करीत होतेअशा परिस्थितीत नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनलेत्यांनी एक वेगळ्या प्रकारचे राजकारण केलेविकासपुरुष म्हणून त्यांनी आपली छाप पाडलीत्यानंतर त्यांची उंची वाढत गेली.

त्यामुळे विरोधकांना काळजी वाटू लागलीत्यांना राजकारणातून समाप्त करण्याचे भरपूर प्रयत्न झालेतपरंतु त्यात विरोधकांना यश आले नाहीत्यांना असे वाटू लागले आहे कीइथेच या व्यक्तीला थांबविले नाही तर मोदी अवश्य पंतप्रधान बनतीलगुजरात दंगलीनंतर सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास चमू (एसआयटीस्थापन केलामुख्यमंत्री असतानाही त्यांची तासन्तास चौकशी केलीनंतर त्यांनाही ‘क्लीन चिट’ मिळालीत्यानंतर पाकिस्तानच्या मदतीने लष्कर--तोयबाच्या माध्यमातून इशरत जहाँला मोहरा बनवूनमोदींच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला परंतुहाही प्रयत्न फसलात्यानंतर ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतानापाटण्यातील गांधी मैदानात त्यांना बॉम्बस्फोटात मारण्याचा प्रयत्न करण्यात आलामी तिथे उपस्थित होतोतुम्हाला आश्चर्य वाटेल कीमी जेव्हा गांधी मैदानात व्यवस्था बघण्यासाठी गेलोतर मंचापर्यंत सहज पोचलोकुणीही मला अडविण्याचा प्रयत्न केला नाहीमोदी तर पंतप्रधान होण्यापूर्वीही अत्यंत महत्त्वाचे नेते होतेआता ते सत्तेत आल्यानंतर माओवाद्यांसह तमाम लोकांची दुकाने बंद झाली आहेतमोदी सरकार बनल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयुजे नारे लागलेते सर्व प्रकरण पाकिस्तानद्वारा प्रायोजित होतेपाकिस्तान उच्चायोगात एक व्यक्ती आहेइकबाल चीमात्याचे हे कारस्थान होतेआता एवढ्यातच उमर खालिदचा पितापाकिस्तान उच्चायोगाने दिलेल्या रोजा इफ्तार पार्टीत उपस्थित होतामोदींच्या हत्येच्या कटाच्या संदर्भात माओवाद्याच्या घरून जप्त पत्राबाबत जेव्हा मीडियाने उमर खालिदच्या पित्याला प्रश्न विचारला तर तो म्हणाला, “हे पत्र खोटे आहे.” अरे बाबातुला कसे कळले की हे पत्र खोटे आहेतू तर काश्मिरी आहेसएकूण कायमोदींना राजकीयदृष्ट्या समाप्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा त्यांचे काहीच नुकसान करता आले नाहीतेव्हा आता त्यांच्या हत्येची कारस्थाने रचली जाऊ लागली आहेतमोदींची सुरक्षा अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघड झाल्यावरभारतातील मीडिया आणि राजकारणातील एका गटाने याला हास्यास्पद ठरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहेतुम्ही याला किती गंभीरतेने घेता?
काही लोकांना मोदी आवडतातत्यांच्यासाठी ते जीवदेखील द्यायला तयार आहेततिथेच काहींना मोदी अजिबात आवडत नाहीतइतकेच कायते द्वेषही करतातहा द्वेष इतका पराकोटीचा आहे कीमोदींचे नाव जरी घेतले तरी ते कुढू लागतातआता असे लोकजे मोदींना जिवंत बघू इच्छित नाहीतते तर टर उडविणारच नागांधी मैदानात जे झाले त्यानंतर तरी या लोकांच्या मनात काही सहानुभूती तुम्हाला दिसली कातिथे त्यांना ठार मारण्याचाच कट रचला होतापरंतु मोदींचे नशीब चांगले म्हणून ते वाचलेहे लोक मोदींचा इतका द्वेष का करतातकळत नाहीआता असे लोक तर खुश होणारच ना!


शहरी नक्षलवाद देशाच्या सुरक्षेला किती मोठा धोका आहे?
एक गोष्ट तुम्ही समजून घ्या कीमाओवाद्यांचा सर्वांत पहिला सिद्धांत आहे की, ‘बंदुकीच्या नळीतूनच सत्ता प्राप्त होते.’ दुसरा आहे- ‘शक्तीनेच सत्ता प्राप्त करा.’ त्यांच्या विचारसरणीत लोकशाहीसारख्या गोष्टींना काहीच स्थान नाहीसर्वात आधी त्यांची योजना असते की,दुर्गम क्षेत्रात जिथे प्रशासन नसल्यातच असतेआपले ‘जाळे’ (नेटवर्कतयार करणे परंतुहे जाळे चालविण्यासाठी एक ‘आधार’ हवा असतो.हा आधार त्यांच्या कुकर्मांवर पडदा टाकण्यासाठी असतोन्यायालयात त्यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी आवश्यक असतोकुणी त्यांच्याविरुद्ध लिहू नये म्हणून असतोविशेषतइंग्रजी बोलणार्‍या कथित बुद्धिवाद्यांनी शहरी क्षेत्रात तयार केलेल्या या ‘आधारामध्ये वकीलविविध विद्यापीठांत कार्यरत प्राध्यापकसमाजसेवेच्या नावावर स्वत:चीच उद्दिष्टे राबविणारे कथित समाजसेवी आहेतनक्षली क्षेत्रातून अवैधपणे जी हजारो-करोडो रुपयांची खंडणी गोळा होतेत्यातून ही मंडळी महागडी दारू पीत असतातएक गोष्ट मला सांगायची आहेहे जे शहरी नक्षलवादी आहेत नात्यांना तुम्ही संपवामाओवाद आपसूकच समाप्त होईल परंतुहे लोक इंग्रजी बोलणारे आहेतयांना मीडियात जागा मिळते आणि म्हणून हे समाजात प्रतिष्ठित असतातमुळात यांची प्रवृत्ती आणि प्रकृती गुन्हेगारीचीच आहेअन्य गुन्हेगारांशी जसा व्यवहार होतोतसाच व्यवहार या लोकांशीदेखील केला पाहिजे.


अंतर्गत सुरक्षेशी संबंधित कायदे व प्रक्रियांमध्ये भारताला काही परिवर्तन करण्याची गरज आहे का?
मी असे मानतो कीआमचा देश एकप्रकारे छद्म युद्धाचा (प्रॉक्सी वॉर) बळी आहे. एक जिहादी आणि दुसरे साम्यवादीया दोन्ही विचारसरणी बाहेरून नियंत्रित व प्रोत्साहित होत असतातते सोपेही आहे. यात फारच थोड्या लोकांना तुम्हाला पैसे द्यायचे असतात. तेही येथूनच खंडणी स्वरूपात गोळा केलेले पैसे द्यायचे असतात. दोन्ही विचारसरणी देशाप्रती द्वेष निर्माण करणार्‍या आहेत. ही कायदा व सुव्यवस्थेची समस्या नसूनदेशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आहेयासाठी कडक कायदे केले पाहिजेत आणि कठोरपणे हाताळायला हवे.


No comments:

Post a Comment