पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आणि आनंदाच्या
भ्रामक संकल्पनांची भुरळ पडल्यामुळे आजच्या तरुणपिढीमध्ये व्यसनाधिनता वाढत चालली
आहे. सिगारेट, दारु यांबरोबरच
नव्या पिढीत हुक्का कल्चर फोफावत चालले आहे. कमला मिल येथे घडलेले अग्निकांड हुक्यातील
ठिणगीमुळे घडल्याचे समोर आले आहे. आज शहरा-महानगरांबरोबरच गावांमध्येही हुक्क्याची
गुडगुड तरुणांबरोबरच तरुणींनाही आपल्या कह्यात घेत आहे.
नवी दिल्लीला वाढत्या प्रदूषणामुळे स्मॉगसारख्या
संकटाला सामोरे जावे लागत असताना मुंबई आणि राज्यातील अनेक शहरांना मात्र वेगळ्याच
“धुरा’ने ग्रासले आहे. हा धूर एखाद्या विटभट्टी किंवा
कारखान्यातील नसून तो हुक्काबारमध्ये धुंद होणाऱ्या हजारो तरुणांच्या तोंडातून
बाहेर पडणारा आहे. कमला मिल कम्पाऊंडमधील एका पबमधील हुक्काबारच्या ठिणगीने वणवा
पेटला आणि अग्नितांडवाने काही जणांचा बळी घेतला. ही ठिणगी बदलत्या समाजाचे भयानक
चित्र उभी करणारी आहे. या ठिणगीवर वेळीच पाणी मारणे गरजेचे आहे; कारण ती या देशाच्या आधारस्तंभांना आपल्या कह्यात घेत
आहे.
गेल्या काही वर्षात पाहिलं तर व्यसनाकडे वळण्याचा
सरासरी वयोगट कमी होत चालला आहे असे दिसते. आजमितीला 18 वर्षांखालील मुलांमध्येही व्यसनाधिनता मोठ्या
प्रमाणात आहे. साहजिकच, या सर्वांमागची कारणे काय असा
प्रश्न उपस्थित केला जातो. अशा प्रकारे पार्टीकल्चर, व्यसनाधिनता वाढण्याला अनेक कारणे आहेत. यातील पहिले
कारण म्हणजे अलीकडील काळात पार्टी करण्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यातच
मग एकत्र जमून सेलीब्रेशन करताना अंमली पदार्थ घेतल्याशिवाय एंजॉय करताच येत नाही
असा एक भ्रामक आणि चुकीचा समज बळावत चालला आहे. त्यामुळे हे प्रकार वाढत आहेत.
दम मारो…दम… असे म्हणत
अंमली पदार्थाचे सेवन करणारी चित्रपटातील नायक-नायिका जेव्हा बेधुंद होऊन नाचते
तेव्हा ते भारतातील तरुणपिढीमध्ये पसरत चाललेल्या व्यसनाधिनतेचे निदर्शक असते. “हरे रामा हरे कृष्णा.. या चित्रपटाला चार दशकाहून अधिक
काळ लोटला आहे. त्यावेळी त्या व्यसनाने भारतात बाळसे धरले होते. आता त्याची
व्याप्ती महाकाय बनली आहे. अंमलीपदार्थाबराबेरच “गुडगुड..’ आवाज करत धूर काढणारी तरुणाई ही हुक्क्चा आहारी
गेलेली दिसून येत आहे. हुक्का पार्लरच्या नावाखाली नव्या पिढीला व्यसनांध करणारा
व्यवसाय आता केवळ मुंबई, पुण्यापुरतीच मर्यादित राहिला
नाही तर ग्रामीण भागातही पोहचू लागला आहे. उदाहरणच घ्यायचे असेल तर सांगलीतील
विश्रामबाग अणि मिरजेतील महाविद्यालयीन परिसरात अशा प्रकारचे पार्लर सुरू
असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या.
नशा, थ्रील, मजा, धिंगाणा, मस्ती या भोवती घुटमळत असताना तरुण व्यसनाच्या आहारी
कधी जातात, हे कळतही नाही.
हुक्क्याची नशा म्हणजे सुगंधी तंबाखू ओढण्याचाच प्रकार असल्याचे सांगितले जाते. उत्तरेकडील अगदी काश्मीरपर्यंत खेडोपाडी अशा प्रकारचा हुक्का ओढला जातो. जुन्या बहुतांशी चित्रपटात हुक्का ओढणारा खलनायक किंवा बुजूर्ग मंडळी आपण पाहिली असेल. “देवदास’सारख्या चित्रपटात ऐश्वर्याचा पती “हुक्का ठाकुरों की शान है’ असे म्हणताना दिसला होता. अशा प्रकारचे उदात्तीकरण सिनेमासारख्या माध्यमातून केले गेल्यामुळे हुक्क्याविषयीचे आकर्षण वाढत गेले. आज काळानुरुप यामध्ये स्ट्राबेरी, बनाना, पायनापल अशा विविध फ्लेवर उपलब्ध झाले आहेत. शंभर ते पाचशे रुपयात तासभर नशापाणी केले जाते. दर्जानुसार त्याचे दर निश्चित केले जातात. या सुंगधी तंबाखूबरोबरच गांजा किंवा अंमली पदार्थाचे सेवनही केले जाते. एकूणच ही हुक्का पार्लर म्हणजे नव्या पिढीला बरबाद करणारी केंद्रे ठरत आहे.

पूर्वीच्या काळी शहरातील व्हिडिओ पार्लरमध्ये जमणारी
तरुणाई आता या हुक्कापार्लरमध्येही दिसू लागली आहे.
काही वर्षांपूर्वी जेथे स्मोकिंग झोन होता, त्या हॉटेल्समध्ये हुक्का ठेवण्यास अडचण नाही, अशी न्यायालयाने संमती दिली होती. त्यानंतर हुक्काबारने डोके वर काढले. हुक्क्यावर बंदी आली असली तरी हुक्का ज्या पेनमधून मिळतो, त्या पेन्सची चलती विद्यार्थ्यांत वाढली आहे. अवघ्या शंभर रुपयात मिळणारी अशी शेकडो पेन्स ही व्यसनमुक्तीच्या विरोधात काम करणाऱ्या संस्थांनी ताब्यात घेतली आहेत. एक ग्रॅम कोकेन 3000 रुपयाला असताना व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना 150 ते 200 रुपयांना मिळणारे एमडी आणि तासाच्या हिशेबाने तीनशे ते पाचशे रुपयांना मिळणारा हुक्का अधिक स्वस्त वाटू लागला. जागा मिळाली नाही तर भाड्याने राहणाऱ्या मित्रांच्या घरीही हुक्का पार्ट्यांचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे.

आरोग्याचा “धूर’
हुक्क्याचा एक कश हा शंभर सिगारेट ओढल्याइतका घातक
असतो. हुक्क्याचे पॅसिव्ह स्पोकिंगही तितकेच भयानक असते. हुक्क्यात असलेल्या
कोळशामुळे कार्बन मोनोऑक्साईडसह अनेक घातक वायू तयार होतात आणि त्याचा आरोग्यावर
दुष्पपरिणाम होतो. ग्रामीण आणि शहरी भागातील कर्करोगाचे वाढते रुग्ण पाहिल्यास
त्यांमध्ये हुक्क्याचे व्यसन असणारे हमखास आढळतात. अर्धा ते पाऊणतास सतत हुक्का
ओढत राहिल्यास शरिरातील निकोटीनचे प्रमाण 200 टक्क्यांहून अधिक वाढते. कर्करोगाचा विळखा जेवढा
तंबाखू आणि सिगारेटमुळे आवळत जातो, तितकाच तो हुक्क्यामुळेही आवळू शकतो. हुक्क्यातील
व्यसन हे 18 ते 24 या वयोगटात अधिक आहे. यामध्ये तरुणांइतकेच तरुणींचे
प्रमाणही अधिक आहे. अशा प्रकारच्या घटना समोर आल्या की पोलिस यंत्रणा काय करते असा
प्रश्न विचारला जातो.
व्यसनांबाबतचे कायदे असूनही, व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढते आहे, याचा अर्थ एक तर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत
नाही असा शेरा मारला जातो. परंतु एकट्या पोलिसांना दोष देऊन आपल्याला जबाबदारीतून
मोकळे होता येणार नाही वा हात झटकता येणार नाही. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती
करणे ही या समाजातील प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. यामध्ये अधिक जबाबदारी आहे ती
पालकांची. आज जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. आधुनिकतेचे वारे वाहत आहे. पाश्चात्त्य
संस्कृतीचा प्रभावही वाढत आहे. परंतु त्याच वेळी आई-वडील आणि मुले यांच्यातील
संवाद दुर्मिळ होत चालला आहे. आपली मुले काय करतात, ती कोणाच्या संगतीत आहेत याची बहुतांश पालकांना कल्पना
नसते. ते फक्त मुलांना लागेल तसा पॉकेटमनी पुरवतात. परंतु पालकांनी आपल्या
मुलांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबतची जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे.
पालकांप्रमाणेच शिक्षकांची जबाबदारीही यामध्ये मोठी
आहे. आपल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे, त्यांना व्यसनांकडे न वळण्याबाबतचे शिक्षण देणे ही
जबाबदारी शिक्षकांनी पार पाडायला हवी. मीडियाचीही जबाबदारी यामध्ये मोठी आहे.
व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करण्यामध्ये त्यांनीही अधिक प्रमाणात सहभागी व्हायला
हवे. एकूणच, मुलांना व्यसनांपासून
रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करायला हवेत
No comments:
Post a Comment