Total Pageviews

Thursday, 22 February 2018

पाणी कसे प्याल?

पाणी शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. कारण पाण्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहणे शक्य होते. पण कितीही पाणी पिणे चांगले नाही. कधी आणि किती पाणी प्यायचे याला काही धरबंध आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यावरच अनेक गंभीर आजारांपासून वाचता येते.
• जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्यायल्याने नंतर खाल्ले जाणारे अन्न चांगले पचते. पण लोक भरपेट जेवण झाल्यावर घटाघट पाणी पितात. हे चुकीचे आहे. हे आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते.
• आंघोळीला जाण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय ठेवा. त्यामुळे रक्तदाब कमी व्हायला मदत होते. ज्यांना हाय ब्लडप्रेशर आहे, त्यांनी तर ही सवय लावून घ्यायलाच हवी.
• रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिणं खूप चांगली गोष्ट आहे. दररोज ते करा. त्यामुळे हृदयविकार सोडाच, हृदयाशी संबंधित कोणताही विकार जवळही फिरकणार नाही. झोपायला जाण्याआधी एक ग्लास पाणी पिण्याचीही सवय जडवून घ्या.
• दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्याच्या एक ग्लास पाण्यात दोन मोठे चमचे मध आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालून ते प्या. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहून कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहाते.
• पाणी घटाघटा प्यायचे नाही. ते हळुवार आणि घोटघोट प्यायला पाहिजे. कारण त्यामुळे तोंडात जी लाळ तयार होते ती पोटातील अन्न पचवण्यासाठी आम्ल तयार करण्यासाठी फायद्याची ठरते.
• पाणी कधीही बसूनच पिणे चांगले. त्यामुळे निर्माण होणारे क्षार पोटात अन्नाचे चांगले पचन करतात. पोटात ठरावीक प्रमाणात पाणी असेल तर विकार होत नाहीत.

No comments:

Post a Comment