Total Pageviews

Monday, 12 February 2018

MAJOR AVIJITSINGH WHO LEAD THE QUICK REACTION TEAM IN SANJUWAN CANTT IS RECOVERING AFTER 7 HOURS OF OPERATION-

MAJOR Avijit is son of  COL Samar Vijay Singh of  Mahar regiment WHO IS MY COURSE MATE & DEAR FRIEND.
God जम्मू येथील सुंजवान या ठिकाणी असलेल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांचे रोमहर्षक अनुभव सध्या समोर येत आहेत. असाच एक अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे तो मेजर अभिजित यांनी विचारलेल्या प्रश्नाचा! भारताच्या प्रेमापोटी जवान आपला प्राण पणाला लावतात हे आजवर आपण ऐकून होतो, त्याची उदाहरणेही समोर आली आहेत. तसेच उदाहरण आहे ते मेजर अभिजित यांचे. मेजर अभिजित ४ दिवसांपूर्वी जखमी झाले आणि त्यानंतर त्यांची शुद्ध हरपली. त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात झाली. औषधांना ते प्रतिसाद देत होते मात्र ते बेशुद्ध होते. अखेर आज झालेल्या सर्जरीनंतर ते शुद्धीवर आले आणि शुद्धीवर येताच त्यांचा पहिला प्रश्न होता ‘दहशतवाद्यांचे काय झाले? ‘
आपल्याला काय लागले आहे? किती इजा झाली आहे, आपण चालू फिरू शकतो की नाही.. एखादा अवयव निकामी तर झाला नाही ना? अशा कोणत्याही प्रश्नापेक्षा मेजर अभिजित यांना प्रश्न पडला तो भारताच्या सीमेत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा. दहशतवाद्यांचा खात्मा करणे त्यांच्यासाठी इतर कशाहीपेक्षा महत्त्वाचे ठरले. त्यांनी विचारलेला हा प्रश्न त्यांची देशभक्ती अधोरेखित करणारा आहे. तसेच एका जवानाच्या मनात देशाविषयी काय भावना असतात ते दाखवणाराही ठरला आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
सध्या माझी प्रकृती चांगली आहे, तसेच मी डॉक्टरांशी बोलू शकतो याचे समाधान वाटते आहे. दिवसातून दोनदा फिरायला मिळते आहे म्हणजे माझ्या प्रकृतीत सुधारणा होते आहे असेही मेजर अभिजित यांनी एएनआयला सांगितले आहे. मी बेशुद्ध झाल्यावर म्हणजेच मागच्या तीन चार दिवसात काय घडले ते मला ठाऊक नाही असेही अभिजित यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी विचारलेला प्रश्न त्यांच्या आणि देशाच्या प्रत्येक जवानाच्या मनातील देशभक्ती दाखवणारा आहे.
 bless him with long happy and healthy life.We admire his fighting spirit.

जम्मू शहरात वसलेल्या सुंजावन लष्करी परिसरावर झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात सैन्याला यश मिळाले आहे. लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवले आहे; मात्र भारताचे सहा जवान शहीद झाले आहेत आणि 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 6 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. हे सैनिकी कुटुंबातील आहेत. सुंजावन कँटोन्मेंट परिसर खूप मोठा आहे आणि तिथे सैनिकांचे कुटुंबीय राहतात.
दहशतवाद्यांनी कँटोन्मेंटमधील नाल्यातून प्रवेश करून तिथल्या कुटुबांवर हल्ला केला. तिथे असलेला संतरी मारला गेला आणि नंतर लष्कराच्या कुटुंबावर हल्ला करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराकडून त्यांना योग्य प्रकारे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जवळपास 60 तास ही चकमक सुरू होती. यादरम्यान तिथल्या सर्व लष्करी अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांना तिथून दुसरीकडे हलवण्यात आले. या हल्ल्यामध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असले, तरी एखाद-दुसरा दहशतवादी घरामध्ये लपून बसलेला असू शकतो. ज्यावेळी ऑपरेशन संपले असे जाहीर करण्यात येईल, त्यानंतर तो हल्‍ला करू शकतो. म्हणूनच सर्व कुटुंबांना सुरक्षित जागी हलवून मगच शोधमोहीम हाती घेतली पाहिजे. तसे केल्यास ही शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर खर्‍या अर्थाने कोणीही दहशतवादी तिथे लपलेला नाही, असे जाहीर करता येईल. 
सध्या दहशतवाद्यांना वीर पंजालच्या जम्मू आणि उधमपूरच्या भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवण्यात पुन्हा पुन्हा अपयश येत आहे. आता झालेला हल्ला 14 महिन्यांनंतर झालेला आहे. याआधी पठाणकोट भागात एका लष्करी तळावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर 14 महिन्यांनी हा हल्ला झाला आहे. म्हणजे दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानची जम्मू आणि उधमपूर भागात हिंसाचार घडवण्याची क्षमता कमी झालेली आहे. एवढेच नव्हे, तर या हल्ल्यात ज्यांनी भाग घेतला होते, ते दहशतवादीही काश्मीर खोर्‍यातून आले होते. याचाच अर्थ जम्मू आणि उधमपूर भागातील रहिवाशांचा दहशतवादाला पाठिंबा नाही. म्हणूनच दहशतवादी हे बाहेरून आणावे लागताहेत. 
आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सुंजावन हल्ल्यामधील  सर्वच दहशतवादी पाकिस्तानी होते. पाकिस्तानी सैन्याचा आणि आयएसआयचा काश्मीरमध्ये तयार होणार्‍या दहशतवाद्यांवर फारसा विश्‍वास उरलेला नाही. काश्मीर खोर्‍यातील दहशतवादाकडे वळणार्‍या युवकांची लढाई करण्याची क्षमता कमी असते. त्यांना केवळ समाजमाध्यमांवर आपले फोटो टाकून गर्जना करता येतात. अशा प्रकारच्या आत्मघातकी हल्ल्यात त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. त्यामुळेच आयएसआयला पाकिस्तानातून दहशतवादी पाठवून अशा प्रकारचे हल्ले करावे लागताहेत. 
आताच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांमध्ये मेजर अभिजित यांच्या डोक्यामध्ये गोळी लागली होती; मात्र 7 तासांच्या ऑपरेशननंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. त्यासाठी लष्करातील डॉक्टरांचे कौतुक करावे लागेल. लष्कराच्या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पोहोचलेल्या जवानाचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी बातमी आलेली नाही. हे लक्षात घेता, लष्कराच्या तातडीच्या व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एवढेच नव्हे, तर एका शिपायाच्या गर्भवती महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. या स्त्रीला खूप रक्‍तस्राव झाला होता; मात्र डॉक्टरांच्या चमूने ज्यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, हाडांचे तज्ज्ञ सहभागी असतात. त्यांनी सर्वप्रथम बाळाचा जन्म होण्यासाठी तिला मदत केली आणि नंतर पाठीत घुसलेल्या गोळ्या काढण्यात यश मिळवले. 
काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद्यांची संख्या ही 200 ते 300 च्या घरात असावी. जम्मू, उधमपूर भागात 15-20 संख्येच्या दरम्यान दहशतवादी असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसांमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी सीमेवरील गोळीबाराचे प्रमाण वाढवून दहशतवाद्यांना आत घुसवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतच राहील. त्याशिवाय 2018 वर्षात जगाचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी काश्मीर खोर्‍यातील हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आत्ताच फेब्रुवारीमध्ये संरक्षण अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. संरक्षणासाठी असलेला हा अर्थसंकल्प अत्यंत अपुरा आहे, असेच विश्‍लेषण त्यानंतर करण्यात आले होते. पाकिस्तानच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हा पुरेसा नाही. दोन वर्षांपूर्वी असा हल्ला पठाणकोटवर झाला होता, तेव्हा व्हाईस चिफ ऑफ आर्मी स्टाफ फिलिप्स कम्पोझ यांनी एक मोठा अहवाल तयार केला होता. त्यात काश्मीरच्या सर्वच कॅम्पच्या सुरक्षेसाठी सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे, असे म्हटले होते. कोणत्याही लष्करी तळाभोवती संरक्षक भिंत असली पाहिजे, तारेचे कुंपण असले पाहिजे, वॉच टॉवर असले पाहिजेत, अशी शिफारस केली होती. यामुळे दहशतवाद्यांना सहजपणे शिरकाव करता येणार नाही. त्यासाठी 1600 कोटी रुपयांची गरज होती. दुर्दैवाने या अहवालाची अंमलबजावणी झालेली नाही.
सात वर्षांपूर्वीही अशाच प्रकारचा अहवाल तयार करण्यात आला होता. तेव्हाही काश्मीरमधील लष्करी कॅम्पच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले होते आणि त्याकरिता कुंपण कसे असले पाहिजे, यावर भरपूर माहिती देण्यात आली होती; मात्र संरक्षण मंत्रालयाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशा दुर्लक्षामुळेच दहशतवादी हल्ल्यांना आपण पूर्णपणे तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे या हल्ल्यांमुळे होणार्‍या नुकसानीस अर्थमंत्रालयही जबाबदार आहे. जे सैनिक काश्मीरमध्ये लढताहेत, त्यांना पुरेसे पैसे पुरवण्यासही ते तयार नाहीत. पायदळाच्या जवानांना इन्सास रायफलऐवजी दुसरी चांगली रायफल लढण्यासाठी मिळणे आवश्यक आहे. ती देण्यातही आपण अयशस्वी झालो आहोत. हे निःसंशय अर्थमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाचे अपयश आहे. कँटोन्मेंटवर झालेल्या या हल्ल्यातून धडा घेऊन लष्करी तळांभोवती कुंपण अधिक चांगले करण्यासाठी मदत मिळेल. भारतासारखा प्रचंड आणि आर्थिक महासत्ता असलेला देश जर संरक्षणासाठी सज्ज सैनिकांच्या हत्यारांच्या गरजा पुरवू शकत नसेल, तर त्यासारखी दुर्दैवाची गोष्ट असूच शकत नाही



No comments:

Post a Comment