Total Pageviews

Wednesday, 14 February 2018

दिवसाढवळ्या सीमेपलीकडून घुसखोरी केली जाते,शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते, त्यावेळी मणिशंकर अय्यरांनी आपल्या प्रियतमाकडून भारताच्या कुरापती न काढण्याचे वचन का घेतले नाही?-महा एमटीबी

कांच्या नजरेत भरेल असे कोणतेही शाश्वतचिरंतन कार्य करण्याची पात्रता अंगी नसली कीमग भडक वक्तव्ये करत चर्चेत राहण्याची थेरं केली जातात.मणिशंकर अय्यर हे या जमातीचे प्रतिनिधीत्व करणारे मुकुटमणी!
“मी पाकिस्तानवर प्रेम करतोकारण मी भारतावरही प्रेम करतोभारताने आपल्या शेजारी देशावर प्रेम केले पाहिजे,’’ असा उफराटा सल्ला मणिशंकरअय्यर या काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या भणंगाने दिलाआपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहणारा तमासगीर म्हणजेमणिशंकर अय्यरलोकांच्या नजरेत भरेल असे कोणतेही शाश्वतचिरंतन कार्य करण्याची पात्रता अंगी नसली कीमग भडक वक्तव्ये करत चर्चेत राहण्याचीथेरं केली जातातमणिशंकर अय्यर हे या जमातीचे प्रतिनिधीत्व करणारे मुकुटमणीआपल्या तोंडातून गटार ओकत राहण्याची कला मणिशंकर अय्यर यांनीअगदी सुरुवातीपासून अवगत केल्याचे दिसते१९९८ साली अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी होतेवाजपेयी यांच्या नेतृत्वकर्तृत्व आणि वक्तृत्वासमोरमणिशंकर अय्यर म्हणजे काँग्रेसच्या थोड्याबहुत नावावर पोसलेले बांडगुळचकारणगांधी-नेहरू परिवार भक्तीपरायण असलेला जीव म्हणजे मणिशंकरअय्यरघराण्याची गुलामगिरी हीच त्यांची ओळखतर याच अय्यरांनी तेव्हा अटलजींना ‘नालायक’ म्हणण्याचा उद्दामपणा केलाकेवळ भाजपसंघ आणिराष्ट्रवादी शक्तींविषयी मनात अफाट द्वेष भरलेला असल्यानेच मणिशंकरांनी अटलजींवर अश्लाघ्य भाषेत थुंकण्याचा उपद्व्याप केला आणि आज त्याचमणिशंकर अय्यरांचे पाक प्रेम ऊतू जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.
पाकिस्तानवरील प्रेम जगजाहीर करण्याची मणिशंकर अय्यर यांची ही काही पहिलीच वेळ नाहीत्यांनी याआधीही आपल्या पाकप्रेमाची कबुली वेळोवळीकेलेल्या वक्तव्ये आणि कृतीतून दिलेली आहेचसध्या जगभर प्रेमाचा मौसम सुरू असल्याचे प्रसारमाध्यमांतूनसमाजमाध्यमातून आणि आपल्याअवतीभवती घडणार्‍या घटनांतून दिसतेपणमणिशंकर अय्यरांची कथाच न्यारीत्यांनी थेट पाकिस्तानसारख्या अखंड भारतद्वेषावर उभ्या असलेल्यादेशावरच प्रेम असल्याचा दावा केलाशिवाय आपल्या या प्रियतमावर भारतासह इथल्या नागरिकांनीही प्रेम करावेअसा शहाजोग सल्लाही दिलापण,मणिशंकर अय्यरांना हे ठणकावून सांगावेसे वाटते कीज्या देशाला आपल्या जन्मापासून फक्त भारतीयांच्या रक्ताचीच चटक लागलेली आहेज्या देशानेआजपर्यंत भारतमातेच्या हजारो वीरपुत्रांचा बळी घेतलाज्या देशाने काल-परवापर्यंत भारतातील शेकडो निष्पापांचा जीव घेतलात्या देशावर इथला सच्चादेशभक्त कधीही प्रेम करू शकत नाहीतर पाकिस्तानच्या नापाक कारवायांपायी ज्यांना बलिदान द्यावे लागलेज्यांच्या घरातले कर्ते-धर्ते गेले त्यांच्याडोळ्यातील अश्रू ज्यांना दिसत नाहीअशी उलट्या काळजाची मंडळीच त्या देशावर प्रेम करू शकतातअन्य कोणीही नाहीगेल्या कितीतरी वर्षांपासूनपाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्याचे धोरण अवलंबले आहे.
९०च्या दशकात याच पाकिस्तानच्या धोरणामुळे जम्मू-काश्मिरात दहशतवादाचा राक्षस उदयास आलापाकच्या सर्वप्रकारच्या रसद पुरवठ्यामुळे या राक्षसानेअक्राळविक्राळ रूप धारण केल्याचे जगाने पाहिलेदहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यांनी काश्मीरचे जनजीवन विस्कळीत झालेतिथली शांतता लोपपावलीलाखो काश्मिरी पंडितांना तिथून पलायन करावे लागलेमुंबईदिल्लीगुजरात आणि देशातल्या कित्येक ठिकाणांवर याच पाकपुरस्कृतदहशतवाद्यांनी थैमान घातलेदेशाचा मानबिंदू असलेल्या संसदेवर पाकिस्तानच्याच पाठिंब्याने हल्ला करण्यात आलापठाणकोटउरी आणि कालपरवासुंजवानातही याच देशाच्या समर्थनातून दहशतवादी हल्ले झालेपणया सर्व हल्ल्यांच्यावेळी मणिशंकर अय्यर हा पाकिस्तानचा प्रियकर कुठल्या बिळातलपून बसला होतात्याने आपल्या प्रिय देशाला भारतावर हल्ला  करण्याची शपथ का घातली नाहीदिवसाढवळ्या सीमेपलीकडून घुसखोरी केली जाते,शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जातेत्यावेळी मणिशंकर अय्यरांनी आपल्या प्रियतमाकडून भारताच्या कुरापती  काढण्याचे वचन का घेतले नाहीपाकिस्ताननेभारतावर एक-दोन नव्हेतीन युद्धे लादली त्यावेळी मणिशंकर अय्यर कुठल्या प्रेमाची कबुतरे उडवित होतेहे प्रश्न विचारावेच लागतील आणि त्यांची उत्तरेहीमणिशंकरांना द्यावी लागतील आणि जर मणिशंकरांकडे त्यांची उत्तरे नसतील तर त्यांनी आपल्या प्रिय देशातल्या बगलबच्च्यांनाही हे विचारावेपण इथल्यातमाम देशप्रेमी नागरिकांचे कुतूहल मात्र शमवावे.
मणिशंकर अय्यर यांचे जन्मठिकाण म्हणजे पाकिस्तानातील लाहोर शहरपाकिस्तानात त्यांचे नेहमीच येणे-जाणे असतेपंचतारांकित चर्चेच्या मैफिलींचेआयोजन करायचे आणि तिथून फुकटचे सल्ले द्यायचेहा त्यांचा आवडता उद्योगपंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष नसानसात भिनलेला हा मनुष्य२०१४ सालीलोकसभा निवडणुकीवेळी या इसमाने मोदींना ‘ चायवाला’ म्हणत हिणवलेपण मोदींनी त्यांचीच ‘चायवाला’ म्हणून केलेली हेटाळणी उचलून धरत ‘चायपे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करत काँग्रेसला आसमान दाखवले२००४ साली याच माणसाने शेकडो क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या स्वातंत्र्यवीरसावरकरांचा अपमान केलाअंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या सावरकरांनी तिथे तुरुंगात असताना अनेकानेक कविता रचल्यापण डोक्यातद्वेषाचे विष भिनलेल्या मणिशंकर अय्यरांनी त्यांच्या कविता तेथून खोडून काढल्याहटवल्याअशी ही निलाजरी आणि केवळ एका घराण्याने टाकलेल्यातुकड्यावर पोसलेली व्यक्ती२००० साली त्यांनी मुलायमसिंह यादव यांच्याबाबतही असेच वादग्रस्त विधान केले. ‘‘मुलायमसिंह माझ्यासारखे दिसतात कारणमाझे वडील एकदा उत्तर प्रदेशला गेले होतेत्यांच्या आईंना विचारा,’’ अशा शब्दांत त्यांनी आपली लायकी दाखवली होतीगुजरात निवडणुकीवेळी याचमणिशंकर अय्यर यांनी आपल्या घरी मेजवानीचे आयोजन करत पाकिस्तानी बोलभांडांना चर्चेचे निमंत्रण दिलेयावेळी त्यांनी ‘‘पाकिस्तानला शांतता हवीअसेलतर भाजपला हटवून काँग्रेसला सत्तेवर बसवा,’’ अशी विनवणी केलीभारतातल्या कित्येक दहशतवादी हल्ल्यांत हात असलेल्या कुख्यात दहशतवादीहाफिज सईदला ‘हाफिजसाहेब’ म्हणण्याचा प्रतापही याच माणसाच्या नावावर आहेआता तर त्यांनी पाकिस्तानवरील प्रेमाचीच जाहीरपणे वाच्यता केली.पणभारतमातेचा सुपुत्र कुलभूषण जाधव याच पाकिस्तानच्या काळकोठडीत आयुष्य कंठत आहेत्यांच्या आई आणि पत्नीची कपाळावरील कुंकू पुसून,गळ्यातील मंगळसूत्र काढायला लावूनपायातल्या चपला काढून याच पाकिस्तानने अवहेलना केलीपणत्यावेळी मणिशंकर अय्यर यांनी याविरोधातआपल्या प्रिय देशासमोर एकदाही दात उघडल्याचे समोर आले नाही की कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केल्याचे दिसले नाहीत्यामुळे अशापाकप्रेमाची लागण झालेल्या किडीपासून सुटका होणेहीच भारताची आजची गरज आहेअसेच म्हणावे लागेल

No comments:

Post a Comment