Total Pageviews

Monday, 12 February 2018

रोहिंग्यांचा पुळका आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा!- दत्ता पंचवाघ


 

एखाद्या गढीसारखा असला तरी त्याच्या आसपास रोहिंग्या मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात वस्ती केली आहेया रोहिंग्या मुस्लिमांच्या वस्तीमुळेदहशतवाद्यांना लष्करी तळावर हल्ला करणे सोपे झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 



एकीकडे लष्करी तळावरकेंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावण्यांवर दहशतवादी हल्ले करीत असताना दुसरीकडेजम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीमेहबूबा मुफ्ती यांनी, ‘‘रक्तपात थांबवायचा असेल तर पाकिस्तानशी चर्चा करणे गरजेचे आहे,’’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘‘जम्मू-काश्मीरमधील जनतेला खूप त्रास होत आहेयुद्ध हा पर्याय होऊ शकत नसल्याने आपण चर्चा करायला हवी,’’ असेही त्यांनी म्हटले आहेअसे विधानकरण्याआधी त्यांनी राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजपला आणि केंद्र सरकारला तरी विचारले होते का? ‘‘असली बोटचेपी भूमिकाघेण्याऐवजी दहशतवाद्यांचा आम्ही कठोरपणे बीमोड करूत्यांच्यापुढे आम्ही काश्मिरी मुळीच झुकणार नाही,’’ असे म्हटले असते तर त्याही समस्तभारतीयांच्या सुरात सूर मिसळून बोलत आहेतअसे सगळ्या देशाच्या लक्षात आले असते! 
त्यातच जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य होण्यासाठी राज्य सरकारचेकेंद्र सरकारचे विविध प्रकारचे प्रयत्न चालू असतानाच तेथीलपरिस्थिती सतत चिघळत ठेवण्याचा प्रयत्न शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने चालू असतोहे आता काही गुपित राहिले नाहीतसेचकाश्मीर खोर्‍यातील सय्यद अली शाह गिलानीयासीन मलिकशब्बीर शाह यासारख्या फुटीरतावादी नेत्यांचे काश्मीर खोरे सतत धगधगते ठेवण्याचेउद्योग चालूच आहेतत्यात खंड पडलेला दिसत नाही.
काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले असले तरी त्या राज्यात खदखदअसंतोष असल्याचे दर्शविणार्‍याघटना घडत आहेत. ‘‘जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद लक्षात घेऊन राज्यात सशस्त्र सेना विशेषाधिकार कायदा अमलात ठेवणे आवश्यक आहे,’’ असेमेहबूबा मुफ्ती यांनी अलीकडेच म्हटले आहेमात्रमेहबूबा सरकारने लष्करातील अधिकारीजवानांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची जी कृती केली,त्याबद्दल देशभरातून नाराजी व्यक्त केली जात आहेजवानांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेतअशी मागणी करण्यात येत आहे.
काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे सांगितले जात असतानाच जम्मूमधील सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.काश्मीर खोर्‍याऐवजी दहशतवाद्यांनी आपला मोर्चा जम्मूकडे वळविलायाच तळावर याआधी २८ जून २००३ रोजी हल्ला झाला होतात्याआत्मघातकी हल्ल्यात १२ जवानांना वीरगती प्राप्त झाली होतीजम्मू भागात दहशतवाद्यांनी हल्ले करण्याच्या घटना २००२ पासून घडतच आहेत.२७ मार्च २००२ रोजी जम्मूतील प्रसिद्ध रघुनाथ मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ११ लोक मारले गेले आणि २० जण जखमी झाले होते१४ मे२००२ रोजी दहशतवाद्यांनी जम्मूच्या कालूचक भागात एका बसमधील सात प्रवाशांना ठार केले आणि नंतर नजीकच्या लष्करी छावणीत शिरून तीनजवानांसह ३१ लोकांची हत्या केली होती२९ नोव्हेंबर २०१६ रोजी नागरोटा लष्करी तळावर सहा अतिरेक्यांनी हल्ला करून एका मेजरसह सातजवानांची हत्या केली होतीआता जम्मू भागात पुन्हा हल्ला करून येथेही आम्ही सक्रिय असल्याचे दहशतवाद्यांनी दाखवून दिले आहेजम्मू-काश्मीरलाईट इन्फन्ट्रीची एक ब्रिगेड ज्या तळावर तैनात असतेत्या तळावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाया हल्ल्यात चार दहशतवादी मारले गेलेतरपाच जवानांना वीरमरण आले आणि एक नागरिकही मरण पावलाअफजल गुरू या दहशतवाद्यास फासावर लटकवून पाच वर्षे झालीते निमित्तसाधून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येतेया दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेत जे घडले त्याची दखल घेणे तितकेच गरजेचे आहे.विधानसभेतही पाकिस्तानचे समर्थक कसे आहेतयाचे दर्शन या निमित्ताने झालेसुंजवान लष्करी तळ अत्यंत सुरक्षित आणि एखाद्या गढीसारखाअसला तरी त्याच्या आसपास रोहिंग्या मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात वस्ती केली आहेया रोहिंग्या मुस्लिमांच्या वस्तीमुळे दहशतवाद्यांना लष्करीतळावर हल्ला करणे सोपे झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेभारतात आलेल्या सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लिमांपैकी जम्मूमध्ये सुमारेसात हजार रोहिंग्यांनी तळ ठोकला आहेखरे म्हणजेकोणत्याही लष्करी तळाच्या अगदी निकट नागरी वस्ती नसतेपण सुंजवान तळालगत हीवस्ती आहेतेथील काही नेत्यांना काश्मिरी पंडितांपेक्षा रोहिंग्या मुस्लिमांचा पुळका आला असल्याचे या निमित्ताने दिसून आलेकाश्मिरी हिंदूंना तेथूनहाकलून लावणार्‍यांना रोहिंग्या मुस्लीमएकदमजवळचे कसे काय वाटू लागलेजम्मू-काश्मीर विधानसभेत या दहशतवादी हल्ल्याची माहिती दिलीजात असताना अध्यक्ष कविंदर गुप्ता यांनीया तळाजवळ असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या उपस्थितीबाबत चिंता व्यक्त करताचनॅशनलकॉन्फरन्सचे आमदार मोहम्मद अकबर लोन हे एकदमभडकलेअध्यक्षाच्या वक्तव्याने समस्त मुस्लीमसमाजाचा अपमान झालाअसे त्यांना वाटले.त्यातून त्यांनी काय करावेतर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा होत असताना ’पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन आपला खरा चेहराजनतेला दाखवून दिलाविधानसभेत आणि बाहेरही या प्रकारचा निषेध व्यक्त करण्यात आलापण लोन यांना त्याबद्दल काहीही पश्चाताप झालानाहीत्यांच्या पक्षाने म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सनेलोन यांच्या विधानाशी आमचा पक्ष मुळीच सहमत नसल्याचे स्पष्ट केलेविधानसभेत घडलेलाहा प्रकार क्षुल्लक समजून त्याकडे दुर्लक्ष होता कामा नयेकाश्मीरमध्ये वारे कसे वाहत आहेतत्याची या लहानशा घटनेवरून कल्पना यावी.
जम्मू-काश्मीरमध्ये होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकीत बाधा आणून लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्याच्या हेतूने पाक पुरस्कृत दहशतवादीकाश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले आहेकाश्मीरमधील सध्याचे वातावरण एकंदरीत असेअशांत आहेआपल्याला दहशतवादापेक्षा स्थानिक पातळीवर लोकांमध्ये जी वाढती नाराजी आहेत्याची जास्त चिंता वाटत आहेअसे मुख्यमंत्रीमेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहेदुसरीकडेराज्यात सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहेएकीकडेदगडफेकीचे प्रकार कमी झाले असले तरी ते घडतच आहेतएक हात मागे बांधलेल्या अवस्थेत तेथे लष्कर आपली भूमिका बजावत आहेजम्मू-काश्मीरसह देशातील लष्करी तळाभोवतीची सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच ,४८७ कोटी रुपये मंजूर केले आहेतत्यामुळेया लष्करी तळांची सुरक्षा कडेकोट ठेवण्यास नक्कीच मदत होणार आहेजम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारप्रयत्न करीत असले तरी त्या राज्यातील फुटीरतावादी नेते अशा प्रयत्नांना चूड लावण्याचे उद्योग करीत आहेतभारतीय लष्कर तेथे सक्रिय आहे.सीमेपलीकडून केल्या जात असलेल्या कारवाया रोखण्यासाठी आणि उरी येथे सप्टेंबर २०१६ मध्ये लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याचा बदलाघेण्यासाठी २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून भारत काय करू शकतोहे पाकिस्तानला दाखवून देण्यातआले आहेअसे असले तरी सीमेपलीकडून आगळीक होणे चालूच आहेपाकच्या हल्ल्यात जवानांना वीरगती प्राप्त होत आहेपाकच्या कारवाया चालूअसूनही भारताने संयम बाळगला आहेहा संयम सुटणार नाहीयाची काळजी घेण्याइतके शहाणपण पाकिस्तानला येईलअशी अपेक्षा करता येईलका
 मेजर आदित्य कुमार यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याला सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्थगिती दिली. मेजर आदित्य कुमार यांच्यावर तुर्तास कोणतीही कारवाई करु नये असे आदेशही सुप्रीम कोर्टाने जम्मू- काश्मीर पोलिसांना दिले आहेत. गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर जम्मू-काश्मीर सरकारने दोन आठवड्यात त्यांची भूमिका मांडावी, असेही कोर्टाने म्हटले आहे.
जम्मू- काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात लष्कराने जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला होता. गानोवपुरा येथे २७ जानेवारी रोजी स्थानिक नागरिकांनी लष्कराच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. यानंतर लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले होते. या प्रकरणी जम्मू- काश्मीर पोलिसांनी लष्कराच्या १० गढवालया तुकडीतील अधिकारी व जवानांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मेजर आदित्य कुमार यांच्यासह १० जणांविरोधात हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. भाजपने लष्करी अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. तर मेजर आदित्य कुमार यांच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी त्यांचे वडिल लेफ्ट. कर्नल करमवीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. लष्कराची सेवा बजावताना अफ्स्पाकायदा लागू असलेल्या क्षेत्रात समाजकंटकांनी हल्ला केल्याने गोळीबार करावा लागला. त्यामुळे हा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा सिंग यांचे म्हणणे होते.

मेजर आदित्य कुमार यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने आदित्य कुमार यांना दिलासा देत या गुन्ह्याप्रकरणी संबंधितांविरोधात तुर्तास कोणतीही कारवाई करु नये, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच या गुन्ह्याला स्थगितीही दिली आहे. सुप्रीम कोर्टाने जम्मू- काश्मीर सरकारला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीवर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी देखील या प्रकरणात सहकार्य करावे, असे कोर्टाने सांगितले. केंद्र सरकारची या संदर्भातील भूमिका काय हे त्यांनी सांगावे, असे कोर्टाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment