Total Pageviews

Tuesday, 1 November 2016

भोपाळातील फटाके-भोपाळातील चकमककांडावर नेहमीप्रमाणे प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात असले तरी जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान कशावरून नसेल?-samna editorial

Wednesday, November 02nd, 2016 भोपाळातील फटाके दिवाळी असली तरी मुंबईत फटाक्यांना बंदी आहे. फटाके वाजत नसल्याने दिवाळीचा मामला थंड पडला. पण मध्य प्रदेशात भोपाळ येथे जोरदार फटाके वाजले व संपूर्ण देशात त्या फटाक्यांचा आवाज घुमला आहे. कदाचित भोपाळमधील फटाक्यांचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात. भोपाळच्या सेंट्रल जेलमधून ‘सिमी’चे आठ अतिरेकी पळून गेले. त्या सर्व अतिरेक्यांना आता गोळ्या घालून यमसदनी पाठविण्याचे शौर्य पोलिसांनी गाजवले आहे. भोपाळच्या रस्त्यांवर आठ अतिरेक्यांचे मुडदे छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत व आपल्याच देशातील काही लोक त्या मुडद्यांसाठी ‘मातम’ करीत आहेत. ‘पोलिसांनी काय हे क्रौर्य केले? पोलिसांनी काय हे अमानुष व निर्घृण काम केले?’ असे वक्तव्य करून दहशतवाद्यांचे मनोबल वाढविण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. अर्थात भोपाळात जे घडले त्यास दुसरी बाजू आहे. ‘सिमी’चे आठ अतिरेकी सेंट्रल जेलमधून पळून जातात हे सरकारसाठी लांच्छनास्पदच होते. राष्ट्रीय सुरक्षेचा हा खेळखंडोबाच आहे. त्याचे समर्थन कोणी करू नये. भारतीय जनता पक्षाचे राज्य येऊनही प्रभू श्रीरामांचा वनवास संपला नाही. अयोध्येत राममंदिर उभारणीबाबत राजकीय टोलवाटोलवी सुरू आहे. राम आजही वनवासातच असला तरी देशाची सुरक्षा व्यवस्था मात्र रामभरोसे आहे हे भोपाळच्या ‘तुरुंग’फोडीनंतर उघड झाले. दिवाळीच्या धामधुमीचा फायदा घेत तुरुंगातून पळून जाण्याचा कट ‘सिमी’च्या आठ भयंकर अतिरेक्यांनी रचला व त्यात ते यशस्वी झाले. रामशंकर या तुरुंग रक्षकाची गळा चिरून हत्या केली. चादरीचा दोरासारखा वापर करून भिंतीवरूनच उड्या मारून सिमीचे हे अतिरेकी पसार झाले, पण भोपाळपासून जवळच पोलिसांनी त्यांना घेरले व ठार केले. प्रश्‍न इतकाच आहे की, अतिरेकी चकमकीत मारले गेले म्हणून सरकारचे कौतुक करायचे, की तुरुंग फोडून अतिरेकी पळून गेले म्हणून सरकारला जोडे हाणायचे? हिंदी सिनेमात असे प्रसंग नेहमीच पाहायला मिळतात. तुरुंगाचे लोखंडी गज वाकवून किंवा उंच भिंतीवरून पलीकडे उडी मारून खलनायक फरारी होतो. पण हे असे फक्त हिंदी सिनेमांतच घडू शकेल. प्रत्यक्षात हे शक्य नाही, असे सांगून आपणच आपले समाधान करून घेत असतो. पण फक्त सिनेमातच नाही तर प्रत्यक्षात हे असले प्रकार घडू शकतात हे भोपाळच्या घटनेने दाखवून दिले. हे आठही दहशतवादी ‘सिमी’चे आहेत व त्यांचे कारनामे राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात इतकी मोकळीक कोणी मिळवून दिली? मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सुशासन अनेक वर्षांपासून आहे व मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी तर विजयाची हॅटट्रिकच केली आहे. त्यामुळे भोपाळ तुरुंगातून आठ दहशतवादी पळाले याचे खापर काँग्रेसवर फोडता येणार नाही व राहुल गांधी यांना राज्य कारभाराचे ज्ञान नाही अशी पुडी कुणाला सोडता येणार नाही. आठ दहशवाद्यांनी पलायन केल्यावर सर्वत्र ‘हाय अ‍ॅलर्ट’चा इशारा देण्यात आला होता. हा मोठाच विनोद आहे. हे आठ अतिरेकी पळून जाऊन काय करतील व त्यांचे मनसुबे काय असतील, हे सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून ते हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावतील व त्यासाठीच त्यांनी पलायन केले. हा मोठा कट असावा. बाहेरून त्यांना मदत झाली आहे व याबाबत माहिती मिळवण्यात आपली सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग कुचकामी ठरला आहे. भोपाळ तुरुंगात अनागोंदी होती व भिंती कमकुवत असल्याचे आता उघड झाले आहे हेसुद्धा गंभीरच आहे. भोपाळातील चकमककांडावर नेहमीप्रमाणे प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात असले तरी जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान कशावरून नसेल? इशरत जहां प्रकरणाची पुनरावृत्ती भोपाळच्या रस्त्यांवर झाली. चकमक खरी की खोटी, यावर तोंडाची डबडी वाजवणार्‍या निधर्मीवाद्यांना शेवटी इतकेच सांगायचे आहे की, भोपाळची चकमक खरी असेल तर पोलिसांना हजार सलाम आणि दिग्विजय सिंहांसारखे लोक म्हणतात त्याप्रमाणे, चमकम ‘बनावट’ असली तरी देशाविरुद्ध कट रचणारे व बॉम्ब बनवणारे लोक मारले गेले आहेत हे विसरू नये व पोलिसांना बदनाम करू नये! दहशतवाद्यांचे पोशिंदे! भोपाळ जेलमधून जेल तोडून जेलमधील पोलिस शिपाई रमाशंकर यांचा गळा कापून पळून गेलेल्या सिमीच्या आठ भयंकर दहशतवाद्यांची निर्लज्जपणे बाजू घेत, कॉंगे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह, एमआयएमचे सर्वेसर्वा असादुद्दीन ओवैसी आणि आम आदमी पार्टीचे अनेक नेते ओरडू लागले आहेत. अजून या घटनेची चौकशी होण्याआधीच, या भयंकर दहशतवाद्यांना निरपराध ठरविण्याचा चंग बांधल्यासारखी विधाने करत आहेत. जेल तोडून पळणारे अतिशय गंभीर गुन्हे करणारे आरोपी होते, दहशतवादी होते, हे न पाहता त्यांना चकमकीत पोलिसांनी ठार का मारले? असा प्रश्‍न विचारला जात आहे. जेल तोडून पळून जाताना या बदमाश दहशतवाद्यांनी जेलमधील पोलिस शिपाई रमाशंकर यांचा गळा कापून त्यांना ठार मारले, त्या रमाशंकर यांच्याबद्दल सहानुभूतीचा एकही शब्द तोंडातून न काढता, जेलमधून या आठ जणांना मुद्दाम सोडण्यात आले की काय? जेल तोडून पळणारे नेहमी मुस्लिमच का असतात? असे कुतर्क लढवीत, निरर्थक आणि लांगूलचालनाच्या राजकारणात बुडालेले प्रश्‍न हे नेते विचारू लागले आहेत. यांना दहशतवाद्यांचे पोशिंदेच म्हणावे लागेल! दहशतवादी मारले गेल्याबद्दल यांना दुःख होते. पोलिस शिपाई मारल्या गेल्याचे यांना दुःख नाही. अर्थात, ज्यांची सडकी मनोवृत्ती भारतीय सैन्यांनी गुलाम काश्मीरमधील दहशतवाद्यांवर ‘सर्जिकल अटॅक’ करून त्यांना ठार मारले, तर सैन्याला पुरावे मागण्याइतकी सडली असेल, तर ते दहशतवाद्यांची बाजू घेणे साहजिकच आहे. २००८ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत अनेक निरपराध लोक मारले गेले होते. त्यामध्ये या भोपाळ जेल फोडणार्‍या आठ दहशतवाद्यांचा हात होता. खांडवा येथे जातीय दंगली घडवून अनेकांचे प्राण आणि मालमत्तेचे नुकसान करण्यात कारणीभूत असल्याचा यांच्यावर आरोप होता. अमजद रमजान खान, शेख महबूब, जाकीर हुसेन आणि मोहम्मद सालिक यांच्यावर उत्तरप्रदेशात बिजनौर येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा आरोप होता. शेख महबूब या आधी खांडवा जेल तोडून पळून गेलेला कैदी होता. बिजनौरमधील स्फोटाचा हा आरोपी होता. जाकिर हुसैन याने शेख महबूबसोबत एका पोलिस शिपायाचा खून केल्याचा आरोप होता. अमजद उर्फ पप्पी उर्फ दाऊद हा एक डाकू होता. त्याने भोपाळच्या एका फायनान्स कंपनीवर डाका घातला होता. खांडवा जेल फोडून पळणार्‍यात हा एक पळपुटा होता. मोहंमद सालिक उर्फ सल्लू हा बिजनौर स्फोटाचा कट रचणारा आरोपी होता. अखिल खिलजी याच्यावर अनेक केसेस होत्या. खांडवा येथे चार वेळा जातीय दंगली भडकविल्याचा याच्यावर आरोप होता. हा सिमीचा कार्यकर्ता होता. माजिद नागोरी याला स्फोटके घेऊन जाताना पकडले होते. त्यानंतर एकदा पळून जाऊन हा पुन्हा स्वतः पोलिसांना शरण आलेला होता. खालिद अहमद हा सोलापूरचा राहणारा एका मोठ्या महत्त्वाच्या जागेवर हल्ला करण्याची योजना करत होता. मुजीब शेख हा अहमदाबादचा राहणारा आणि अहमदाबादच्या स्फोटांच्या मालिकेचा आरोपी होता. अशा या एकापेक्षा एक भयंकर आरोपींनी जेलमधील पोलिसावर हल्ला करून त्याचा गळा कापून ठार मारून जेल तोडले. ते बाहेर पळाले. पोलिसांना काही तासांनंतर लगेच दहा किलोमीटर अंतरावरील खेजडी गावातील लोकांनी माहिती दिली की, हे पळालेले दहशतवादी त्यांच्या गावात आले आहेत. पोलिसांनी ताबडतोब यांना घेरले. पोलिसांबरोबरच्या चकमकीत हे आठही दहशतवादी मारले गेले. त्यानंतर कॉंग्रेस, एमआयएम, आम आदमी पार्टी या फोबियाग्रस्त लोकांची कावकाव सुरू झाली आहे. यांचे म्हणणे आहे की, जेलमधून पळून जाताना या कैद्यांकडे शस्त्रे नव्हती असे पोलिस सांगतात, तर मग चकमक कशी काय झाली? वास्तविक, हे कैदी जेलमधून पळाल्यानंतर आठ तासांनी ही चकमक झाली. या दरम्यान हे दहशतवादी जवळपासच्या गावात परिचित काही लोकांकडे थांबले होते, अशी गावकर्‍यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. या काळात ते कपडे बदलणे, शस्त्रे जमा करणे सहजशक्य आहे. मात्र, कसलाही आधार नसताना दिग्विजयसिंह, ओवैसी आणि आम आदमी पार्टीचे लोक ओरड करत आहेत. केवळ मारलेे गेलेले मुस्लिम आहेत म्हणून गठ्‌ठा मतांचे राजकारण करण्याचा भयंकर खतरनाक खेळ हे नेते खेळत आहेत. हे इतरांना जातीयवादी म्हणून सतत शिव्या देतात, मग आता हे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची जात काढून छाती बडवण्याचा उपद्व्याप का करत आहेत? जे जेल तोडून पळून जातात ते कायद्याचे भयंकर गुन्हेगार असतात. विशेषतः निरपराध नागरिकांच्या रक्ताला चटावलेले तर अधिकच भयंकर गुन्हेगार असतात. ते हिंदू आहेत की मुसलमान, हे पाहून त्यांच्याशी व्यवहार करायचा नसतो. ते गुन्हेगार आहेत, जेल तोडून पळालेले आहेत, पोलिस शिपायाचा खून करून पळालेले आहेत, अशा माथेफिरू खुनी गुन्हेगारांना दिसताक्षणी गोळी घातलीच पाहिजे. त्यांनी प्रत्युत्तर दिले की नाही, त्यांनी पोलिसांवर गोळी चालविली की नाही, असले नतद्रष्ट प्रश्‍न उपस्थित करून जे जातीय खेळ राजकारणी खेळत आहेत, त्यांच्या डोक्यात फक्त गठ्‌ठा मतांची गणिते आणि तोंडातून लाचारीची लाळ गळते आहे. दिग्विजयसिंह म्हणतात की, जेल तोडून पळणारे फक्त मुसलमानच कसे असतात? वास्तविक, या देशात दहशतवादी कारवाया करणारे बहुतांश मुस्लिमच असतात. तेच पकडले जातात. तेच पळण्याचा प्रयत्न करतात. याचे कारण दिग्विजयसिंहसारखे मल्टीकम्युनल राजकारणी अशा प्रकारचा दहशतवाद करणार्‍यांनाच खतपाणी घालतात! ‘सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत, मात्र सगळे दहशतवादी मुसलमानच असतात!’ हे समीकरण खोटे करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासारख्यांवर दहशतवादी आरोप लावण्याचा जो प्रयत्न मल्टीकम्युनल सरकारांनी केला, तो अजून यशस्वी झालेला नाही. त्यांच्यावर अजून आरोपपत्रच दाखल करता आलेले नाही. कसलेही पुरावे त्यांच्याविरोधात एटीएसला अजून मिळालेले नाहीत. मात्र, या आरोपींना खोट्या राजकीय हेतूने केलेल्या आरोपाखाली वर्षानुवर्षे तुरुंगात सडविण्याचे पाप या जातीय राजकारणाने केले आहे. जेवढे हे सिमीचे दहशतवादी धोकादायक आणि दोषी आहेत त्यापेक्षाही जास्त त्यांचे हे राजकारणातील पोशिंदे धोकादायक आणि खतरनाक आहेत. यांच्या गुन्ह्याला ना मर्यादा ना लाज! हे देशाच्या सैन्यावर संशय घेतात, हे पोलिसांवर संशय घेतात, एवढेच नाही, तर हे पाकिस्तानी मीडिया आणि नापाक सैन्यावर विश्‍वास ठेवतात, हे दहशतवाद्यांचा कैवार घेतात. यांना जनतेने संधी मिळताच अद्दल घडविली पाहिजे

No comments:

Post a Comment