नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकिंग क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसत आहेत. लोक मोठ्याप्रमाणात बॅंकांमध्ये पैसा जमा करत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात मागील 15 दिवसांत तब्बल 21 हजार कोटी रूपये जमा झाले आहेत. जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यात पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्य आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे.
दुसरीकडे, बँकेत जमा झालेल्या रकमेवर सरकार आणि प्राप्तीकर विभाग (इनकम टॅक्स डिपार्टमेंंट) नजर ठेवून आहे. सरकारने निर्धारित करून दिलेल्या मर्यादेत तुम्ही बँकेत रुपये जमा केले, म्हणजे तुम्हाला इनकम टॅक्सची नोटिस येणार नाही, असे समजू नका. इनकम टॅक्स डिपार्टमेंट बॅंकेत झालेल्या प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला नोटिस पाठवू शकते.
आज आम्ही आपल्यासोबत 6 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. हे मुद्देे तुमच्याशी संंबंंधित असतील तर तुम्हाला इनकम टॅक्सची नोटिस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जाणून घ्या... काय आहेत सरकारचे नियम?
देशातील सर्व बँकांत जमा होणार्या रकमेचा तपाशील सरकारने मागितला आहे. बॅंकांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत बचत खात्यात 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आणि चालू खातात 12.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करणार्यां वर सरकार आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंट नजर ठेवून आहे. दिवसभरात बॅंकेत 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करणार्यांकना पॅन कार्डची माहिती देणे बंधनकारक आहे. याचा अर्थ असा नाही की, पॅन कार्डची माहिती घेतली म्हणून इनकम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येकांची चौकशी करेल.
आयटीआर न भरता बॅंकेत जमा केली मोठी रक्कम...
तुम्ही आयटीआर न भरता बँकेत मोठी रक्कम जमा केली असेल तर इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला नोटिस पाठवू शकते. तुमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत असतील तर तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही.
बॅंकेत जमा झालेली रक्कम आयटीआरनुसार नसल्यास..
तुम्ही आयटीआर भरला आहे. पण, बॅंकेत जमा केलेली रक्कम आयटीआरपेक्षा जास्त असेल तर इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमची चौकशी करू शकते.
उदा. तुम्ही आयटीआरमध्ये 5 लाखाहून कमी उत्पन्न दाखवले असेल आणि दोन महिन्यांत संपूर्ण वर्षभरातील रक्कम बॅंकेत जमा केली असेल तर तुमची चौकशी होण्याची शक्यता जास्त आहे. पण तुमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत असतील तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही.
हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन
ब्लॅकमनी व्हाइट करण्यासाठी अनेकांनी पैसा खर्च करण्याचे अनेक उपाय शोधले आहेत. परिणाम गेल्या 15 दिवसांत हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्समध्ये वाढ झाली आहे. सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर तुम्ही हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन केले असेल तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता जास्त आहे. विवाहासाठी किंवा ठोस कारणासाठी तुम्ही ट्रान्झॅक्शन केले असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
मित्र किंवा नातेवाईकांची मदत...
ब्लॅकमनी व्हाईट करण्यासाठी अनेक जण मित्र किंवा नातेवाईकांची मदत घेताना दिसत आहे. तुम्ही या कामात मित्र किंवा नातेवाईकांची मदत केली असेल तर तुम्हा चौकशीच्या फेर्याद अडकू शकतात
जनधन खात्यात 50 हजाराहून जास्त रक्कम जमा केल्यास...
पंतप्रधान जनधन खाते गरीबांसाठी सुरु करण्यात आले आहेत. नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेकांनी आपल्या जनधन खात्यावर 50 हजारांहून जास्त रक्कम जमा केल्याचे समोर आले आहे. सरकारने याबाबत बॅंकांना माहिती मागितली आहे
मल्टीपल ट्रान्झॅक्शन
तुम्ही काही रुपये मित्र किंवा नातेवाईकांच्या खात्यावर जमा केले आहे. मोठी खरेदी केली आहे. तसेच स्वत:च्या खात्यावर काही रक्कम ठेवली आहे. तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. पण, संदिग्ध ट्रान्झॅक्शन आढळून आल्यास विक्रेता किंवा रक्कम जमा करणार्याा व्यक्तीच्या उत्पन्नाची माहिती मागवली जाऊ शकते.संपूर्ण वर्षात झालेल्या ट्रान्झॅक्शनवर नजर...
इनकम टॅक्ट डिपार्टमेंट तुमच्याकडे संपूर्ण वर्षात झालेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती मागू शकते. नोटबंदीनंतर तुमच्या खात्यावर जास्त रकमेचे ट्रान्झॅक्शन झाले असल्यास तुम्हा नोटीस आलीच समजा.
नोटिसचा अर्थ 'कारवाई' नाही...
तुम्हाला इनकम टॅक्सची नोटिस आली तर एकदम घाबरुन जाऊ नका. नोटिस आली म्हणजे तुमच्यावर कारवाई होईल, असे समजू नका. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने विचारलेल्या प्रश्नांची अजूक उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
No comments:
Post a Comment