Total Pageviews

Saturday, 12 November 2016

काळा पैसाधारकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा; प्रामाणिक करदात्यांना अभय,विदेशी गुंतवणुकीत वाढ,बंद केलेल्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटांचा बेकायदा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारी यंत्रणा मागेपुढे पाहणार नाही.मटक्याढलाही बसला नोटांचा फटका -राज्याच्या तिजोरीत 24 तासांमध्ये 1 अब्ज कर जमा-काही भारतीयांच्या मेहनतीवर मंगळवारने पाणी सोडले आहे. भारताच्या इतिहासात मंगळवारचा दिवस `काळा दिवस’ म्हणून पाळला जाईल. टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांचं सोडा पटवारी, ट्रफिक हवालदार, कचेरीतल्या शिपायालासुध्दा या दिवसाने सोडलं नाही. एवढंच नव्हे तर, नवर्याच्या खिशातून गुपचूप पाचशे-हजाराची नोट काढणार्या बायकांच्या मेहनतीवरसुध्दा मंगळवारची वक्रदृष्टी पडली… बरं एवढं सगळं घडलं ते फक्त एका माणसामुळे… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे


देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय अचानक जाहीर करून देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबरनंतर पुन्हा अशाच एका निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. त्यांचा इशारा अर्थातच काळा पैसाधारकांनाच होता. प्रामाणिक करदात्यांनी मात्र घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. येथील भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी काळा पैसाधारकांना आणखी एका कारवाईला सामोरे जाण्याचे संकेत दिले. ते म्हणाले की, ‘पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या निर्णयाचे सामान्यांकडून स्वागत होत आहे. सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांची त्याबाबत तक्रार नाही. अशा लोकांना माझा मनपूर्वक सलाम. मात्र, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणखी अशीच काही योजना अचानक जाहीर केली जाणार नाही, असे नाही. ३० डिसेंबरनंतर पुन्हा अशीच एखादी कारवाई होऊ शकते. जे मला चांगल्या पद्धतीने ओळखतात त्यांना माझ्या विधानाचा अर्थ नीट समजेल. यापुढे काळा पैसाधारकांची खैर नाही. त्यामुळे आताच वेळ आहे, नाही तर पैसे गंगार्पण करावे लागतील. काळा पैसा बाळगून असणारे आता चिंतीत असतील. मात्र, प्रामाणिक करदात्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांना कोणताही त्रास होणार नाही’. गेल्या दोन वर्षांत सरकारने सव्वा लाख कोटी रुपये काळा पैसा उघडकीस आणला असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले.. • काळ्या पैशाचे एक प्रकरण समोर आले तरी संबंधितांचे सर्व व्यवहार, अगदी स्वातंत्र्यापासूनचेही, काटेकोरपणे तपासले जातील • या कारवाईसाठी कितीही मनुष्यबळ लागले तरी त्याची तमा बाळगणार नाही • कायदा सर्वासाठी समान हवा • मोदींकडील एक हजार रुपयांची नोटही वैध नाही, याचाही लोकांना आनंद आहे स्वच्छता अभियान नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय म्हणजे एक प्रकारचे स्वच्छता अभियानच असून यापुढेही ते असेच सुरू राहील, असे मोदी म्हणाले. देशात अनेकांना या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागत असूनही या निर्णयामागे ते ठामपणे उभे आहेत. जपानमध्ये झालेल्या भूकंपावेळी जपानी जनता सरकारच्या मागे खंबीरपणे उभी होती, तसेच हे असल्याचे मोदी म्हणाले. विदेशी गुंतवणुकीत वाढ भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे मोदींनी यावेळी निदर्शनास आणून दिले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यासारख्या वित्तसंस्थांनी भारताला ‘चमकता तारा’, असे म्हटले असल्याचे मोदी म्हणाले. इतिहासात प्रथमच मोठय़ा प्रमाणावर भारतात थेट विदेशी गुंतवणूक होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. एटीएम सुरळीत होण्यास दोन-तीन आठवडे लागणार • जुन्या नोटा बदलताना आणि त्या बँकेत जमा करताना नागरिकांना कसरत करावी लागत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संयम बाळगण्याचे आवाहन शनिवारी केले. नव्या नोटांच्या बदललेल्या आकारमानारूप देशातील दोन लाख एटीएम यंत्रांच्या रचनेतही बदल करावा लागणार असल्याने सर्व एटीएम व्यवहार सुरळीत होण्यासाठी दोन-तीन आठवडे लागतील, असे जेटली यांनी स्पष्ट केले. • चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बदलण्यासाठी देशभरात चलनकल्लोळ सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर जेटली यांनी पत्रकार परिषद घेतली. सुमारे १४ लाख कोटी मूल्य असलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी पुरेशा नोटा रिझव्‍‌र्ह बँक आणि इतर बँकांत आहेत. गोपनीयतेमुळे जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाआधीच एटीएमच्या रचनेत बदल करणे शक्य नव्हते, असे अर्थमंत्री म्हणाले. • सुरुवातीचे काही दिवस नागरिकांची गैरसोय होईल. त्याची आम्हाला खंत आहे. मात्र, ही गैरसोय अल्पकालीन असून अर्थव्यवस्थेचे दीर्घकालीन हित साधण्यासाठी जुन्या नोटा रद्द करून ‘चलनशुद्धी’ची मोहीम राबविण्यात येत असल्याचे जेटली यांनी सांगितले. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेताना यात अडचणी येणार हे माहिती होते. पण ही बाब गुप्त ठेवणेही तितकेच महत्त्वाचे होते व अचानक जाहीर करणेच योग्य होते. मात्र, लोक मला ‘आशीर्वाद’ देतील असे वाटले नव्हते. जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या बॅंक खात्यांत असलेल्या शून्य शिल्लकीत अचानक मोठी वाढ होऊ लागली आहे. याची सरकारने दखल घेतली असून, यावर करडी नजर सरकारी यंत्रणांनी ठेवली आहे. पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर फक्त दोन दिवसांत बॅंकिंग व्यवस्थेत सुमारे दोन लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ‘पैसा बदलून देणाऱ्या दलालांवर सरकारी यंत्रणांचे लक्ष आहे. बेहिशेबी संपत्ती घेऊन हे दलाल सोने आणि जडजवाहिरांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. यावर महसूल विभाग आणि सक्त वसुली संचालनालय नजर ठेवून आहे. जन धन योजनेअंतर्गत देशात बॅंक खाती नसलेल्या नागरिकांची बॅंकांमध्ये खाती उघडण्यात आली. ही खाती बहुतांश निष्क्रिय होती. यातील शिल्लक ही शून्य होती. आता या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ लागला आहे. अचानक जमा होऊ लागलेल्या मोठ्या रकमेची सरकारने दखल घेतली आहे. सरकारी यंत्रणा यावरल लक्ष ठेवून आहे.‘‘ बंद केलेल्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटांचा बेकायदा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारी यंत्रणा मागेपुढे पाहणार नाही. - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री मटक्याढलाही बसला नोटांचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाने काळा पैसा बाळगणाऱ्यांना जशी धडकी भरली आहे, त्याच प्रमाणे काळ्या धंद्यांनाही त्याचा फटका बसला आहे. पुणे शहर व राज्यात दररोज कोट्यवधींची उलाढाल असणारा मटका नोटा नसल्याने आजपासून तब्बल दहा दिवस बंद ठेवण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी मटक्यांचे अड्डे आहेत, याशिवाय अनेक प्रकारे आणि विविध नावांनी असणारे मटके ऑनलाइन खेळले जातात. सध्या या "ऑनलाइन‘ मटक्यांेची चलती असून, त्यावर कोट्यवधींची उलाढाल होत असते. गेल्या तीन दिवसांपासून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने मटक्याऑचा हा व्यवसायही धोक्या्त आला आहे. कल्याण ओपन, कल्याण क्लोदज, मुंबई ओपन, मुंबई क्लोहज हे सर्वाधिक उलाढाल असणारे मटक्या‍चे प्रकार आहेत. यात पैसे लावणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे सर्व मटके आजपासून बंद करण्यात आले आहेत. ऑनलाइन मटक्याशच्या विविध वेबसाइट आहेत. आज या साइटवर मटका 20 नोव्हेंबरपर्यंत बंद असल्याच्या सूचना येत आहेत. मटका बाजारात या संदर्भात चौकशी केली असता, एकट्या पुण्यात विविध प्रकारच्या मटका खेळात दररोज सुमारे तीनशे ते चारशे कोटींची उलाढाल होते. संपूर्ण राज्यातील हा आकडा काही अब्ज रुपयांमध्ये आहे. मटक्याजच्या या विळख्यात मध्यमवर्गीय, नोकरदार, छोटे व्यावसायिक अडकले आहेत. एक रुपयाला 9 रुपयांपासून 135 आणि 250 रुपये मिळतात. सट्टा, सिंगल पत्ता, संगम असे त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. दहा आकड्यात एकच आकडा लागत असल्याने व्हाइट मनी "ब्लॅक‘ मध्ये जातो व तो पुन्हा बाजारात येतो अशीही चर्चा आहे. सध्या नोटांचा तुटवडा असल्याने प्रथमच दहा दिवस मटका बंद ठेवण्यात आला आहे. वेबसाइटवरही मेन बाजार, टाइम बाजार, मेन बाजार असे मटके 20 नोव्हेंबरपर्यंत बंद असल्याची सूचना येत आहे. पोलिसांच्या दप्तरी मात्र मटका बंद असल्याचे सांगण्यात येते. राज्याच्या तिजोरीत 24 तासांमध्ये 1 अब्ज कर जमा NOVEMBER 11, 2016 9:06 PM0 COMMENTSVIEWS: palika_money 11 नोव्हेंबर : नोटबंदीचा सामान्यांना त्रास होत असला तरी, राज्याच्या तिजोरीला याचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय. 500 आणि 1000 च्या नोटांचा स्विकार करत असल्यानं राज्यात 24 तासांमध्ये 100 कोटींचा कर नागरिकांनी भरलाय. त्यात सर्वाधिक करभरणा हा पुणे महापालिकेत झालाय. पुण्यातून तब्बल 21 कोटी 85 लाखांचा करभरणा झालाय तर नाशिक पालिकेत साडे तीन कोटींच्यावर नागरिकांना करभरलाय. तर नागपूरमध्ये तीन कोटी सात लाख आणि ठाणे पालिकेत सहा कोटी 15 लाखांचा करभरणा झाला आहे 8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून एक हजार आणि पाचशे रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. यामुळे नागरीकांची अडचण होवू नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांकडून या जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली. आज दुपारी 4.00 वाजेपर्यंत विविध करांपोटी 82 कोटी 13 लाख 59 हजार रुपयांचा भरणा केला आहे. मध्यरात्रीपर्यंत विविध करांपोटी भरण्याची रक्कम 120 कोटी पेक्षा अधिक होईल असा विश्वास सचिव श्रीमती म्हैसकर-पाटणकर यांनी व्यक्त केलाय. काळा मंगळवार! अशुभ मंगळवार!!काही भारतीयांच्या मेहनतीवर मंगळवारने पाणी सोडले आहे. भारताच्या इतिहासात मंगळवारचा दिवस `काळा दिवस’ म्हणून पाळला जाईल. टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांचं सोडा पटवारी, ट्रफिक हवालदार, कचेरीतल्या शिपायालासुध्दा या दिवसाने सोडलं नाही. एवढंच नव्हे तर, नवर्याच्या खिशातून गुपचूप पाचशे-हजाराची नोट काढणार्या बायकांच्या मेहनतीवरसुध्दा मंगळवारची वक्रदृष्टी पडली… बरं एवढं सगळं घडलं ते फक्त एका माणसामुळे… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे

No comments:

Post a Comment