Total Pageviews

Tuesday, 1 November 2016

टाईम्स नाऊचे अर्णव गोस्वामी यांचा राजीनामा? नेशन वॉन्टस् टू नो

November 1, 2016028 , १ नोव्हेंबर ख्यातनाम पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्णव गोस्वामी हे त्यांच्या द न्यूजअवर या लोकप्रिय कार्यक्रमात दिसत नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपादकीय बैठकीत अर्णव गोस्वामी यांनी आपला राजीनामा जाहीर केला. आपण स्वत: काहीतरी नवे सुरू करणार असल्याचेही त्यांनी आपल्या सहकार्‍यांना सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री ९ वाजता होणार्‍या द न्यूजअवर शोचे सूत्रसंचालन अर्णव गोस्वामी करणार असल्याचे टाईम्स नाऊ वाहिनीवर सांगण्यात येत आहे. अर्णव गोस्वामी इज बॅक, असे वाहिनीवर सातत्याने दाखवण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्णव गोस्वामी टाईम्स नाऊमध्ये संपादकपदावर कार्यरत आहेत. या वाहिनीवर द न्यूजअवर या चर्चेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायम अर्णव गोस्वामी हेच करतात. अतिशय आक्रमक सादरीकरणामुळे आणि कार्यक्रमात सहभागी मंडळींवर केलेल्या जबरदस्त शाब्दिक हल्ल्यांमुळे ते कायम चर्चेत असतात. एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वादग्रस्त व वाचाळ आमदार जितेंद्र आव्हाड यांची अर्णव यांनी बोलतीच बंद करून टाकली होती. काही दिवसांपूर्वीच अर्णव गोस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही विशेष मुलाखत घेतली होती. ती खूपच गाजली होती. टीव्हीवर थेट बातम्या देण्यास खाजगी वाहिन्यांना परवानगी देण्यात आल्यानंतर पहिल्या फळीत जे चेहरे पुढे आले त्यात अर्णव गोस्वामी यांचाही समावेश आहे. एनडीटीव्ही या वाहिनीवर पहिल्या फळीतील पत्रकारांच्या चमूतही त्यांचा समावेश होता. टाईम्स समूहाने २४ तास चालणारी वृत्तवाहिनी काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्णव गोस्वामी या वाहिनीमध्ये संपादक म्हणून दाखल झाले. जाणून घ्या अर्णव गोस्वामींनी ‘टाइम्स नाऊ’चा का दिला राजीनामा गेल्या काही दिवसांपासून अर्णव 'द न्यूज अवर' या कार्यक्रमात देखील दिसून आले नव्हते. टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी मंगळवारी (दि. १) आपल्या पदाचा राजीनामा दिला. अर्णव गोस्वामींच्या राजीनामा वृत्ताची सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. त्यांच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत. ते स्वत: एक वृत्त वाहिनी सुरू करतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. परंतु अर्णव यांनी राजीनामा का दिला याचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. संपादकीय बैठकीत आपला निर्णय जाहीर करताना त्यांनी टाइम्स नाऊ मध्ये काम करून कंटाळा आला असून मला काहीतरी नवीन करायची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. खासदार आणि बडे व्यापारी असलेले राजीव चंद्रशेखर यांच्याबरोबर अर्णव हे एक माध्यमसमूह सुरू करणार असल्याची चर्चा आहे. परंतु याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. inuth.com वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार अर्णव नव्या प्रकल्पात भागीदार बनतील. टाइम्स समूहात अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. अर्णव हे कधीच घाई गडबडीत कोणताच निर्णय घेत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून ते असा निर्णय घेण्याची तयारी करत होते. टाइम्स नाऊबरोबर काम करण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे आपण कायम एक कर्मचारीच राहतो, असे वृत्त inauth ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अर्णव यांच्या द न्यूज अवर या कार्यक्रमामुळे टाइम्स नाऊच्या टीआरपीत प्रचंड वाढ झाली होती. ही वाहिनी २००५ मध्ये सुरू झाली होती. हा कार्यक्रम पहिल्यांदा २००७ मध्ये प्रथम क्रमांकाचा प्राइम टाइम कार्यक्रम ठरला होता. तेव्हापासून हा कार्यक्रम नेहमी चर्चेत आणि वादात राहिला आहे. या कार्यक्रमात अर्णव पाहुण्यांना बोलू देत नाहीत, अशी टीकाही त्यांच्यावर नेहमी होत असते. काही दिवसांपूर्वीच मीडिया जगतातील मोठे प्रस्थ असलेल्या विक्रम चंदा यांनीही एनडीटीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. इलेक्ट्रॉनिक मीडियात क्षेत्रातील दोन दिग्गजांनी एकाच आठवड्यात काही दिवसांच्या अंतरावर राजीनामा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त मंगळवारी विविध वेबसाईटवर झळकले आहे. गोस्वामी गेले दोन दिवस न्यूजअवर या प्राईम टाईम शोमध्ये दिसलेले नाहीत; तथापि वाहिनीवर गोस्वामींचा समावेश असलेल्या जाहिराती अद्यापी आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस‘मधील वृत्तानुसार, टाईम्स नाऊच्या संपादकीय सहकाऱयांच्या बैठकीत गोस्वामी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. स्वतःचे स्वतंत्र काहीतरी सुरू करायचे असल्याचे कारण त्यांनी बैठकीत दिले, असे सांगण्यात येते. गोस्वामी यांना नुकतीच वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था सरकारने पुरवली आहे. इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या माहितीनुसार गोस्वामी यांना पाकिस्तान-स्थित अतिरेकी संघटनांकडून धोका आहे. गोस्वामी यांच्या सुरक्षेसाठी 24 तास तब्बल वीस सुरक्षा रक्षकांची नियुक्ती सरकारने केली आहे. द टेलिग्राफ दैनिकातून कोलकता येथे गोस्वामी यांनी पत्रकारिता सुरू केली. 1995 नंतर ते एनडीटीव्हीमध्ये दाखल झाले. विक्रम चंद्रा आणि राजदीप सरदेसाई यांच्याबरोबरच गोस्वामी यांच्या कामाचा ठसा एनडीटीव्हीच्या सुरुवातीच्या दिवसांत होता. त्यानंतर 2006 मध्ये ते टाईम्स नाऊमध्ये एडिटर इन चीफ म्हणून रुजू झाले. टेलिव्हिजन पत्रकारितेत नवी, आक्रमक आणि काहीशी आक्रस्ताळी वाटणारी शैली गोस्वामी यांनी आणली. स्वतःच्या शोमध्ये स्वतःचीच मते दामटण्याबद्दल गोस्वामी यांच्यावर सातत्याने टीकाही झाली. मात्र, टीकाकार आणि प्रशंसा करणारे या दोन्ही घटकांमध्ये गोस्वामी लोकप्रिय आहेत. द क्विंट डॉट कॉम या वेबसाईटवरील माहितीनुसार, राजीनाम्याची घोषणा करतानाच गोस्वामी यांनी तब्बल तासभर भाषण केले. ‘गेम हॅज जस्ट बिगन‘ हे वाक्य त्यांनी बैठकीत वारंवार उच्चारले. मुंबईतील मुख्य स्टुडिओतून गोस्वामी यांनी घेतलेल्या बैठकीत देशभरातील त्यांच्या वाहिनीचे पत्रकार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment