Nagrota army camp attack:
नागरोटा येथे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी दाखविलेल्या धाडसामुळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे नागरोटा लष्करी तळावर हल्ला केला होता. याठिकाणी लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गणवेशात सीमारेषा पार करुन लष्कर तुकडीत प्रवेश मिळवला होता. लष्करी मुख्यालयापासून फक्त तीन किमी अंतरावर दहशतवादी होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना ओलीस ठेवून भारतीय सैन्याला वेठीस धरण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. मात्र, दोन जवानांच्या पत्नींनी प्रसंगावधान राखून हा डाव उधळला. दोन्ही जवान रात्रपाळीवर असल्याने त्यांच्या पत्नी नवजात बालकासोबत घरी एकट्या होत्या. यावेळी दहशतवादी लष्करी अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या एका इमारतीमध्ये शिरले. ही गोष्ट या जवानांच्या पत्नींच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी अजिबात न घाबरता शौर्याचं अनुकरणीय प्रदर्शन दाखवलं आहे. दहशतवाद्यांना हेडक्वार्टर्समध्ये प्रवेश करता येऊ नये यासाठी त्यांनी घरातील सामान आणून गेट बंद करुन टाकला. यामुळे दहशतवादी घुसू शकले नाहीत आणि त्यांचा कट फसला. जर महिलांनी वेळीच हे धाडस दाखवले नसते तर कदाचित दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवले असते. ज्यामुळे लष्कर आणि त्यांच्या कुटुबाचं मोठे नुकसान करण्यात यशस्वी झाले असते, अशी माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने दिली.
दहशतवादी लष्कर जवान आणि त्यांचं कुटुंब राहत असलेल्या दोन इमारतींमध्ये घुसले होते. त्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न होणार होता. परिस्थितीची तात्काळ माहिती घेण्यात आली आणि बचावकार्याला सुरुवात करत सर्वांना वाचवण्यात आले, ज्यामध्ये १२ जवान, दोन महिला आणि त्यांची नवजात बालकं होती, अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. दहशतवादी इमारतीत शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, या बचावकार्यादरम्यान भारतीय सैन्यातील एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले.
नागरोटा येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील नांदेड येथील जवान संभाजी यशवंत कदम व पंढरपूर येथील कुणाल मुन्ना गोसावी हे शहीद झाले आहेत. कदम त्यांच्या मागे आई, वडील, दोन विवाहीत बहिणी, पत्नी व तीन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. कदम यांचे लोहा तालुक्यातील जानापुरी हे गाव. पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मुन्ना गोसावी यांचे कुणाल हे वीरसुपुत्र होत. दोन जवान हुतात्मा झाल्याची माहिती कळताच नांदेड व पंढरपूरसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी सेवा बजावत असलेले कदम व गोसावी यांच्यासह अन्य जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारादरम्यान कदम व गोसावी धारातीर्थी पडले
जम्मू-काश्मीरच्या नगरोटा आर्मी कँम्पवर झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील मेजर आणि जवानासह ७ जवान शहीद झाले. या हल्ल्याबाबतचा अलर्ट आधीच देण्यात आला होता. साधारण १० दिवसआधी एका रिपोर्टमध्ये अलर्टची माहिती देण्यात आली होती. त्यानंतरही लष्करी तळावर एवढी सुरक्षा वाढविण्यात आली नाही की हल्ला रोखता येईल. आता अशीही माहिती समोर येत आहे की दहशतवाद्यांनी ऑफिसर्स मेस आणि लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवाद्यांना सामान्य नागरिकांना ओलिस ठेवण्याचा कट आखला होता. दोन लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी दाखवलेल्या शौर्यामुळे तो उधळला गेला.
जवानांच्या कुटुंबीयांना ओलिस ठेवण्याचा होता कट, महिलांनी दाखवले शौर्य
- दहशतवादी पोलिसांच्या वेशात आले होते. त्यांनी लष्करी तळात घुसून हेडक्वार्टरपर्यंत जाण्याचा कट आखला होता.
- हेडकॉर्टरमध्ये घुसून जवानांच्या कुटुंबीयांना ओलिस ठेवण्याचा त्यांचा कट होता. मात्र दोन जवानांच्या पत्नींनी तो उधळून लावला.
- जवान नाइट ड्यूटीवर गेले होते तर, घरात त्यांची मुले आणि पत्नी होती. दहशतवादी घुसल्यानंतर महिलांनी धाडस दाखवत त्यांनी हेडकॉर्टरमध्ये प्रवेश करु नये यासाठी घरातील सामान आणून गेटबंद करुन टाकले.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले, की दहशतवादी घुसल्याचे कळाल्यानंतर दोन महिलांनी धाडस दाखवले.
- दहशतवादी क्वार्टर्समध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी इमारतीमध्ये १२ जवान, दोन जवानांच्या पत्नी आणि त्यांची नवजात बालकं होती.
- बचावकार्यादरम्यान, एक अधिकारी आणि दोन जवानांना वीरमरण आले. मात्र निकराने लढा देत त्यांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या नगरोटा हल्ला
#1 - लष्कराला कन्फ्यूज करण्यासाठी पोलिसांच्या वेशात दहशतवादी लष्करी तळात घुसले.
#2 - त्यानंतर दहशतवाद्यांनी ऑफिसर्स मेसवर बॉम्ब फेकत तोफखाना केंद्रात घुसले.
#3 - सुरुवातीच्या एन्काऊंटरमध्ये एक ऑफिसर आणि तीन जवान शहीद झाले.
#4 - दहशतवादी लष्करी तळात घुसल्यानंतर त्यांनी लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सकडे मोर्चा वळविला.
#5 - दोन इमारतींमध्ये महिला आणि लहान मुले होती. दहशतवाद्यांनी तिथे घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे ओलिस ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
#6 - लष्कराने तत्काळ पॅरा कमांडोंना पाचारण केले आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. कमांडोंच्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले.
#7 - 12 जवानांसह 2 नवजात बालके आणि दोन महिलांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यातील एक बाळ दोन महिन्यांचं तर दुसरं 18 महिन्यांचं आहे.
#8 - रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान एक ऑफिसर आणि दोन जवान शहीद झाले.
#9 - कित्येक तास चाललेल्या एन्काऊंटरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
#10 - त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले, जे बुधवारी देखिल सुरु आहे.
No comments:
Post a Comment